Maratha reservation: शरद पवारांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड

जालना – जालना येथील अतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर आंदोलनाने व्यापक रूप घेतले आहे. राज्यातील अनेक भागात या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. काही ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात येत असून काही ठिकाणी रास्तारोकोही करण्यात येत आहे. विविध पक्षांचे नेते लोकप्रतिनिधी आंदोलन कर्त्यांची भेट घेत आहेत. अशातच अंतरवाली सराटी येथे … Read more

Maharashtra : पालघरमधील बोगस कॉल सेंटरचा पोलिसांनी केला पर्दाफाश; कॅनडामधील…

पालघर :- राज्यातील पालघर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एका बोगस कॉल सेंटरचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या सेंटरमधून कॅनडामधील लोकांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 23 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी शुक्रवारी-शनिवारी मध्यरात्री वाडा तालुक्‍यातील नाणे गावातील एका गृहनिर्माण संकुलातील सहा फ्लॅटमधे कार्यरत असलेल्या कॉल सेंटरवर छापा टाकून ही कारवाई केली. या कॉल … Read more

Maharashtra Police : राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल; 449 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

मुंबई – राज्यातील पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहे. जून महिन्यात सुरू करण्यात आलेल्या वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि निरीक्षकांच्या पदोन्नती आणि बदली नंतर गृह विभागाने पुन्हा एकदा राज्यातील 449 पोलिस निरीक्षकांच्या बदलांचे आदेश काढले आहेत. या आदेशानुसार राज्य पोलिस दलात कार्यरत असलेल्या 449 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांमध्ये 336 … Read more

नगर शहरातील मिरवणूक मार्गात होणार बदल; 30 जूनपर्यंत हरकती मागविल्या

नगर – नगर शहरात भविष्यकालीन मिरवणुकांसाठी प्रशासकीय सोईच्यादृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – इंपिरियल चौक – माळीवाडा वेस – आयुर्वेद कॉर्नर – अमरधाम समोरून- नेप्तीनाका- दिल्लीगेट असा मार्ग प्रस्तावित करण्यात आला असून या मार्गाच्या निश्‍चितीसाठी सूचना अथवा हरकत मागविण्यात आला आहेत. येत्या 30 जूनपर्यंत लेखी स्वरूपात गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय येथे समक्ष सादर करण्याचे आवाहन … Read more

कौतुकास्पद! दोन जिवलग मित्र एकाच वेळी बनले महाराष्ट्र पोलीस

डोर्लेवाडी : जिद्द आणि चिकाटी असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. खडतर परिस्थिती असताना देखील गेली अनेक वर्ष पोलीस भरतीची प्रॅक्टिस करून बारामती तालुक्यातील झारगडवाडी या गावातील दोन जिवलग मित्रांनी एकाच वेळी महाराष्ट्र पोलीस बनण्याचा बहुमान मिळवला आहे. कुलदीप सूर्यवंशी आणि कलीम सय्यद अशी महाराष्ट्र पोलीसात भरती झालेल्या दोन जिवलग मित्रांची नावे आहेत. कुलदीप सूर्यवंशी … Read more

Breaking News : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे; राज्यसरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई – मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय राज्यसरकारने घेलता आहे. राज्याचे माजी गृहमंत्री राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर त्यांनी 100 कोटी रुपये वसुली करण्याचे आदेश दिल्याचा आरोप करण्यात आला होता. राज्यसरकारच्या या निर्णयाचा विरोधी पक्षांनी तीव्र विरोध केला आहे. अनिल देशमुख यांनी परमबीर सिंग यांच्यावर केलेले सर्व आरोप मागे … Read more

स्वयंपाक घरात आढळला महिला PSIचा मृतदेह; घरातून दूर्गंधी आल्याने घटना उघडकीस

मुंबई – मुंबईच्या एका महिला पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घरातून दूर्गंध येऊ लागल्याने ही बाब उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शीतल एडगे (35) असे मृत महिलेचे नाव आहे. मागील दीड महिन्यापासून आजारपणामुळे त्या सुटीवर होत्या. अधिक माहितीनुसार, शीतल या मुंबईच्या कामगार नगर येथे भाड्याने राहत होत्या. बुधवारी संध्याकाळी त्यांच्या शेजाऱ्यांनी फोन … Read more

Breaking News : व्हॅन उलटून 17 पोलिस गंभीर जखमी

मुंबई – महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी सुरक्षा तैनातीसाठी पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी व्हॅन उलटल्याने झालेल्या अपघातात किमान 17 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कशेळी गावाजवळ सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमाराला हा अपघात झाला.प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू असल्याने तेथे बंदोबस्त ड्युटीसाठी पोलीस कर्मचाऱ्यांना राजापूरच्या … Read more

प्रेरणादायी! संसार, मुलं सांभाळून केलेल्या मेहनतीला यश; तीन मैत्रिणी एकाच वेळी बनल्या पोलीस, कौतुकाचा वर्षाव

पुणे – कठोर परीश्रमातून कोणतीही गोष्ट शक्य होते याची प्रचिती पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथे आली आहे. येथिल तीन मैत्रिनींनी पोलीस बनण्याचं स्वप्न सत्यात उतरवलं आहे. मीनाक्षी कर्चे, आरोही शिळीमकर, दीपाली राणे अशी एकाचवेळी महाराष्ट्र पोलीस दलात भरती झालेल्या तीन मैत्रिणींची नावे आहेत. या तिन्ही मैत्रिणी येथील ‘विवेकानंद अभ्यासिकेत अभ्यास करत असत. मीनाक्षी यांची … Read more

1 लाखाची सुपारी देऊन केली पतीची हत्या; पोलिसांनी असा लावला गुन्ह्याचा छडा

मुंबई – सुपारी देऊन पतीची हत्या केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी मुंबईतील एका महिलेला अटक केली आहे. पालघर जिल्ह्यातील नाल्यात एका मजुराचा मृतदेह आढळून आला आहे. हत्येच्या आरोपाखाली एका जोडप्याला पोलिसांनी अटकही केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला पतीपासून मुक्ती मिळवायची होती. पतीला मारण्यासाठी तीने एका जोडप्याला सुपारी दिली. आरोपी मुंबईतील गोरेगाव येथील रहिवासी आहेत. पोलिसांच्या गुन्हे … Read more