सातारा – अज्ञात वाहनाच्या धडकेने वीजेचा खांब पडला

कृष्णानगर – सातारा-लातूर महामार्गाचे काम कासवगतीने सुरु असल्याने संगमनगर विकासनगर संगम माहुली येथील रहिवाशांना रोज नवीन संकटाना तोंड द्यावे लागत आहे. गुरुवारी (दि. 28) रोजी पहाटे महामार्गालगत संगमनगर पोलीस चौकीजवळ असणार्‍या महावितरणच्या वीजेच्या खांबाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने या भागातील वीजपुरवठा खंडीत झाला. तसेच रोड डिवायडरचे काम चालू असल्याने व त्यालगतच पोल पडल्याने वाहतुकीचा बोजवारा … Read more

सातारा – लोणंदमध्ये उद्या “एक धाव आरोग्यासाठी” मॅरेथॉन

लोणंद – लोणंद नगरपंचायत मार्फत स्वच्छ सर्वेक्षण २०२४ व माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत ५ किमी लोणंद मॅरेथोनचे रविवार दि ३१ डिसेंबर रोजी “एक धाव आरोग्यासाठी” या उपक्रमाअंतर्गत आयोजन करण्यात आलेले आहे. या मॅरेथॉनसाठी दोन दिवसातच ५०० नागरिकांनी नोंदणी पूर्ण केली आहे. नोंदणी करणाऱ्या स्पर्धकांनाच मोफत टिशर्ट देण्यात येणार आहे. तसेच मॅरेथोन पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांनाच … Read more

सातारा – पालकमंत्री व आमदारांच्या भेटीनंतरही उपोषण सुरूच

लोणंद – धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी खंडाळा तालुका सकल धनगर समाजाच्यावतीने लोणंद नगरपंचायतीसमोर उपोषणास बसलेल्या गणेश केसकर यांची उपोषणाच्या चौथ्या दिवशी पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. धनगर आरक्षणाबाबत धनगड ऐवजी धनगर असे शिफारसपत्र राज्यपाल देत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही, अशी … Read more

धक्कादायक! शिक्षकाकडे तक्रार केल्याच्या रागातून अल्पवयीन विद्यार्थ्यांवर कोयत्याने हल्ला

लोणंद – खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील एका खासगी शाळेत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर त्यांच्याच शाळेतील पंधरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याने शिक्षकांना तक्रार केल्याच्या रागातून कोयत्याने जीवघेणा हल्ला करत गंभीर जखमी केले. शिरवळ येथील एका खासगी शाळेत शिकत असलेले चौदा आणि पंधरा वर्षीय दोन सख्ख्या भावंडांवर त्यांच्याच शाळेत शिकणाऱ्या एका पंधरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याने शाळा सुटल्यानंतर सायंकाळी … Read more

पुणे जिल्हा : लोणंदमध्ये लोटला वैष्णवांचा मेळा

सातारा जिल्ह्यात पोलिसांच्या मानवंदनेत माऊलींचे स्वागत प्रशांत ढावरे लोणंद – हरिनामाच्या जयघोषात आणि टाळ-मृदंगांच्या गजरात रविवारी (दि. 18) दुपारी दीड वाजता श्री ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याने नीरा नदीकाठी पुणे जिल्ह्यातील आपला प्रवास संपवून नीरा नदीवरील जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून मार्गक्रमण करत टाळ-मृदंगाच्या साथीत मोठ्या आनंदाने भक्तिमय वातावरणात हैबतबाबांच्या भूमीत सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. येथे पोलीस मानवंदना … Read more

लोणंदमध्ये गावठी बॉम्बसदृश स्फोटके

लोणंद – लोणंद येथे रेल्वे स्टेशन परिसरात गावठी बॉम्बसदृश स्फोटके डुकराने खाल्ल्याने भीषण स्फोट झाला. या स्फोटात डुक्‍कर ठार झाले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. लोणंद शहरात रेल्वे स्टेशन परिसरात कोणी तरी डुकरे मारण्यासाठी चेंडूच्या आकाराचे गावठी बॉम्ब परिसरात टाकल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी साडेआठ वाजता ही स्फोटके खाल्ल्याने एका डुकराच्या जागेवरच मृत्यू … Read more

लोणंद: श्रीमंतांचा छंद ठरतोय गरीबांसाठी जीवघेणा; बैलागाडा शर्यतीतील जखमीचा मृत्यू

लोणंद – लोणंद येथील बैलगाडा शर्यतीत अपघात होऊन गंभीर जखमी झालेल्या बैलगाडा चालकाचे पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. बोरखळ येथील शर्यतीदरम्यान झालेल्या अपघाती मृत्यूनंतर आता लोणंद येथील शर्यतीत झालेल्या मृत्यूमुळे गावोगावी होत असलेल्या बैलगाडा शर्यतींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. लोणंद येथे (दि. १०) फेब्रुवारी रोजी ‘केसरी भव्य बैलगाडा शर्यतींचे आयोजन लोणंद निंबोडी … Read more

लोणंदमधील घरफोडीचा गुन्हा उघड

लोणंद – लोणंद बाजारतळावरील कुसुम अशोक शेलार यांच्या घरातून अंधाराचा फायदा घेत सुमारे दीड वर्षापूर्वी दि. 5 जुलै 2021 रोजी सोन्याचे दागिने चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास करत लोणंद पोलीसांनी सुमारे साडेसात लाखांच्या चोरीचा ऐवज हस्तगत करत चोर आणि दागिन्यांची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणाऱ्यांना अटक करण्यात यश मिळविले. पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, सहायक पोलीस निरीक्षक विशाल … Read more

उसन्या पैशांवरून झालेल्या वादातून खंडाळा तालुक्यात एकाचा खून

लोणंद –  उसने घेतलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादात कुऱ्हाडीचा घाव वर्मी बसल्यामुळे खंडाळा तालुक्यातील भादे येथील दगडेवस्ती या ठिकाणी उमेश पुरंदर काळे (वय २८) याचा खून झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी घडली. घटनेनंतर एका महिलेसह चौघेजण फरारी झाले आहेत. याबाबतची शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भादे येथील दगडे वस्ती, होडी याठिकाणी उमेश … Read more

सातारा : लोणंद येथील बैलगाडा शर्यतीत सार्थक गायकवाड यांच्या गाड्याने मारली बाजी

लोणंद (प्रतिनिधी) – लोणंद येथील श्री कालभैरवनाथ वार्षिक यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या भव्य बैलगाडा शर्यतीत सार्थक सूर्यकांत गायकवाड यांच्या गाड्याने प्रथम क्रमांक पटकात ढाल आणि रोख 71  हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले . करोनामुळे दोन वर्षाच्या खंडानंतर होत असलेल्या लोणंद येथील ग्रामदैवत श्री कालभैरवनाथाच्या यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीत सातारा तसेच पुणे, सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ऐंशीपेक्षा अधिक बैलगाडा … Read more