“पोकळ घोषणांशिवाय शिंदे सरकार काही करत नाही”

मुंबई – एकेक करीत राज्यातील सर्व महत्वाचे प्रकल्प राज्याच्या बाहेर चालले आहेत. यातील एकही प्रकल्प थांबवण्यात शिंदे-फडणवीस सरकारला यश येत आलेले नाही. हे सरकार केवळ पोकळ घोषणाबाजी करण्याशिवाय काहीही करीत नाही अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. उर्जा उपकरण निर्मीती झोन मिळवण्यासाठी महाराष्ट्र प्रयत्नशील असताना हा प्रकल्पही मध्यप्रदेशच्या वाट्याला गेला असल्याची … Read more

आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातला गेल्याने मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई – महाराष्ट्रातील नागपूरमध्ये होणारा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट आता गुजरातमधील वडोदऱ्याला होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. लाखो तरूणांना रोजगार देणारा हजारो कोटींचा वेदांता -फाॅक्सकाॅन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर आता तब्बल 22 हजार कोटींचा हा एअरक्राफ्ट प्रकल्पही गुजरातला गेल्याने शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका होत आहे. गुजरातमध्ये 30 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होणार … Read more

शिंदे गटातील नाराज आमदार भाजपात जाणार? ; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचे विधान

मुंबई :  राज्यात नव्याने स्थापन झालेल्या भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारमध्ये वरवर सारं काही आलबेल असल्याचे दिसत असले तरी  शिंदे गटातील काही आमदार मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज असल्याच्या चर्चा जोर धरत आहे. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी शिंदे गटातील नाराज आमदारांबाबत सूचक विधान केले आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटातील आमदार … Read more

“ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्याचा अधिकार ईडी सरकारला आहे का?”

Chandrkant Patil on Ulhasnagar Firing

मुंबई – ईडी अर्थात एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारबद्दल संविधानिक प्रश्न उपस्थित असताना मागच्या ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय, केलेल्या शिफारशी रद्द करण्याचा त्यांना अधिकार आहे का? असा सवाल राष्ट्रवादीचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. तसेच राज्यात सुडाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील ठाकरे सरकारमधील शिफारस केलेल्या विधान … Read more

कमी बॉल्सवर जास्त रन काढण्याच्या नादात ईडी सरकार लवकरच ‘रनआऊट’ होईल – महेश तपासे

मुंबई  –   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या मेट्रो ३ च्या चाचणीला आज हिरवा झेंडा दाखवला. दरम्यान, या कार्यक्रमा दरम्यान, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी “विघ्नहर्त्याने या राज्यावरील बरीचशी विघ्नं आता दूर केली आहेत. त्यामुळे आता विघ्नं येतील असं मला वाटत नाही,” असे म्हणत त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्यावर टीका केली आहे. … Read more

लोकोपयोगी निर्णय रद्द करून राज्य सरकार जनतेची उपेक्षा करतेय – महेश तपासे

मुंबई – मागील अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. हे निर्णय रद्द करण्याचा सपाटा शिंदे-फडणवीस सरकारने लावला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. यातून जनतेची फार मोठी उपेक्षा होत असल्याची टीकाही त्यांनी केली. मागील अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. हे निर्णय … Read more

काश्‍मिरी पंडितांना सुरक्षित आश्रय देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य, भाजपने केवळ त्यांच्या भावनांशी खेळ केला – राष्ट्रवादी काॅंग्रेस

मुंबई – काश्‍मिरातील हिंदू आणि काश्‍मिरी पंडितांच्या जीवाचे रक्षण करण्यात केंद्र अपयशी ठरल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या संबंधात राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे, यांनी म्हटले आहे की, काश्‍मीरातील हत्या प्रकरणाचे भाजपकडून मोठ्या प्रमाणावर भांडवल गेले जायचे. हेच लोक काश्‍मीर फाईल्स नावाच्या चित्रपटाच्या प्रचारात … Read more

पंतप्रधान मोदींच्या सत्तेची 8 वर्षे म्हणजे प्रशासनाची नसून कुशासनाची – महेश तपासे

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सत्तेची 8 वर्षे म्हणजे प्रशासनाची नसून कुशासनाची आहेत. आरएसएसच्या विचारसरणीने देशातील जातीय सलोखा बिघडवला जात आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. यावेळी वाढती महागाई, वाढलेली बेरोजगारी, लोकशाहीची दडपशाही, राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्यात अपयश, द्वेषाचे राजकारण, रुपयाची ऐतिहासिक घसरण, आर्थिक कुचंबणा, सामाजिक जडणघडणीची झीज … Read more

शरद पवार अन् बृजभूषण सिंह यांचे फोटो व्हायरल; राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण…”भाजपनेच राज ठाकरेंचा…”

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द करण्यासाठी महाराष्ट्रातून सूत्रे हलवली गेली, असा आरोप मनसेने केला आहे. मात्र मनसेने खासदार शरद पवार आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचा 2018 सालचा फोटो व्हायरल करुन जो संदर्भ जोडण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा राजकारणाशी काहीही संबध नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे … Read more

भाजपचे सत्तेत येण्याचे स्वप्न पूर्णपणे भंगले आहे – राष्ट्रवादी

मुंबई – राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजपकडून सरकारला बदनाम करण्याचे काम वेळोवेळी झाले आहे. पण भाजपचे सत्तेत येण्याचे स्वप्न पूर्णपणे भंगले आहे, असा टोला प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला आहे. भाजप समाजमाध्यमांवर व्यंगचित्रांच्या माध्यमातून राज्य सरकारला बदनाम करत आहे, यातून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप तपासे यांनी केला. … Read more