पुणे जिल्हा : ‘बाप्पा’ घडवण्यात कारागिरांचे गुंतले हात…

अडीच महिने बाकी असतानाही कुरुळी, मरकळमध्ये मूर्तिकारांची जोरदार लगबग सुरू चिंबळी : गणेशोत्सवास अजून अडीच महिने बाकी आहेत, तरीही कुरुळी, मरकळ येथील गणेशमूर्ती शाळांमध्ये मूर्तिकारांची जोरदार लगबग सुरू झाली आहे. सुमारे अडीच महिने अगोदरच बाप्पाच्या मूर्ती बनविण्यात मूर्तिकार गुंतले आहेत. महत्त्वपूर्ण अशा गणेशोत्सवाला यावर्षी 19 सप्टेंबरला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे खेड तालुक्‍यातील कुरूळी व मरकळमधील … Read more

‘माझ्या बॅगेत बॉम्ब आहे’; इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याच्या धमकीने खळबळ

नवी दिल्ली : गुरुवारी पाटणाहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात एका प्रवाशामुळे चांगलाच गोंधळ निर्माण झाला. एका प्रवाशाने  त्याच्याजवळ बॉम्ब असल्याचे सांगितल्यानंतर सर्व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच बॉम्ब निकामी पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत विमानाची तपासणी करण्यात येत आहे. ज्या प्रवाशाने पाटणा विमानतळावर आपल्या बॅगेत बॉम्ब असल्याची धमकी दिली होती, त्याची बॅग … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात ट्विटरवर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या निखील भामरे या ट्विटर युजर विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री केतकी चितळेने देखील शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. … Read more

“पंतप्रधान मोदींच्या भारतात मुस्लीम असणं कसं वाटतं?”; फारुख अब्दुल्ला म्हणाले,” ते संपूर्ण देशाला…”

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी पंतप्रधान मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. काश्मीरमधून ३७० कलम रद्द करण्याचा मुद्दा असो अथवा खोऱ्यातील दहशतवादाचा मुद्दा ते नेहमीच मोदी सरकारविरोधात आपली नाराजी जाहीर करत असतात. दरम्यान नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी मोदी सरकार देशाला सांप्रदायिक बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचा … Read more

प्रयोगशाळेत मातेचे दूध बनवण्यात यश; इस्त्राईलमधील संशोधकांची कामगिरी

तेल अबिब : प्रयोगशाळेमध्ये ब्रेस्ट मिल्क म्हणजेच मातेचे दूध तयार करण्यात संशोधकांना यश आले आहे.  इस्रायलमधील काही संशोधकांनी हा दावा केला असून या दुधामध्ये मातेच्या दुधातील सर्व गुणधर्मांचा समावेश असल्याचे म्हटले आहे. इस्त्रायल मधील बायो मिल्क नावाच्या एका स्टार्ट अपने ही कामगिरी करून दाखवली आहे. कंपनीच्या चीफ सायन्स ऑफिसर आणि सहसंस्थापक डॉक्टर लीला स्टिकर यांनी … Read more

खोटी तक्रार करून शासकीय कामात अडथळा आणल्याचा शेवगावात घडला प्रकार

स्वस्त धान्याचा अधिकृत टेम्पो चोरीचा असल्याची तक्रार देऊन तक्रारदार गायब शेवगाव ( प्रतिनिधी ) : स्वस्त धान्याचा अधिकृत टेम्पो चोरीचा असल्याचा संशय दाखवून तो मुद्दाम आडवून तक्रार करण्याचा प्रकार आज रविवारी खानापुर येथे घडला. त्यावर  महसुल, पोलिस , पुरवठा विभागाने या मालाची तपासणी केली असता तो अधिकृत व पावत्याप्रमाणे बरोबर असल्याचे निदर्शनास आले. याबाबत वाहन … Read more

“मित्र देशांना व्हेंटिलेटर पुरवण्यास आम्ही तयार”

वॉशिंग्टन : करोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचार करताना मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर्सची गरज निर्माण होत आहे. त्यामुळे जगभरातून व्हेंटिलेटर्सची मागणी वाढत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेंटिलेटर्ससंबंधी महत्वाची घोषणा केली आहे. “करोना व्हायरसविरोधातील लढयात आमच्या मित्र देशांना व्हेंटिलेटर्सची गरज असेल, तर तो पुरवठा करण्यास आम्ही तयार आहोत” असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकेतच करोना व्हायरसची लागण … Read more