Pune: महापालिकेकडूनच अनधिकृत खोदाई

पुणे – पावसाळा सुरू झाल्याने शहरात केवळ तातडीच्या व अत्यावश्यक कामांसाठीच रस्ते खोदाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. हे काम करतानाही पथ विभागाला कल्पना देऊनच काम करण्याचे आदेश आहेत. तरीही, सिंहगड रस्त्यावर महापालिकेच्या प्रकल्प विभागाने उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या ठेकेदारास परस्परच खोदाईस परवानगी दिली असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर पथ विभागाने तातडीने प्रकल्प विभागास … Read more

पुणे जिल्हा | महावितरणच्या उत्तराने शेतकरी हवालदिल

राहू, {भाऊ ठाकूर} – ‘दैव देत आणि कर्म नेत” ही जुनी म्हण राहू बेट परिसराला तंतोतंत लागू होत आहे. राहू बेट परिसर हा पूर्ण बागायत परिसर आहे. त्यामुळे पाण्याची मुबलकता बऱ्यापैकी आहे. परंतु लोडशेडीगमुळे नदीत पाणी असूनही पाणी देत नाही. महावितरणच्या अधिकाऱी, कर्मचाऱ्यांना प्रश्‍न विचारले तर ‘वरून’ असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हा ‘वरून’ … Read more

Pune: सहा लाख पुणेकरांचे पाणी बंद

पुणे – सिंहगड रस्ता, कात्रज, सहकारनगर, धनकवडी तसेच इतर काही भागांस पाणीपुरवठा करणाऱ्या वडगाव जलशुद्धीकरण केंद्रातील वीजपुरवठा करणारी मुख्य वाहिनी सकाळी पाचच्या सुमारास जळाली. त्यामुळे तब्बल सहा लाख पुणेकरांना शनिवारी फटका बसला. सिंहगड रस्त्यापाठोपाठ पुढे, सहकारनगर, कात्रज, धनकवडी, आंबेगाव भागांतील पाणीपुरवठाही विस्कळीत झाला. पाणी न आल्याने या भागातील नागरिकांना विकतच्या पाण्याचा आधार घ्यावा लागला. दुपारी … Read more

Pune: डांबरीकरण केलेला रस्ता तीन दिवसांत खोदला

पुणे – महापालिकेकडून अवघ्या महिन्याभरापूर्वीच शहरात कोणत्याही प्रकारची खोदाई करायची झाल्यास खोदाई काम करणाऱ्या यंत्रणा आणि पथ विभागात समन्वय ठेवला जाईल तसेच नव्याने केलेल्या रस्त्यावर अतिरिक्त आयुक्तांच्या मान्यतेशिवाय खोदाईस परवानगी दिली जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, महिन्याभराच्या आत पालिकेच्या पथ विभागाला आपल्या निर्णयाचा विसर पडला आहे. सदाशिव पेठेतील टिळक स्मारक मंदिर ते … Read more

विद्युत टॉवर लाईन पाडून महावितरण कंपनीचे साडेतीन कोटींचे नुकसान केलेल्या आरोपातून आरोपींची निर्दोष मुक्तता

बारामती – विद्युत टॉवर लाईन पाडून महावितरण कंपनीचे सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे नुकसान केलेल्या आरोपातून दोन आरोपींची येथील जिल्हा न्यायाधीश दरेकर यांनी निर्दोष मुक्तता केली. पाटस (ता. दौंड) हद्दीमध्ये २०२१ मध्ये आरोपी प्रदीप माणिक खारतोडे व संजय बापूराव गाढवे यांनी महावितरण कंपनीच्या टावर लाईनचे तीन टावर गॅस कटरने कापून सदर शासकीय सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. … Read more

PUNE: गृहनिर्माण संस्थांच्या तक्रारीसाठी व्यासपीठ

पुणे – राज्यभरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या (सोसायटी) सदस्यांच्या तक्रारी ऑनलाइन माध्यमातून सोडविण्यासाठी सहकार संवाद संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून सोसायटीशी निगडित सर्व समस्यांबाबत रहिवाशांना घरबसल्या तक्रार नोंदविता येणार आहे. या संकेतस्थळावर आलेल्या तक्रारी दोन महिन्यात निकाली काढण्याच्या सूचना सहकार विभागाने सर्व जिल्हा निबंधकांना दिल्या आहेत. राज्यात सुमारे एक लाख पंधरा हजार नोंदणीकृत … Read more

PUNE: यंदा पावसाळयात खड्डेमुक्त रस्ते!

पुणे – दरवर्षी शहरात पावसाळ्यात पुणेकरांना खड्डेमय रस्त्यांचा सामना करावा लागतो. मात्र, खड्डेमुक्त रस्त्यांसाठी पालिका प्रशासन यंदा पाच महिने आधीच सरसावले आहे. शहरात दि. ३० एप्रिलनंतर महापालिकेच्या वेगवेगळया विभाग तसेच खासगी कंपन्यांनाही खोदाईस मनाई करण्यात आली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांंनी याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यापूर्वी ढाकणे यांनी महापालिकेचा पथ, मलनि:सारण आणि पाणीपुरवठा विभागांची … Read more

PUNE: महावितरणच्या औद्योगिक ग्राहकांसाठी ‘स्वागत सेल’ कार्यान्वित

पुणे – महावितरणच्या सर्व औद्योगिक ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी पुणे परिमंडल अंतर्गत रास्तापेठ, गणेशखिंड व पुणे ग्रामीण मंडलस्तरावर स्वतंत्र स्वागत सेल कार्यान्वित करण्यात आले. यामुळे तक्रारीचे प्रमाण कमी होत आहे. पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांच्या हस्ते या सेलचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्यासह उद्योजक व औद्योगिक संघटना प्रतिनिधींची उपस्थिती होती. रास्तापेठ … Read more

PUNE: नवीन सेवा जोडणी वेळेतच द्या; महावितरणचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

पुणे – कृषिपंप वगळून उर्वरित सर्व वर्गवारीतील ग्राहकांना तत्काळ नवीन वीजजोडणी किंवा वीजभार वाढवून देण्यासाठी आवश्यक पायाभूत वीजयंत्रणा उभारण्याचे काम महावितरणकडून करण्यात येत आहे. त्यामुळे वीजग्राहकांना तत्काळ नवीन वीजजोडणी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी नवीन वीजजोडणीसाठी नवीन सेवा जोडणी योजनेचा पर्याय ग्राहकांना सर्वप्रथम देण्यात यावा तसेच कृती मानकांप्रमाणे निश्चित केलेल्या कालावधीत सेवा देण्यात यावी, असे आदेश महावितरणकडून … Read more

PUNE: सव्वा लाख ग्राहकांनी नाकारले छापील वीजबिल

पुणे – वीजबिलांसाठी छापील कागदाचा पूर्णपणे वापर बंद करत पुणे जिल्ह्यात १ लाख २३ हजार ३९६ पर्यावरणस्नेही वीजग्राहकांनी केवळ ई-मेल आणि एसएमएसचा पर्याय निवडला आहे. या ग्राहकांनी गो-ग्रीन योजनेला प्रतिसाद दिला आहे. यातून १ कोटी ४८ लाख ७ हजार ५२० रुपयांची वार्षिक बचत होत आहे, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली. गो-ग्रीन योजनेनुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त … Read more