अशी ‘कृत्ये’ मोदी भक्तांचा ट्रेडमार्क – स्वरा भास्कर

दिल्ली –  भारतीय जनता पक्षावर प्रखर टीका करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या काँग्रेसच्या प्रचारात गुंतली आहे. दिल्लीतील सातही लोकसभा मतदारसंघांमध्ये सहाव्या टप्प्यामध्ये निवडणुका दरम्यान पक्षाच्या प्रचारादरम्यानही स्वराने बेधडक वृत्तीचे दर्शन घडवत आपले राजकीय विचार मांडले होते. अशातच विमानतळावर एक चाहता स्वराला भेटायला येतो. तो स्वराला सेल्फीसाठी विनंती करतो. स्वरा तयार होते. पण सेल्फी … Read more

बडतर्फ जवान तेज बहादुर यादव यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी

नवी दिल्ली – समाजवादी पार्टीचे उमेदवार म्हणून वाराणसी मतदार संघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेले, सीमा सुरक्षा दलाचे बडतर्फ जवान तेज बहादुर यादव यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने रद्दबातल ठरवला होता. त्यामुळे जवान तेज बहादुर यादव यांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर तेज बहादुर यादव यांच्या या याचिकेवर उद्या बुधवारी सर्वोच्च … Read more

नरेंद्र मोदींबद्दल ममता बॅनर्जी यांचे आक्षेपार्ह वक्तव्य

कोलकाता – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी सुरु असल्याचे काही दिवसांपासून दिसत आहेत. सर्वच पक्षांचे राजकीय नेते एकमेकांवर मिळेल त्या शब्दात आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी यांच्यामधील वाद कोणत्याही परिस्थतीमध्ये निवळण्याची चिन्हे नसल्याचे दिसत आहे. ‘फणी’ चक्रीवादळाच्या मुद्द्यावरून झालेल्या वादानंतर आता ममता बॅनर्जी यांनी, नरेंद्र मोदी यांच्यावर … Read more

आणखी दोन भाषणांवरून मोदींना निवडणूक आयोगाकडून क्‍लीन चिट

नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने आज आणखी दोन भाषणांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्‍लीन चिट दिली. कर्नाटकच्या चित्रदुर्गमधील सभेत मोदींनी पुलवामाचा उल्लेख करत बालाकोट हवाई हल्ल्यातील हिरोंसाठी मतदान करावे अशी हाक दिली होती. तर, गुजरातच्याच्या अहमदाबाद येथील रॅली बाबत सुद्धा निवडणूक आयोगाने मोदींना क्लीन चिट दिली आहे. मोदींच्या भाषणांमधून निवडणूक आचारसंहितेचा भंग झाला नसल्याचा निर्वाळा … Read more

आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना निवडणूक आयोगाची नोटीस

नवी दिल्ली – दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने आज नोटीस बजावली आहे. आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी ट्विटर खात्यावरून,  आम आदमी पक्षाच्या पूर्व दिल्लीतील उमेदवार अतीशी यांच्या धर्माबाबत उल्लेख केल्याने, निवडणूक आयोगाकडून मनीष सिसोदिया यांना आदर्श आचारसंहिता भंगाची नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाने उद्या म्हणजेच … Read more

समाजवादी पक्षाचा दिल्लीत बसप आणि आपला पाठिंबा

नवी दिल्ली – समाजवादी पक्षाने (सप) दिल्लीत लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पक्ष (बसप) आणि आम आदमी पक्षाला (आप) पाठिंबा जाहीर केला. दिल्लीत सपने स्वत:चे उमेदवार रिंगणात उतरवलेले नाहीत. त्यामुळे त्या पक्षाने दिल्लीतील सातपैकी पाच जागा लढवणाऱ्या बसपला पाठिंबा दिला. उर्वरित दोन जागांवर सपने आपच्या उमेदवारांना पाठिंबा देऊ केला. उत्तरप्रदेशात सप आणि बसपने रालोदला बरोबर घेऊन … Read more

स्ट्रॉंग रुममध्ये उमेदवारांना प्रवेश नको – जयंत पाटील

मुंबई – ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या स्ट्रॉंग रुममध्ये उमेदवारांना प्रवेश देण्यात येवू नये, अशी मागणी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे. आयोगाच्या या यशस्वी कार्याला एका निर्णयाने गालबोट लागले, असे दुर्दैवाने नमुद करावेसे वाटते असे सांगतानाच लोकसभेच्या निवडणुका लढविलेल्या उमेदवारांना या सीलबंद मशिन्स व व्हीव्हीपॅट ठेवलेल्या स्ट्रॉंग … Read more

दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल

मुख्यमंत्र्यांची केंद्रिय निवडणूक आयोगाकडून मागणी मान्य मुंबई – राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. ऐन निवडणूकीच्या दिवसांतच दुष्काळाची दाहकता वाढत असताना दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आचारसंहितेमुळे सरकारपुढे अडचण निर्माण झाली होती. मात्र, राज्यातील दुष्काळ निवारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आचारसंहिता शिथिल करण्याच्या मागणीला केंद्रिय निवडणूक आयोगाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आयोगाने मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य केल्याने राज्यातील दुष्काळी … Read more

मतदान यंत्रांच्या “स्ट्रॉंग रूम’मध्ये “जॅमर’ बसवा!

कॉंग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी मुंबई – लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या मतदान यंत्रांशी मोबाइल टॉवर्स किंवा वायफायच्या माध्यमातून छेडछाड होण्याची भीती असून, सुरक्षेचा उपाय म्हणून मतदान यंत्रे ठेवलेल्या “स्ट्रॉंग रूम’मध्ये “जॅमर’ बसविण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनीकुमार यांची … Read more

नरेंद्र मोदी यांना आपण देशाचे पंतप्रधान मानत नाही – ममता बॅनर्जी

नवी दिल्ली – ‘फणी’ चक्रीवादळ ओडिशा आणि पश्‍चिम बंगालच्या किनाऱ्यावरून दुर गेले असले तरी आता त्यावरून राजकीय वातावरण संपायचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. एका बाजूला लोकसभा निवडणूक सुरु असताना दुसऱ्याकडे नैसर्गिक आपत्तीवरून राजकीय वादळ सुरु झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फणी चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पश्‍चिम बंगालमध्ये पोहचले. यावेळी केंद्र सरकारने पश्‍चिम … Read more