पुणे जिल्हा : मक्यावर किडीचा प्रादुर्भाव ; आधीच पाणीटंचाईने त्रस्त बळीराजा समस्येच्या गर्तेत

वाल्हे – यावर्षी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असतानाही जनावरांच्या हिरव्या चार्‍यांसाठी लागवड केलेल्या मका पिकांवर किडीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने आगोदरच तीव्र पाणीटंचाईने मेटाकुटीस आलेला शेतकरी मका पिकावरील किडीने चिंताग्रस्त होत आहे. यावर्षी पुरंदर तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थितीती निर्माण झाली असून दावणीची जनावरे जागविण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत. अशातच, जनावरांना चारा उपलब्ध व्हावा यासाठी शेतात केलेली … Read more

चिंबळी| विषम वातावरणाचा रब्बीला फटका

ज्वारी

चिंबळी,(वार्ताहर) – जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दुपारी उकाडा जाणवू लागला आहे. किमान तापमानातही काहीअंशी वाढ झाली आहे. विषम वातावरणाचा रब्बी, वेलवर्गीय व फळ पिकांनाही फटका बसत आहे. यंदा हुडहुडी भरविणारी थंडी मागील काही दिवसच होती मात्र; रब्बी पिकांसाठी पोषक असे वातावरण यंदा न मिळल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती बळीराजा व्यक्त करीत आहे. एक फेब्रुवारीनंतर … Read more

मका-बाजरी खरेदीची मर्यादा वाढवावी; छगन भुजबळ यांची केंद्र सरकारकडे मागणी

मुंबई – केंद्र शासन राज्य सरकारच्या माध्यमातून किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेअंतर्गत मका, बाजरी या पिकाची खरेदी करत असते. केंद्र सरकार मका आणि बाजरी खरेदीसाठी प्रत्येक वर्षी मर्यादा आखून देत असते. पण या वर्षीच्या अधिक उत्पादनामुळे खरेदीची मर्यादा वाढवावी, अशी मागणी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी … Read more

मराठवाड्यासह विदर्भाला अवकाळी पावसाचा तडाखा

मुंबई : राज्यावर सध्या करोनाचे संकट घोंगावत असताना मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसासह झालेल्या गारपीटीमुळे मोसंबी, आंबा, डाळिंब, द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. तर, गहू, हरभरा, मका अशा रब्बी पिकांनाही याचा फटका बसला आहे. यात वाशिम, यवतमाळ, परभणी, जालना, जळगाव, अमरावती, वर्धा, धुळे, हिंगोली, औरंगाबाद या जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश … Read more

2019-20 या वर्षासाठी अन्नधान्य, तेलबिया आणि इतर पीकांचा दुसरा सुधारित अंदाज

नवी दिल्ली :  2019-20 या वर्षासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने महत्वाच्या पीकांच्या उत्पादनाचा दुसरा अंदाज प्रकाशित केला आहे. या वर्षात अनेक पीकांचे उत्पादन सर्वसाधारण पातळीपेक्षा जास्त राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दुसऱ्या अंदाजानुसार देशात 291.95 दशलक्ष टन विक्रमी अन्नधान्य उत्पादन होईल असे अनुमान वर्तवण्यात आले आहे. 2018-19 या वर्षातल्या 285.21 दशलक्ष टन … Read more

गव्हास पोषक वातावरण असल्याने शेतकरी समाधानी

गव्हाच्या क्षेत्रापैकी 93 टक्के क्षेत्रावर पेरणी, अजूनही पेरणी प्रगतीपथावर नगर  – जिल्ह्यात सद्या विविध पिकांची पेरणी प्रगतीपथावर असून यंदा गव्हाचीपेरणी सर्वात जास्त झाली असून एकुण सरासरीच्या 93 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून, अजूनही पेरणी प्रगतीपथावर आहे. त्या खालोखाल ज्वारीच्या पिकाला शेतकऱ्यांची पसंती असून सरासरी 54 टक्के क्षेत्रावर ज्वारीची पेरणी करण्यात आली असून उर्वरीत क्षेत्रातही पेरणी … Read more

ढगाळ वातावरणाचा रब्बी पिकांना फटका

वाई  – रेंगाळलेल्या परतीच्या पावसाने आधीच रब्बी हंगाम लेट झाला आहे. आता कुठे पिके उगवू लागली असतानाच दोन दिवसांपासून वाई तालुक्‍यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून अधूनमधून पावसाचा शिडकावादेखील होत आहे. या ढगाळ वातावरणाचा रब्बीच्या पिकांना फटका बसण्याची शक्‍यता निर्माण झाल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे. वाई तालुक्‍यात शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, … Read more

ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक चिंतेत

महेश जाधव मायणी – जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सततच्या बदलत्या वातावरणाचा फटका द्राक्षांच्या प्रतवारीवर होणार असल्यामुळे उत्पादकांना आर्थिक फटका बसणार आहे. महाराष्ट्रात द्राक्ष पंढरी अशी ओळख असणाऱ्या कलेढोण, मायणी परिसरातील द्राक्षांना ओल्या दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. महिनाभरापूर्वीच कलेढोण, मायणी आणि परिसरातील हजारो हेक्‍टर क्षेत्रावरील द्राक्षबागांचे नुकसान झाले … Read more