Infiltration on LOC : जम्मूमधील पाकिस्तनाकडून घुसखोरीचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला; गोळीबारात एक घुसखोर ठार

Infiltration on LOC : लष्करानेजम्मू काश्मीरमध्ये घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडला आहे.  पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला होता, जो भारतीय लष्कराने धुळीस मिळवला आहे. लष्कराच्या जवानांनी चार घुसखोरांना पाहिल्यानंतर त्याठिकाणी गोळीबार करण्यात आला  ज्यामध्ये एक घुसखोरही ठार झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घुसखोरांना पाकिस्तानकडून पूर्ण पाठिंबा मिळत होता.  हे घुसखोर … Read more

“भारताने कोणाचीही भूमी बळकावली नाही,जर आमचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला तर..” राजनाथ सिंह यांनी स्पष्टचं सांगितलं

नवी दिल्ली – भारताचे चारित्र्य कधीही कोणत्याही देशावर हल्ला करणे किंवा त्याची एक इंच भूमी बळकावणे असे नाही. परंतु आम्ही संकल्प केला आहे की जर कोणी आमचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला तर कोणीही वाचणार नाही, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath singh) यांनी केले आहे. छत्तीसगडमधील (Chhatisgadh) सीतापूर, भरतपूर-सोनहट आणि पाटण विधानसभा मतदारसंघात निवडणूक … Read more

काश्‍मीरात नियंत्रण रेषेजवळ व्यापक शोध मोहीम

मेंढार/जम्मू,  – जम्मू आणि काश्‍मीरच्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) संशयास्पद हालचाली आढळून आल्यानंतर सुरक्षा दलांनी शनिवारी त्या भागात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली. सकाळी 6 च्या सुमारास बुफ्लाझ सेक्‍टरमधील चामरेर आणि गंगना टॉपमध्ये लष्कर आणि पोलिसांनी ही संयुक्त शोध मोहीम सुरू केली. काही संशयास्पद हालचाली लक्षात आल्यानंतर शोध पक्षांनी चामरेर जंगल परिसरात काही … Read more

‘एलओसी’जवळ संरक्षण सुविधांसाठी पाकला चीनची मदत

नवी दिल्ली :- सीमेजवळ ताबा रेषेजवळ पाकिस्तान चीनच्या मदतीने संरक्षण सुविधा उभारत आहे. यामध्ये ड्रोन आणि लष्करी ड्रोन वापराच्या सुविधांचा समावेश आहे. याशिवाय कम्युनिकेशन टॉवर आणि भूमिगत केबलचे नेटवर्कदेखील उभे केले जात आहे, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरमध्ये पाक सैन्याची स्थिती अधिक बळकट करण्याच्या हेतून चीनकडून पाकिस्तानला ही मदत केली जात आहे. चीन-पाकिस्तान … Read more

चीनच्या प्रत्येक हालचालीला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज – हवाई दल प्रमुख

नवी दिल्ली – चीनच्या सीमारेषेवर एकीकडे शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये लष्करी पातळीवरील चर्चेची 16वी फेरी सुरू आहे. अशा परिस्थितीत हवाई दल प्रमुखांनी रविवारी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, आमचे लष्करही चीनशी सामना करण्यासाठी पूर्ण तयारी करत आहे. एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी म्हणाले की, जेव्हाही चिनी वायुसेनेचे पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्स … Read more

पूर्व लडाखमध्ये चीन उभारतोय दुसरा पुल

नवी दिल्ली – प्रत्यक्ष ताबा रेषा (एलएसी) म्हणजेच सीमेलगतच्या हालचाली चीनने सुरूच ठेवल्या आहेत. आता लष्करी डावपेचांच्या दृष्टीने महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या पूर्व लडाखमधील पॅंगॉंग तलावाजवळ चीन दुसरा पुल उभारत असल्याचे उघड झाले आहे. उपग्रह छायाचित्रांवरून चीनच्या हालचाली सुरूच असल्याचे समोर आले. चीनी कुरापतींमुळे दोन वर्षांपासून सीमेलगत तणावाची स्थिती आहे. चीनी सैन्याच्या हालचाली विचारात घेऊन भारतीय … Read more

जम्मू-काश्मीरमध्ये भूसुरूंग स्फोटात दोन जवान शहीद; तीन जण गंभीर जखमी

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया होताना दिसत आहेत. त्यातच काल जम्मू-काश्मीरच्या नौशेरा-सुंदरबनी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ काल  भूसुरुंग स्फोट झाला असून यात दोन जवान शहीद झाल्याचे सांगण्यात येत आहे. तीन जण जखमी झाले आहेत. तर यात तीन जवान गंभीर झाले असल्याचे एका वृत्तवाहिनीच्या सूत्रांनी माहिती दिली आहे. नियंत्रण रेषेजवळ भूसुरुंगावर गस्त घालत … Read more

एलओसीजवळ लष्कराने घुसखोरीचा डाव उधळला; 3 दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर – भारतीय लष्कराने गुरूवारी नियंत्रण रेषेच्या (एलओसी) जवळ घुसखोरीचा डाव उधळून लावत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. ती घटना जम्मू-काश्‍मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात घडली. एलओसीलगत तैनात असणाऱ्या लष्करी जवानांनी घुसखोरांच्या संशयास्पद हालचाली हेरल्या. घुसखोरांनी भारतीय हद्दीत शिरकाव करू नये यासाठी जवानांनी गोळीबार केला. त्यामध्ये तीन दहशतवादी मारले गेले.  त्यातील एक जण पाकिस्तानी नागरिक असल्याचे कागदपत्रांवरून तातडीने … Read more

घुसखोरीचा प्रयत्न जवानांनी हाणून पाडला ; तीन दहशतवाद्यांचा केला खात्मा

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा जवानांनी खात्मा केला आहे. एलओसीवर झालेल्या चकमकीत चार जवान देखील जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न जवानांनी अयशस्वी ठरवला आहे. पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांना घुसखोरी करणं सोपं जाव यासाठी, एलओसीच्या अखनूर सेक्टरच्या खौर भागात मंगळवारी सायंकाळी जोरदार गोळीबार सुरू केला होता. पाकिस्तानच्या गोळीबारात लष्कारचे चार जवान जखमी झाले … Read more

पाकच्या नापाक कुरापती सुरूच; वर्षाच्या पहिल्या दिवशीच गोळीबारात भारतीय जवान शहीद

जम्मू  – शस्त्रसंधी भंगाच्या पाकिस्तानी कुरापती नवीन वर्षातही कायम राहिल्या. पाकिस्तानी सैनिकांनी शुक्रवारी दोन वेळा भारतीय हद्दीत मारा केला. त्याला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. दरम्यान, पाकिस्तानी माऱ्यात भारतीय लष्कराच्या एका जवानाला वीरमरण आले. पाकिस्तानी सैनिकांनी नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत गोळीबार करतानाच तोफगोळे डागले. त्या माऱ्याचे लक्ष्य जम्मू-काश्‍मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा क्षेत्र ठरले. पाकिस्तानी सैनिकांनी … Read more