जळगावमध्‍ये 75 लाखांची दारु जप्ती; 5 आरोपींना अटक

जळगाव – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाने एमआयडीसी भागातील के-10 सेक्टर मधील मंदार आयुर्वेदित प्रोडक्ट या कंपनीत मारलेल्या छाप्यात बनावट देशी दारुचा कारखाना जमीनदोस्त केला असुन 75 लाखांचा मुद्दामाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध व बनावट … Read more

Pune: पैसे, दारूच्या अवैध वापरावर लक्ष ठेवा; कडक तपासणीचे केंद्रीय निवडणूक निरीक्षकांचे आदेश

पुणे – निवडणूक आयोगाकडून पुणे लोकसभा मतदारसंघाअंतर्गत खर्चविषयक बाबींच्या निरीक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक खर्च निरीक्षक कमलेश मखवाना यांनी निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला. उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या काटेकोर नोंदी ठेवण्यासह विविध पथकांच्या माध्यमातून निवडणुकीत पैसे, दारू आदींच्या अवैध वापरावर लक्ष ठेवावे, असे आदेश त्यांनी दिले. या वेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, तहसीलदार अंजली कुलकर्णी, … Read more

nagar | बेकायदेशीरपणे दारुची वाहतूक

राहुरी, (प्रतिनिधी): राहुरी शहर व परिसरात काल रात्रीच्या दरम्यान बेकायदेशीरपणे दारुची वाहतूक करीत असणाऱ्या सहा जणांना वेगवेगळ्या ठिकाणांहून राहुरी पोलीस पथकाने ताब्यात घेतले. तसेच पकडलेल्या आरोपींकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील पिंगळे, देवेंद्र शिंदे, उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, समाधान फडोळ, धर्मराज पाटील, हवालदार सूरज गायकवाड, वाल्मीक पारधी, अशोक शिंदे, आजिनाथ पाखरे, राहुल … Read more

Rahul Gandhis on Varanasi  | वाराणसीतील तरुणांबाबत राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावरून वाद पेटला…!

rahul gandhi

Rahul Gandhis  on Varanasi  |  काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सध्या उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि येथे ती पंतप्रधान मोदी, राज्य सरकार आणि केंद्रावर जोरदार निशाणा साधत आहे. राहुल गांधींची यात्रा उत्तर प्रदेशातील चंदौली, वाराणसी, अमेठीमार्गे मंगळवारी रायबरेली येथे पोहोचली. राहुल गांधी यांनी रायबरेलीतील भाषणात जे काही बोलले, त्यानंतर असा गदारोळ उठला आहे की, आता सातत्याने … Read more

गांधींच्‍या जन्‍मभूमीत होणार मद्यविक्री; गुजरात सरकारने गिफ्ट सिटीमधील दारुबंदी उठविली

गांधीनगर  – महात्मा गांधीची जन्मभूमी असलेल्या गुजरातमध्ये राज्य निर्मितीपासून दारुबंदी आहे. मात्र, भाजपच्या राज्य सरकारने गांधीनगरमधील मद्याविक्रीला परवानगी देण्‍याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये दारुबंदी असल्याचा प्रचार देश-विदेशात झाला. मोदींच्या इमेज बिल्डिंगसाठी याचा मोठ्या प्रमाणात वापरही करुन घेण्यात आला. मात्र आता गांधींच्या गुजरातमध्ये दारूबंदी हटवण्यात आली आहे. गांधीनगरमधील गुजरात इंटरनॅशनल … Read more

Rajasthan Election: 10 दिवसांत 143 कोटींची दारू, सोने आणि रोकड जप्त

जयपूर  – राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून गेल्या 10 दिवसांत पोलीस, आयकर आणि उत्पादन शुल्क विभागासह विविध यंत्रणांनी 143 कोटी रुपयांहून अधिक किमतीची अवैध दारू, रोख रक्कम आणि इतर साहित्य जप्त केले आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात 65 दिवसांत 70 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते, तर यावेळी केवळ 10 दिवसांत त्याच्या … Read more

“वाइनशॉप, ढाबाचालकांनो खबरदार” ; विनापरवानगी मद्यपान करू दिल्यास दंडासह होईल तुरुंगवास

उत्पादन शुल्ककडून आठ महिन्यांत 497 जणांना अटक वालचंदनगर – पुणे जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात बिअर शॉपी, वाइनशॉप यांसह काही ढाबाचालक व हॉटेलचालक परवानगी नसतानाही दारू पिण्याची परवानगी देताय तर खबरदार! असा प्रकार आढळून आल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे (एक्‍साइज) दारू पिणाऱ्यांसह ढाबाचालकांवरही 50 हजारांपर्यंत दंड आणि 5 वर्षांची शिक्षा होऊ शकते. खात्याने 8 महिन्यांत … Read more

सकाळ-संध्याकाळ 90 चा पेग फ्री द्या.! दरवाढीनंतर कर्नाटकात मद्यप्रेमींचे अंदोलन

उडपी – हलगीचा आवाज… मध्यभागी ठेवलेल्या दारूच्या मोठ्या बाटलीला मोगऱ्याच्या गजरांचा हार घालून तिची चाललेली आरती. हे चित्र आहे कर्नाटकच्या उडपी या शहरातील. कर्नाटकमध्ये मद्याच्या किमती वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर तेथील मद्यप्रेमींनी हे अजब अंदोलन केले आहे. तर, झाले असे की, कर्नाटकच्या नवनिर्वाचित सिद्धरामय्या सरकारने नुकताच राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर केला. या अर्थसंकल्पात भारतीय बनावटीच्या … Read more

“देशी दारूच्या बाटलीची किंमत जेवढी आहे तेवढे पैसे एक लिटर दुधाला द्या”; सदाभाऊ खोत यांची मागणी

इंदापुर – देशी दारूच्या बाटलीची किंमत जेवढी आहे तेवढे पैसे एक लिटर दुधाला द्या, अशी मागणी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक येथे रयतक्रांती संघटनेचा शेतकरी मेळावा पार पडला. त्यादरम्यान सदाभाऊ खोत यांनी ही मागणी केली आहे. सध्या त्यांनी केलेल्या या मागणीची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली आहे. सदाभाऊ खोत म्हणाले … Read more

दारुसाठी पैसे न दिल्याने वृद्धेचा खून

उंब्रज – तळबीड, (ता. कराड) येथील मानकर वस्तीवर राहत्या घरी महिलेच्या डोक्‍यात दगड घालून तिचा खून करण्यात आला. गुरुवारी दि. 5 रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. दरम्यान, महिलेचा खून चोरीच्या उद्देशाने झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अवघ्या 4 तासात तळबीड पोलिसांनी संशयित आरोपीस गजाआड केले आहे. … Read more