‘लव्ह जिहाद’ पिडीत मुलीला 24 तासात शोधले; शाहरुख पोलिसांच्या ताब्यात

अमरावती : राज्यात सर्वत्र दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अश्यातच लव जिहाद अंतर्गत पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा पोलिसांनी 24 तासांच्या आत शोध घेऊन तीला परत आणले. ही उल्लेखनीय कामगिरी राजापेठ पोलिसांनी केली. त्याबद्दल भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी आज अमरावतीच्या पोलीस आयुक्तांसह सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. याबाबत सविस्तर माहिती … Read more

सीमा हैदरचे प्रकरण रिव्हर्स लव्ह जिहाद आहे का? CM योगी आदित्यनाथ म्हणाले,”हा दोन देशांशी..”

नवी दिल्ली – पाकिस्तानातील कराची येथे राहणारी सीमा हैदर पबजी गेम खेळताना नोएडाच्या सचिनच्या संपर्कात आली. दोघेही प्रेमात पडले होते. प्रेम मिळविण्यासाठी सीमा हैदरने नेपाळमार्गे भारताच्या हद्दीत अवैधरित्या प्रवेश केला आणि राबुपुरा येथे राहू लागली.हा सर्व प्रकार उजेडात येताच संपूर्ण देशभरच नाही तर पाकिस्तानात देखील सचिन आणि सीमाच्या लव्ह स्टोरीची चर्चा सुरु झाली.अशात युपीचे मुख्यमंत्री … Read more

इंदूरमध्येही लव्ह जिहादचे प्रकरण; खोटे नाव सांगून मैत्री, बलात्कार, मग धर्मांतराचा आग्रह

इंदूर – इंदूरमध्ये लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले आहे. येथील अपोलो टॉवर्समध्ये नोकरी करणाऱ्या पिडीत युवतीशी एकाने खोटे नाव सांगून मैत्री केली. मग तिच्यावर विवाहाच्या आमिषाने बलात्कार केला आणि मग खरे नाव सांगून तिच्यावर धर्मांतरासाठी दडपण आणले. सदर युवतीने धमक्‍यांना भिक न घालता सरळ पोलिस स्टेशन गाठले आणि पोलिसांनी आरोपीला अटकही केली आहे. आरोपीचे नाव … Read more

‘दोषींवर कारवाई करा’; समनापूरच्या घटनेवर महसूलमंत्री विखे यांच्या सूचना

संगमनेर  – सकल हिंदू समाजाने मंगळवारी सकाळी रस्त्यावर उतरून विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. मोर्चा संपल्यावर घरी परतताना दोन गटांत दगडफेक झाली. परंतु पोलिसांनी वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला. रात्री पोलिसांनी या घटनेत 16 जणांना अटक केली आहे. निरपराध लोकांवर कारवाई होणार नाही याची काळजी घेऊन जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी मग तो … Read more

मुख्यमंत्री पदामागे छुपा गेम; प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला लगावला टोला

नगर – महाविकास आघाडीतील विविध नेत्यांच्या नावाने मुख्य मंत्रिपदाच्या दावेदारीची चर्चा सुरू असली, तरी यामागे काहीतरी छुपा गेम दिसतो, ज्यांच्या चौकशी सुरू आहेत तेच मुख्यमंत्री पदाचे दावेदार दिसू लागले आहेत, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी येथे लगावला. नगर जिल्ह्यातील शेवगाव येथे मागील महिन्यात झालेल्या हिंदू-मुस्लिम दंगलप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे … Read more

“राज्यातील बेपत्ता महिला-मुली मानवी तस्करीच्या जाळ्यात अडकल्या”; रुपाली चाकणकर यांचा गंभीर आरोप

मुंबई : मागील काही दिवसापासून राज्यातून महिला आणि मुली बेपत्ता होण्याच्या घटना वाढत चाललेल्या आहेत, याविशषयी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी  काही दिवसापूर्वी एक व्हिडीओ पोस्ट करून त्यांनी राज्यातील बेपत्ता महिलांची त्यांनी माहिती दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातून २०२२ मध्ये ५३५ महिला-मुली बेपत्ता झाल्याचा गंभीर आरोप रुपाली चाकणकर यांनी  केला आहे. … Read more

“लव्ह जिहादच्या नावे महिलांची, मुलींची फसवणूक..”; ‘द केरला स्टोरी’ वरून साध्वी प्रज्ञा यांचे मोठे विधान

मुंबई: ‘द केरला स्टोरी’  या चित्रपटावरून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अशात भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी याबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. एवढंच नाही तर केरल स्टोरी मध्ये जे दाखवण्यात आले आहे ते भोपाळमध्येही घडतंय असल्याचे साध्वी प्रज्ञा यांनी म्हटलं आहे. या चित्रपटावरून साध्वी प्रज्ञा यांनी, “लव्ह जिहादच्या नावे महिलांची, मुलींची फसवणूक केली … Read more

“‘लव्ह जिहाद’ हा भाजपसाठी तणाव निर्माण करण्याचा हुकूमी एक्का”; गुजरातमधील बेपत्ता मुलींवरून ठाकरे गटाची भाजपवर सडकून टीका

मुंबई : “द केरला स्टोरी” या चित्रपटावरून सध्या देशात  वादळ सुरु झालं आहे. त्यातच तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यात या चित्रपटांत चित्रपटाला बॅन केलं आहे. तर भाजपकडून हा प्रोपागंडा चालवण्यात येत असल्याचा आरोप अनेक नेत्यांकडून करण्यात येत आहे. याच मुद्द्यावरुन शिवसेनेच्या (ठाकरे गट ) सामनाच्या अग्रलेखामधून भाजपवर टीका करण्यात आली आहे. यातून मागच्या पाच वर्षात … Read more

‘निरंजन डावखरेंनी मुस्लिम भगिनीशी विवाह केला’; लव्ह जिहादच्या बॅनरवरुन आव्हाडांची टीका

मुंबई – श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर लव्ह जिहादविरोधी कायदा आणण्यासाठी मागणी केली जात आहे. याशिवाय लवकरात लवकर आरोपी आफताबला फाशी देण्याची देखील मागणी केली जात आहे. लव्ह जिहाद धर्मांतर आणि लँड जिहादविरोधी कायदा पूर्ण देशभर लागू करण्याकरता अॅड.निरंजन डावखरे यांनी हिंदू जनजागरण धर्मसभेचे आयोजन केले आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद आव्हाड यांनी अॅड.निरंजन डावखरे यांच्यावर … Read more

लव्ह जिहादचा मुद्दा केवळ राजकीय स्वार्थासाठी – अजित पवार

सांगली – लव्ह जिहादचा मुद्दा केवळ राजकीय स्वार्थासाठी उपस्थित केला जात आहे. या मुद्‌द्‌यावर जातीय तेढ निर्माण केले जात असून, समाजात विष पेरण्याचे काम सुरु आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी भाजपवर केली. कासेगावमध्ये येथील क्रांती वीरांगणा इंदुमती पाटणकर यांच्या स्मारकाचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, … Read more