पुणे जिल्हा | बिबट्यांच्या हल्ल्यात महिला ठार

ओतूर, (वार्ताहर) – नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर असणारे पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत गाजर पट शिवारात उन्हाळी बाजरी पिकाची राखण करत असताना दोन बिबट्यांनी एका महिलेवर हल्ला करून तिला उसाच्या शेतात ओढून नेऊन पुन्हा हल्ला चढविल्याने त्यात त्या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती ओतूर वनविभाग परिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली. दरम्यान, ही घटना शुक्रवारी (दि. … Read more

पुणे जिल्हा | बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू

पिंपळवंडी/आळेफाटा, (वार्ताहर) – काळवाडी (ता.जुन्नर) येथे बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि. 8) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली असून परिसरात शोककळा पसरली आहे. काळवाडी येथे यात्रेनिमित्त मामाच्या गावी आलेला रुद्र महेंद्र फापाळे (वय 8, रा. मूळगाव बदगीबेलापूर, ता.अकोले) सकाळी साडेआठच्या सुमारास आजोबा रोहिदास काकडे यांच्यासोबत शेतात गेला होता. जनावरांसाठी कडबा कुट्टी … Read more

nagar | बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी तरुणाची घेतली भेट

संगमनेर, (प्रतिनिधी)- जांबुत खुर्द येथील शिवाजी बबन पारधी हा तरुण बिबट्याच्या हल्ल्यात रविवारी गंभीर जखमी झाला. यावेळी त्याला तातडीने संगमनेरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांनी तातडीने दवाखान्यात जाऊन या तरुणाची भेट घेऊन मदतीच्या सर्व सूचना दिल्या. जांबुत खुर्द गावातील वाडा वस्ती येथील शिवाजी पारधी हा तरुण शेतकरी आपल्या शेतातील पिकाला … Read more

पुणे जिल्हा : बिबट्याच्या हल्ल्या एक शेळी शेळी ठार

दोन करडे पळवली : केळगावातील घटना आळंदी – खेड तालुक्यातील केळगाव, हनुमानवाडीतील ठाकर वस्ती पासून जवळ असणार्‍या एका शेतात नागेश सतीश कोकरे (धनकर) यांचे कुटूंब शेळ्या, मेंढ्या (मेंढपाळाचा वाडा ) गेल्या काही दिवसांपासून वसलेले आहे. सोमवारी (दि. 22) पहाटे बिबट्याने त्याठिकाणी एका शेळीवर हल्ला केला असून शेळीची 2 पिल्ले (करडे) घेऊन तो पसार झाला आहे. … Read more

पुणे जिल्हा | बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडीचा मृत्यू

ओझर, (वार्ताहर)- जुन्नर तालुक्यातील शिरोली खुर्द या ठिकाणी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. 11) पहाटे 5 वाजताच्या दरम्यान घडली संस्कृती संजय कोळेकर (वय दीड वर्षे) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. मेंढपाळ संजय कोळेकर यांनी शिरोली खुर्द येथील शेतकरी संपत केरू मोरे यांच्या शेतामध्ये मेंढरांचा वाडा लावला होता. गुरुवारी … Read more

पुणे जिल्हा | बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली जखमी

जांबूत, (वार्ताहर)- पिंपरखेड ( ता. शिरूर) येथील दाभाडेवस्तीवर बुधवार (दि.३) रात्री आठच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सान्वी उमेश गायकवाड ही चिमुकली किरकोळ जखमी झाली. प्रसंगावधान राखल्याने बिबट्याच्या हल्ल्यातून ती थोडक्यात बचावली ‘काळ आला होता, पण वेळ आली नाही, असा प्रत्यय गावकऱ्यांनी अनुभवला. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. अनेक वर्षांपासून बिबटप्रवण क्षेत्र असलेल्या … Read more

पुणे जिल्हा | मंगेश गुंजाळ कुटुंबीयांना 10 लाखांची मदत

बेल्हे, (वार्ताहर) – कांदळी (ता. जुन्नर) येथे झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात मंगेश गुंजाळ या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच आमदार अतुल बेनके यांनी वनविभागीय अधिकार्‍यांशी चर्चा केली आणि वन विभागाच्या माध्यमातून मंगेशच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. या आवाहनानुसार वन विभागाच्या माध्यमातून मंगेशच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपयांची मदत देण्याचे घोषित करण्यात आले. … Read more

पुणे जिल्हा | बिबट्याने हल्ला केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

बेल्हे,  (वार्ताहर) – जुन्नर तालुक्यातील कांदळी येथील सुतारठिके वस्ती येथे मोटारसायकलवरून जात असलेल्या तरुणावर बिबट्याने हल्ला केल्यामुळे हा तरुण गंभीर जखमी झाला होता या तरुणाचा मंगळवारी (दि. 5) रात्री उपचरादरम्यान मृत्यू झाला. मंगेश रामदास गुंजाळ (वय 26 रा. कांदळी, ता.जुन्नर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मंगेश गुंजाळ हे रविवारी (दि. 3) रात्री आठ वाजण्याच्या … Read more

पुणे जिल्हा | कांदळीत बिबट्याचा दुचाकीस्वारावर हल्ला

बेल्हे, (वार्ताहर) – कांदळी (ता. जुन्नर) येथील आनंद नगरमध्ये रहात असलेले मंगेश रामदास गुंजाळ (वय 26) हा युवक रविवार (दि. 3) रात्री 8 च्या सुमारास सुतार ठिके वस्तीवर असलेल्या डेअरीमध्ये दूध घालण्यासाठी मोटार सायकलवरून जात असताना बिबट्याने या युवकावर हल्ला केल्याने तो मोटारसायकलवरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, याचवेळी त्यांच्या गावांमधील संतोष गुंजाळ, … Read more

पुणे जिल्हा | दुर्गाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू

भोर, (प्रतिनिधी) – भोरमधील दुर्गाडी परिसरात बिबट्याने एका शेतकऱ्याचा बैल चरत असताना हल्ला करून फस्त केला आहे. भोरमधील दुर्गाडीसह आठ गावांमध्ये बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी भयभीत झाले असून दुर्गाडीच्या घटनेने त्यात शभर पडली आहे. मानटवस्ती, दुर्गाडी (ता.भोर) येथील शेतकरी कोंडिबा लक्ष्मण गोरे यांचा खिलार जातीचा तीन वर्षे वयाचा बैल रविवारी (दि. २५) सायंकाळी सहाच्या सुमारास … Read more