Baramati News : माळेगाव येथे अवैधरीत्या गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल

Baramati News – अवैधरीत्या गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी एक डॉक्टर व खासगी व्यक्तीवर गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व रोग निदानतंत्रे (लिंगनिवडीस प्रतिबंध) अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,  अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी दिली. डॉ. मधुकर चंद्रकांत शिंदे हे काही दलांलामार्फत चारचाकी गाडीत पोर्टेबल सोनोग्राफी मशीन घेऊन गर्भलिंग निदान करीत असल्याबाबतची तक्रार जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे … Read more

मालेगाव पुन्हा हादरले ! माजी नगरसेवकावर हल्ला… हाताची बोटे कापली, मुलाच्या पाठीवरही केले वार

मालेगाव : मालेगावात माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच माजी नगरसेवक अझीझ लल्लू व त्यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये त्यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या हाताची बोटेही कापण्यात आली आहेत. दरम्यान अझीझ लल्लू व त्यांचा मुलगा मशि‍दीतून नमाज पाठणानंतर बाहेर … Read more

पुणे जिल्हा | माळेगावात युगेंद्र पवारांची हवा

माळेगाव, (वार्ताहर)- बारामती तालुक्यातील माळेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा पहिल्या फलकाचे युगेंद्र पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी युवक वर्गाचा युगेंद्र पवार यांना तुफान प्रतिसाद मिळाला. माळेगाव येथे पवार यांनी नव्याने उभारण्यात येत असलेल्या जनसंपर्क कार्यालयास भेट दिली. राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडल्यानंतर राष्ट्रवादीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये अस्थवस्थता होती. अजित पवार विरूद्ध संपूर्ण … Read more

पुणे जिल्हा | एस. पी. सराफ पेढीचे उपक्रम कौतुकास्पद- बालाजी भांगे

माळेगाव, (वार्ताहर)- समाजात महिलांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी एस. पी. सराफ प्रा. लीचे उपक्रम कौतुकास्पद असतात, असे गौरवोद्‌गार माळेगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी काढले. महिला दिनाचे औचित्य साधून माळेगाव येथील एस. पी. सराफ प्रा.लीमिटेडचे संचालक शिवाजी क्षीरसागर, माधुरी क्षीरसागर यांच्या पुढाकाराने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगर … Read more

13 वर्षांच्या मुलाने घेतला चिमुकल्याचा जीव ! किरकोळ कारणावरून सांडपाण्यात फेकलं आणि..

नाशिक – जिल्ह्यातील मालेगावातील हलवाई मशिदी जवळ कारखान्या मागे साचलेल्या सांडपाण्याच्या जवळ खेळताना एका तेरा वर्षीय मुलाने त्याच्या समवेत खेळणाऱ्या साडेतीन वर्षाच्या बालकाला सांडपाण्यात फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या बालकाच्या नाका- तोंडात पाणी गेल्याने या बालकाचा मृत्यू झाला. सुरुवातीला पाण्यात पडल्याने लहानग्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, नंतर सीसीटीव्ही तपासला असता … Read more

पिंपरी | माळेगावातील शिबिरात १२५ जणांची नेत्र तपासणी

तळेगाव दाभाड, (वार्ताहर) – माळेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात १२५ रूग्णांची नेत्र तपसणी करण्यात आली. माजी जिल्हा परिषद सदस्य, प्रियदर्शनी एज्यूकेशन सोसायटीचे संस्थापक स्व.दिलीप टाटीया यांच्या पुण्यतिथी निमित्त वरसुबाई माध्यमिक विद्यालय, माळेगाव येथे ही शिबिर घेण्यात आले. या वेळी तळेगाव जनरल हॉस्पिटल व लायन्स क्लब तळेगाव यांच्या वतीने शिबिर घेण्यात आले. या वेळी … Read more

एलसीबीने सोडलेला मालेगावच्या त्या आरोपीला ठोकल्या बेड्या

संगमनेर – शहरातील उपकारागृहातील चार आरोपींनी गज कापून पळ काढला होता. या प्रकरणात तीन कर्मचाऱ्यांचेही निलंबन झाले होते. त्याचबरोबर संगमनेर पोलिसांची लक्तरे या प्रकरणात वेशीला टाकले होते. परंतु अवघ्या 30 तासांत स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने पळालेल्या चार आरोपीसह त्यांना मदत करणारे दोघेजणही ताब्यात घेऊन संगमनेर पोलिसांच्या हवाली केले, मात्र त्यांना मालेगावात मदत करणारा बडा … Read more

पुणे जिल्हा : माळेगावमध्ये कडकडीत बंद

माळेगाव – धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेले चंद्रकांत वाघमोडे यांना पाठिंबा देण्यासाठी बारामती तालुक्‍यातील माळेगाव बंदला सर्व घटकांनी कडकडीत बंद पाळुन पाठिंबा दिला. आंदोलकांनी नीरा -बारामती राज्य मार्ग रोखून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल धनगर समाजाने माळेगाव बंदचे आवाहन केले होते त्यास मोठा प्रतिसाद मिळुन सर्व घटकांनी व व्यापारी … Read more

पुणे जिल्हा : माळेगावात तावरे यांच्यावर पुष्पवृष्टी

निवडीनंतर समर्थक कार्यकर्त्यांचा जल्लोष माळेगाव – पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संचालकपदी अजित पवारांचे निकटवर्तीय रणजित तावरे यांची निवड झाल्याने जेसीबीने गुलालाची उधळण, फटाक्‍याची आतषबाजी करीत माळेगावात एकच जल्लोष करण्यात आला. पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संचालक यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाल्याने माळेगावकरांनी एकच जल्लोष केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालकपदाचा राजीनामा … Read more

मालेगावात एसटी बस उलटली ; 35 शाळकरी विद्यार्थी जखमी

मालेगाव – मालेगावात एसटी महामंडळाची मळगाव-नांदगाव बस उलटली असून या बसमधील 30 ते 35 शाळकरी मुले जखमी झाली आहेत. ही बस नांदगाव आगाराची असून मळगाव वरुन नांदगावला जात असताना ती रस्त्यात उलटली आहे. यात बस चालक आणि वाहकासह तीस ते पस्तीस शाळकरी मुले जखमी झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.जामदरी ते कळमदरी रस्त्यावर हा … Read more