Maharashtra Police : व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल तक्रारींचाही आता डायल-112 मध्ये समावेश

पुणे :- प्राथमिक आणि द्वितीय संपर्क केंद्र डायल-112 या कार्यप्रणालीत आता व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल इत्यादी माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचाही समावेश करण्यात आला आहे. या एकत्रित प्रणालीचे लोकार्पण आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यातील गुन्हे आणि कायदा-सुव्यवस्थेवरील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या परिषदेच्या प्रारंभी हे लोकार्पण त्यांनी केले. महाराष्ट्र पोलिस आणि … Read more

Maharashtra Police: 63 किलोमीटर स्केटिंग करून पोलीस विनोद अहिरे यांनी केला विक्रम

जळगाव – २ जानेवारीला महाराष्ट्र पोलीस दलाला 63 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त २ जानेवारीपासून महाराष्ट्र पोलीस दल पोलीस सप्ताह म्हणून साजरा करीत आहे. त्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस दलातील राष्ट्रीय खेळाडू पोलीस कर्मचारी विनोद अहिरे यांनी पोलीस मुख्यालयातील रोड ट्रॅकवर सलग 63 किलोमीटर स्केटिंग केली. अशा अनोख्या पद्धतीने पोलीस स्थापना दिन साजरा करणारे ते महाराष्ट्रातीलच … Read more

Mumbai : सैन्य दलाच्या जवानांप्रमाणे पोलीसांबद्दल जनमानसात आदराची भावना – राज्यपाल कोश्यारी

मुंबई : राज्याचे पोलीस दल संपूर्ण देशात सर्वश्रेष्ठ मानले जाते. सैन्य दलांच्या जवानांप्रती लोकांमध्ये जशी आदराची भावना आहे, तशीच भावना राज्याच्या पोलीसांप्रती देखील आहे. करोना प्रकोपाच्या काळात डॉक्टर्स, नर्सेस यांच्या प्रमाणेच राज्यातील पोलीसांनी देखील जीवाची पर्वा न करता कार्य केले त्यामुळे राज्य पोलीस अभिनंदनास पात्र आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. राज्यपाल कोश्यारी … Read more

ऐतिहासिक ! पोलीस भरतीत आता तृतीयपंथीयांनाही मिळणार संधी

मुंबई :  मुंबई उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. हा निर्णय तृतीयपंथीयांसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. कारण आता  पोलीस भरतीत तृतीयपंथीयांना देखील संधी मिळणार आहे.पोलीस भरतीमध्ये यापुढे तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय ठेवण्यास तयार असल्याची माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला दिली. त्यानंतर आता न्यायालयाने सरकारला नियमावली सुधारण्याचे आदेश दिले असून फेब्रुवारी 2023 पर्यंत राज्य सरकार पोलीस … Read more

1,082 पोलीस कर्मचाऱ्यांना पदके; महाराष्ट्रातील 42 पोलिसांचा समावेश

नवी दिल्ली – स्वातंत्र्य दिनानिमित्त एकूण 1,082 पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदके प्रदान करण्यात आली आहेत. 347 शौर्य पुरस्कारांपैकी 204 जवानांना जम्मू आणि काश्‍मीरमधील त्यांच्या शौर्याबद्दल, 80 जवानांना नक्षलप्रभावित भागात आणि 14 जवानांना ईशान्य भारतातील त्यांच्या शौर्याबद्दल सन्मानित केले जाणार आहे. शौर्य पुरस्कार प्राप्त करणार्यांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 109, जम्मू आणि काश्‍मीर पोलीस दलाच्या 108, … Read more

नुपूर शर्माला पकडण्यासाठी महाराष्ट्र पोलिस दिल्लीत; पण पाच दिवसांपासून ठावठिकाणा लागेना

नवी दिल्ली – भाजपच्या निलंबीत प्रवक्‍त्या नुपूर शर्मा यांना अटक करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे एक पथक दिल्लीला गेले आहे. पण त्यांचा ठावठिकाणा अजून महाराष्ट्र पोलिसांना मिळालेला नाही. गेल्या पाच दिवसांपासून त्या गायब असल्याचे वृत्त आहे. नुपूर शर्मांच्या विरोधात त्यांनी प्रेषित महंमद यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने रझा अकादमीने पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार तेथील पोलिसांनी त्यांच्या … Read more

नवनीत राणांच्या तक्रारीची संसदीय समितीकडून गंभीर दखल; महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांना दिल्लीत हजर राहण्याचा आदेश

मुंबई – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या तक्रारीची गंभीर दखल संसदीय समितीने घेतली आहे. खार पोलीस ठाण्यात आपल्याला चुकीची वागणूक दिल्याचा आरोप राणांनी आपल्या तक्रारीत केला आहे. त्यांच्या याच आरोपांवर आता दिल्लीत चौकशी करण्यात येणार आहे. संसदीय समितीने महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांना 15 जूनला दिल्लीत हजर राहण्याचा आदेश दिला आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे … Read more

‘एएमबीआयएस’ प्रणाली ठरणार फायद्याची

पुणे –राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी आणि पोलिसांना मदत म्हणून “एएमबीआयएस’ अर्थात “ऑटोमोटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम’ महत्त्वाची भूमिका पार पडणार आहे. ही यंत्रणा पोलीस ठाणे स्तरापर्यंत राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या यंत्रणेअंतर्गत सुमारे 6.5 लाख अटक व शिक्षाप्राप्त आरोपीचा अभिलेख संगणकीकृत करण्यात आलेला आहे. दरम्यान, … Read more

वर्दीतील देवमाणूस.! कडक उन्हात माकडाची पाण्यासाठी वणवण, पोलीस कर्मचाऱ्याने केले असे काही…

पुणे – गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. मेणच काय तर माणूसही वितळेल असं भयानक ऊन सध्या पडत आहे. आपण माणसे उन्हापासून वाचण्यासाठी अनेक गोष्टींचा वापर करू शकतो, परंतु मुक्या जनावरांचे मात्र अशावेळी हाल होताना दिसून येत आहे. त्यामुळे त्यांची देखील काळजी घेणं आवश्यक आहे. सध्या सोशल मीडियावर असाच … Read more

जे गुजरात पोलिसांना नाही जमलं ते महाराष्ट्र पोलिसांनी करून दाखवलं, 23 वर्षांपासून फरार कैद्याला ‘असे’ पकडले

मुंबई – गुजरातमध्ये कौटुंबीक वादातून पतीने पत्नीला जिवंत जाळले होते. हा आरोपी गुजरातमधील बडोदा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. कारागृहातून तो फरार झाला होता. त्यानंतर गुजरात पोलीस या आरोपीचा गेल्या 23 वर्षापासून शोध घेत होते. हा कैदी नाव बदलून महाराष्ट्रात नोकरी करत असल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांना मिळाली, त्यावरून गुन्हे शाखेने तत्काळ छापा टाकून त्याला अटक … Read more