INDIA आघाडीला आणखी परिश्रम घ्यावे लागतील ! फारूख अब्दुल्ला यांनी स्पष्टचं सांगितलं

नवी दिल्ली – तीन राज्यांतील भाजपच्या (Bjp) विजयानंतर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून जम्मू काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला (Farukh Abdulla) यांनीही याबाबत भाष्य करताना आघाडीला अधिक परिश्रम घ्यावे लागतील असे म्हटले आहे. (India Aghadi) फारूख अब्दुल्ला म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या विजयाचा इंडिया आघाडीवर फारसा परिणाम होणार … Read more

“जिंकलेली निवडणूक कॉंग्रेसने घालवली” संदीप दीक्षित यांची संतप्त प्रतिक्रिया

नवी दिल्ली- कॉंग्रेसच्या मध्य प्रदेशातील पराभवानंतर कॉंग्रेस नेते (Congress) आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत शीला दीक्षित (Sheela dixit son) यांचे पुत्र संदीप दीक्षित (Sandeep dixit) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. कॉंग्रेसने जिंंकलेली निवडणूक तेथे घालवली असे दीक्षित यांनी म्हटले आहे. (4 state election result) माध्यमांशी बोलताना दीक्षित म्हणाले, पराभवानंतर आमचा पक्ष कधीच त्याची समीक्षा करत … Read more

‘माइक्रो मॅनेजमेंट’ हीच भाजपच्या यशाची ‘गुरुकिल्ली’!

नवी दिल्ली (वंदना बर्वें) – राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशच्या भरघोष जनादेशामुळे भाजपमध्‍ये आनंदाची लहर निर्माण झाली आहे. या यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे असले तरी भाजपच्‍या बुथ मॅनेजमेंटच्या नियोजनाला देखील देण्यात येत आहे. याशिवाय गृहमंत्री अमित शहा यांनी मध्यप्रदेश आणि छत्तीसगढची जबाबदारी घेतल्यामुळे देखील भाजपला हे यश मिळाले असल्याची चर्चां राजधानीतील राजकीय वर्तुंळात … Read more

अवघ्या 16 मतांनी हुकली आमदारकी.. तर कुठे एक लाखाने मारली बाजी ! 4 राज्यांच्या निकालानंतर ‘या’ जागांची जोरदार चर्चा

नवी दिल्ली – माझ्या एका मताने असा काय फरक पडणार आहे, ही विचारसरणी ज्या मतदारांची असते, त्यांनी हे जाणून घ्यावे की, प्रत्येक मतामध्ये एक आगळी शक्ती असते. छत्तीसगडमधील कांकेरमध्ये काँग्रेसचे शंकर ध्रुव यांना जर आणखी १७ मते मिळाली असती, तर ते विजयी झाले असते. पराभवाचा हा सर्वात कमी फरक चार राज्यांतील विधानसभा जागांपैकी सर्वात विक्रमी … Read more

भाजप कोणत्या राज्यांमध्ये सत्तेत आहे? देशाच्या ४१ टक्क्यांहून अधिक लोकसंख्येवर स्वबळावर राज्य

नवी दिल्ली – मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे भाजप आता देशाच्या ४१ टक्क्यांहून अधिक लोकसंख्येवर स्वबळावर राज्य करेल, तर राजस्थान आणि छत्तीसगडमधील पराभवानंतर राष्ट्रीय पक्ष समजला जाणारा काँग्रेस अवघ्या तीन राज्यांपुरता मर्यादित झाला आहे. त्याच वेळी, दिल्ली आणि पंजाबमधील सत्ताधारी आम आदमी पार्टी (आप) राष्ट्रीय पक्षांमध्ये तिस-या क्रमांकावर आहे. केंद्रासह उत्तराखंड, उत्तर … Read more

काँग्रेससाठी आनंद थोडा, दु:ख जास्त

नवी दिल्ली  – कॉंग्रेसकडून विधानसभा निवडणुकांत चांगली कामगिरी होण्याचे दावे केले जात होते. प्रत्यक्षात, त्या निवडणुकांचे निकाल कॉंग्रेसला थोडी खुशी आणि जादा गम देणारे ठरले आहेत. निवडणुकांना सामोऱ्या गेलेल्या राज्यांत प्रचारावेळी कॉंग्रेसला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत होते. त्यामुळे निवडणुकांत कॉंग्रेसचा वरचष्मा राहण्याची चर्चा होती. काही मतदानोत्तर चाचण्यांनी तर कॉंग्रेसला तीन राज्यांत यश मिळण्याचा अंदाज … Read more

सायंकाळी 7 नंतर निकालाचे आकडे बदलले; कोणाला किती जागा पहा

Assembly Election 2023: चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल येऊ लागले आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणाच्या भवितव्याचा आज संध्याकाळपर्यंत निर्णय होईल. जसजशी वेळ पुढे सरकत आहे तसतसे चित्र स्पष्ट होत आहे. तेलंगणा वगळता इतर तीन राज्यात ट्रेंडमध्ये भाजप काँग्रेसपेक्षा आघाडीवर आहे. सायंकाळी 7 नंतरचे चार राज्यातील निकाल – तेलंगणा (119) – भाजप 8, काॅंग्रेस … Read more

Rahul Gandhi : “विचारधारेची लढाई सुरूच राहील…’; निवडणूकीच्या निकालावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

Rahul Gandhi : विधानसभा निवडणूकीच्या विजयानंतर भाजपच्या नेत्यांच्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ मध्ये मतदारांनी बीजेपीच्या बाजूनं कौल दिला आहे. या राज्यांमध्ये बीजेपीला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे दिसून आले आहे. कॉग्रेसचे राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांच्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी परखड शब्दांत टीका केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, अश्यातच आता आजच्या निकालावर कॉंग्रेस … Read more

Nana Patole : ‘ज्या त्रुटी राहिल्या त्याचा अभ्यास करून पुढे जाऊ’; नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

Nana Patole : देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल ( Election Results 2023 ) आज समोर येतोय. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीगडमध्ये भाजपला मोठा विजय मिळताना दिसतोय, तर काँग्रेसच्या हातून राजस्थान आणि छत्तीसगडमधील सत्ता निसटताना दिसत आहे. याशिवाय मध्य प्रदेशातही काँग्रेसला मोठा फटका बसताना दिसतोय. फक्त तेलंगणात काँग्रेसला मोठं यश मिळताना दिसत आहे. निकालाच्या समोर आलेल्या … Read more

निवडणूक झाली, निकालही लागला… आता गॅस सिलिंडर ४५० रुपयांना?

नवी दिल्ली – मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा राज्यातील निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. दुपारी चार वाजतापर्यंत तेलंगणा वगळता इतर तीन राज्यांमध्ये भाजपने मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. अर्थात याठिकाणी भाजप सत्ता स्थापन करेल. निवडणूक प्रचारादरम्यान, भारतीय जनता पक्षाकडून प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात विविध आश्वासने दिली होती. ती आता पूर्ण होतील अशी अपेक्षा नागरिकांना असून उज्वला योजनेतील … Read more