पुणे जिल्हा | ग्रिको रोमन कुस्ती स्पर्धेत दिग्विजयला सुवर्णपदक

लोणीकंद (वार्ताहर)- नाशिक मधील भगूर येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीर संघाच्या मान्यतेने व रेसलिंग असोसिएशन ऑफ नाशिक यांच्या सहकार्याने पार पडलेल्या वरिष्ठ ग्रीक रोमन राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत लोणीकंद येथील जाणता राजा कुस्ती केंद्राचा मल्ल दिग्विजय भोंडवे याने 130 किलो वजन गटात सातार्‍याचे पै. सिद्धेश साळुंखे, पुण्याचे पै. आदित्य मोहोळ व अंतिम फेरीत कोल्हापूरचा मल्ल शुभम … Read more

पुणे जिल्हा | म्हसोबा देवाच्या यात्रेतील गदेचा मानकरी ठरला शुभम सिदनाळे

लोणीकंद, (वार्ताहर) – लोणीकंद येथे श्री म्हसोबा देवाच्या यात्रा उत्सवा निमित्त दोन दिवस बैलगाडा शर्यत आणि कुस्तीच्या आखाड्याच्या आयोजन करण्यात आले होते. कुस्ती आखाड्यात ४७ निकाली कुस्त्या होत. २१०९ ते ६० हजार रुपयापर्यंत इनाम देण्यात आले. यावेळी म्हसोबा देवाच्या उत्सवानिमित्त आयोजित कुस्तीच्या आखाड्यात शिवम सिदनाळे हा चांदीच्या गदेचा मानकरी ठरला. यात्रोत्सवानिमित्त भरवण्यात आलेली बैलगाडा शर्यत … Read more

पुणे जिल्हा | जरांगे पाटील यांच्याकडून आढळराव यांना शुभेच्छा

लोणीकंद, (वार्ताहर) – धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या 335 व्या बलिदान दिनानिमित्त श्रीक्षेत्र तुळापूर येथील संभाजी महाराज समाधीस्थळी मराठा नेते मनोज जरांगे पाटील व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे चिरंजीव अपूर्व आढळराव पाटील यांची भेट झाली. उपस्थितांनी आढळराव पाटील यांच्या पुत्राची ओळख करून देत असताना उमेदवार शिवाजीदादांचे अपूर्व हे चिरंजीव असल्याचे सांगताच जरांगे पाटलांनी … Read more

satara | आदर्की खुर्द येथे बांधावरून निर्घृण खून

लोणंद  (प्रतिनिधी) – लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदर्की खु. ता. फलटण येथील शेताच्या बांधावरून झालेल्या भांडणातून चंद्रशेखर बबनराव निंबाळकर यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून खून करणाऱ्या संशयित सयाजी शंकर निंबाळकर याला लोणंद पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपीस दि. 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. याप्रकरणी लोणंद पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दि. 2 एप्रिल रोजी सायंकाळी … Read more

पुणे जिल्हा | बंदी असतानाही अवजड वाहतूक सुरूच

लोणीकंद, (वार्ताहर)- लोणीकंद-आळंदी रस्त्यावरील श्रीक्षेत्र तुळापूर येथील इंद्रायणी नदीवरील पुलावरून अवजड वाहतूक बंद असतानाही सर्रास अवजड वाहने व अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. पुलाचे आयुर्मान संपलेले असून, पूल कमकुवत बनला असताना अवजड वाहतुकीने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पुलावरून वाहतूक बंद राहावी, म्हणून काही दिवसांपूर्वी प्रशासनाच्या माध्यमातून पुलाचे दोन्ही बाजूला लोखंडी बार लावले होते. केवळ … Read more

पुणे जिल्हा | फळांचा राजा बाजारात दाखल

लोणीकंद, (वार्ताहर) – फळांचा राजा म्हटलं की डोळ्यासमोर येतो हापूस आंबा. हाच हापूस आंबा आता बाजारात दाखल झालाय. पिकलेला आंबा बाजारात येताच त्याच्या घमघमाटाने तोंडाला पाणी सुटते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा हापूस लवकरच बाजारात दाखल झाला आहे. उन्हाळा सुरू झाला की कोकणचा राजा देवगड हापूस आंब्याला फळ बाजारात मागणी वाढत असते. यंदा बाजारात लवकर आंबे दाखल … Read more

पुणे जिल्हा | बुर्केगावात चोरी झालेले चार रोहित्र बसवले

लोणीकंद, (वार्ताहर) –हवेली तालुक्यातील बुर्केगाव येथे एकाच वेळेस चार रोहित्र चोरी झाल्याची घटना घडली. हवेली तालुक्यात वारंवार रोहित्रांच्या होणार्‍या चोर्‍यांमुळे शेतकरी हवालदिल झाला असताना ऐन उन्हाळ्यात एकाच दिवशी 4 रोहित्र व शेतकर्‍यांच्या पाण्याच्या मोटारी चोरीला गेल्याने शेतकरी पुरते हैराण झाले होते. ऐन उन्हाळ्यात झालेल्या चोरीमुळे पिकांना पाणी देता येत नव्हते, पिके जळून चालली होती. महावितरण … Read more

पुणे जिल्हा | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज शिरूर-हवेली दौर्‍यावर

लोणीकंद (वार्ताहर)- स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे जागतिक दर्जाच्या स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. 2) होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शंभूभक्तांच्या मागणीला मूर्त स्वरूप अखेर प्राप्त होत असल्याने शंभूभक्तांमध्ये नव चेतना निर्माण होणार आहे. या स्मारकासाठी माजी आमदार स्व. बाबुराव … Read more