पुणे – वीजग्राहकांना आता अतिरिक्त सुरक्षा ठेव भरावी लागणार

पुणे – पुणे परिमंडलातील वीजग्राहकांना एप्रिल, मे महिन्याच्या देयकांसोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी स्वतंत्र देयक देण्यात येत आहेत. या सुरक्षा ठेवीच्या रकमेचा ग्राहकांनी भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांनी महावितरणकडे सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक आहे. आर्थिक वर्षातील एका महिन्याच्या सरासरी एवढे देयक सुरक्षा ठेव म्हणून … Read more

पुणे – मनुष्यबळ, खातेनिहाय पुनर्रचनेला अखेर मूहूर्त

महावितरणच्या निर्णयाला कामगार संघटनांचा हिरवा कंदील : दहा मंडलामध्ये अंमलबजावणी पुणे – महावितरणचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मनुष्यबळ आणि खातेनिहाय पुनर्रचनेला अखेर जूनचा मूहूर्त मिळाला आहे. प्रशासनाच्या 14 व्या वर्धापनदिनी म्हणजेच 14 जूनपासून त्याची अंमलबजावणी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे, प्रशासनाच्या या निर्णयाला कामगार संघटनांनीही सहमती दर्शवली आहे. ही अंमलबजावणी प्रायोगिक तत्वावर करण्यात येणार आहे, … Read more

ऐतिहासिक रायरेश्‍वर पठार होणार ‘प्रकाशमान’

महावितरणकडून उभारण्यात येणाऱ्या वीजयंत्रणेचे काम पूर्णत्वाकडे 100 वीजखांब, एक रोहित्र उभारण्याचे काम पूर्ण पुणे – ऐतिहासिक रायरेश्‍वर पठारावर अन्‌ समुद्रसपाटीपासून सुमारे 4 हजार 750 फूट उंचीवर वसलेल्या माळवाडी व धानवली (ता. भोर, जि. पुणे) या गावांना वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणकडून उभारण्यात येणाऱ्या वीजयंत्रणेचे काम पूर्णत्वाकडे आहे. या गावांमध्ये सुमारे 100 वीजखांब व एक रोहित्र उभारण्याचे काम … Read more

पुणे – वीजयंत्रणेच्या देखभाल, दुरुस्तीचे खासगीकरण

पुणे – महावितरण प्रशासनाने वीजयंत्रणेची देखभाल, दुरुस्ती आणि उपकेंद्रे, रोहित्रांची निगा राखण्याचे काम खासगी ठेकेदारांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तीन स्थानिक विद्युत परवानाधारकांना ठेका देण्यात येणार आहे, त्याच्या निविदा प्रशासनाच्या वतीने काढण्यात आल्या आहेत. वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाच्या वतीने आतापर्यंत कोट्यवधींचा निधी खर्च केला आहे. वीज यंत्रणेची, रोहित्रांची आणि उपकेंद्राची देखभालची जबाबदारी अधिकारी … Read more

पुणे – सौर ऊर्जा प्रकल्प अजूनही बासनातच

महावितरणने मीटरच न दिल्याने प्रकल्प गुंडाळलेला जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची अडचण पुणे – जिल्हा परिषदेसह इतर पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्रावर सौरऊर्जा प्रकल्पासाठीचे सौर पॅनल बसवण्याचे काम मार्च अखेर झाले. मात्र, त्यासाठीची आवश्‍यक असणारी महावितरणकडून बसवण्यात येणारे मीटर न बसवल्यामुळे कुठलाच प्रकल्प कार्यान्वित झालेला नाही. जिल्हा परिषदेकडून सर्व प्रक्रिया पूर्ण केली असून, मात्र मीटर अभावी … Read more

पुणे – वीज वाहिन्या भूमीगत करण्याचा येणार वेग

परिमंडलांना काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची डेडलाईन निधी उपलब्ध होवूनही परिमंडलांच्या उदासिनतेमुळे थांबले काम पुणे – महावितरण प्रशासनाने शहरांसह तालुक्‍यांच्या गावांमध्ये भूमीगत वीजवाहिन्या टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी संबंधित परिमंडलांना अपेक्षित निधी दिला आहे. मात्र, बहुतांशी परिमंडलांनी अद्यापही ही कामे सुरू केलेली नाहीत. त्याची दखल घेत परिमंडलांना विचारणा करण्यात आली आहे. त्याशिवाय ही कामे पूर्ण … Read more

पुणे – वीजजोडणीचा अर्ज ऑनलाइनच करावा

पुणे – औद्योगिक ग्राहकांसाठी राज्यभरात वीज मीटरचा पुरवठा मुबलक करण्यात आला असून नवीन औद्योगिक ग्राहकांनी वीजजोडणीचा अर्ज ऑनलाइनच करावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी केले. पुणे व कोंकण प्रादेशिक विभागातील औद्योगिक ग्राहकांसोबत प्रकाशगड मुख्यालयातून व्हिडीओ कॉन्फरेन्सद्वारे कुमार यांनी थेट संवाद साधला. औद्योगिक ग्राहक संघटना व त्यांचे प्रतिनिधी यावेळी प्रामुख्याने उपस्थित … Read more

ड्रोन, पीटीझेड कॅमेऱ्याची खरेदी रखडली

पुणे – जिल्ह्याच्या वनहद्दीत देखरेख करण्यासाठी तसेच वन्यप्राण्यांच्या विविध हालचालींवर नजर ठेवता यावी यासाठी वनविभागाला ड्रोन आणि पीटीझेड कॅमेरा उपलब्ध करून देण्याची मागणी वनविभागाकडून करण्यात आली होती. ही मागणी मंजूर होऊन सहा महिने उलटले तरी अद्यापही विभागाला ते उपलब्ध झालेले नाहीत. विभागाकडून काढण्यात आलेल्या निविदांना पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने कॅमेरे उपलब्ध झाले नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात … Read more