कासच्या जलवाहिनीला कासाणी येथे गळती

सातारा – सातारा शहराला पाणीपुरवठा करणार्‍या कास तलावाच्या जलवाहिनीला कासाणी गावाजवळ गळती लागली आहे. पाणीपुरवठा खंडित न करता, ही गळती काढण्याचा निर्णय सातारा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. गळती काढण्याचे काम सुरू झाले आहे. सातारा शहराला प्रामुख्याने कास, शहापूर योजना आणि जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येतो. कास तलावाच्या भिंतीची उंची वाढवण्याचे काम पालिकेने नुकतेच … Read more

दक्षिण आफ्रिकेमध्ये वायू गळतीमुळे 16 जणांचा मृत्यू

जोहान्सबर्ग – विषारी नायट्रेट वायूच्या गळतीमुळे दक्षिण आफ्रिकेमध्ये किमान 16 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 3 लहान मुलांचाही समावेश आहे. बेकायदेशीर खाण कामगारांकडून जवळच्याच धातूच्या झोपड्यांमध्ये सोन्याच्या शुद्धीकरणासाठी या वायूचा वापर केला जात असतो. तेथेच ही वायू गळती झाल्याचे दक्षिण आफ्रिकेच्या पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी सांगितले. जोहान्सबर्गच्या पूर्वेकडील अँजेलो बोक्‍सबर्ग येथे ही वायू गळती झाली आणि … Read more

मेटा करणार ट्विटर सारखा सोशल प्लॅटफॉर्म लॉन्च ! कोडनेम झाला लीक

फेसबुकची मूळ कंपनी मेटा आता टेक्स्ट शेअरिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काम करत आहे. एका रिपोर्टनुसार मेटा आता ट्विटर या जगातील सर्वात मोठ्या मायक्रोब्लॉगिंग साइटशी स्पर्धा करण्याची तयारी करत आहे. इलॉन मस्क त्याचे मालक झाल्यानंतर अनेक जाहिरातदारांनी ट्विटरकडे पाठ फिरवली आहे, ज्याचा फायदा घेण्यासाठी मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग आता तयार आहे. मेटाच्या ट्विटर सारख्या प्लॅटफॉर्मची बातमी … Read more

गॅस गळती झाल्यामुळे 6 कामगारांचा मृत्यू

सूरत- गुजरातमधील सूरतमध्ये गुरुवारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका प्रिंटिंग मिलमध्ये पहाटे गॅसची गळती झाली असून यामध्ये सहा कर्मचाऱ्यांना गुदमरून जीव गमवावा लागला आहे. यासह 20 हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विश्व प्रेम डाईंग अँड प्रिंटिंग मिलजवळ टॅंकरमधून गॅस गळती झाल्याने हा अपघात झाला. मिलजवळ एक नाला … Read more

Pandora papers leak : पॅंडोरा प्रकरणात सचिन तेंडुलकरचेही नाव

मुंबई –पॅंडोरा पेपर्स या नावाने उजेडात आलेल्या कागदपत्रांत भारतातील अनेक बड्या व श्रीमंत व्यक्‍तींची नावे समोर आली आहेत. त्यातच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचेही नाव आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सचिनसह एकूण तब्बल 300 जणांची नावे या कागदपत्रांत समोर आली आहेत. राजकीय नेते, अधिकारी आणि सचिनसह अनेक सेलिब्रिटींचाही या कागदपत्रांत समावेश आहे. अर्थात सचिनच्या वकिलांनी हे … Read more

गोहे पाझर तलाव शंभर टक्के भरला

आंबेगाव, शिरूर तालुक्‍यातील 85 गावांचा पाणीप्रश्‍न मार्गी मंचर – आंबेगाव तालुक्‍याच्या आदिवासी भागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोहे पाझर तलाव बुधवारी (दि. 21) रात्री शंभर टक्के भरला आहे. सुमारे अर्धा टीएमसी पाणीसाठा तलावात असून तलाव भरल्याने घोडनदीला पूर आला आहे. हुतात्मा बाबु गेणु सागर (डिंभे धरण) धरणामध्ये 43.72 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरण भरण्यासाठी अजूनही … Read more

आसाम पेपर लीक प्रकरण व्यापमंपेक्षाही मोठा घोटाळा; अखिल गोगोई यांचा दावा

  गुवाहाटी -आसाममध्ये पोलीस भरती परीक्षेतील प्रश्‍नपत्रिका फुटल्याच्या (पेपर लीक) प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. अशात ते प्रकरण मध्यप्रदेशातील व्यापमंपेक्षाही मोठा घोटाळा असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते अखिल गोगोई यांनी केला आहे. आसाममधील भाजप सरकार पेपर लीक घोटाळ्यात सामील असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. आसाम पोलीस दलातील उप-निरीक्षक पदाच्या भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या लेखी परीक्षेतील प्रश्‍नपत्रिका काही … Read more

नॉर्वेमध्ये रेव्हपार्टीदरम्यान विषारी वायूगळती

कोपनहेगन, (नॉर्वे) – नॉर्वेची राजधानी ओस्लोमधील्‌ एका बंकरमध्ये झालेल्या बेकायदेशीर रेव्ह पार्टीदरम्यान झालेल्या विषारी वायूच्या गळतीमुळे किमान 25 जणांची प्रकृती बिघडली आहे.  पोर्टेबल जनरेटरमधून कार्बन मोनोक्‍साईडची गळती झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले. वायूगळतीमुळे अस्वस्थ झालेल्यांमध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीला गंभीर धोका नसल्याचे नॉर्वेतील एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे.  … Read more