पुणे जिल्हा | माळेगाव अभियांत्रिकीत प्रवेश मार्गदर्शन कक्ष

माळेगाव, (वार्ताहर) – शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालय हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नामांकित महाविद्यालय असून चालू शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी शाखेला प्रथम वर्षासाठी प्रवेश घेऊ इच्छित असणार्‍या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कक्ष सुरू करण्यात आला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. मुकणे यांनी दिली. अभियांत्रिकी शिक्षणातील विविध शाखेविषयी सर्व प्रकारची माहिती, अभियांत्रिकीमध्ये विविध … Read more

पुणे जिल्हा | संभाजीमहाराजांचे कर्तृत्ववान चरित्र प्रेरणादायी- ॲड. राहुल तावरे

माळेगाव, (वार्ताहर)- एकही युद्ध न हारणारे जगातील महापराक्रमी राजे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज होय त्यांचे कर्तृत्ववान चरित्र प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार ॲड. राहुल तावरे यांनी काढले. बारामती तालुक्यातील माळेगाव येथील संभाजीनगर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या पुतळ्यास हार घालून पूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते यावेळी सतीश गावडे, विशाल घोडके, पप्पू … Read more

पुणे जिल्हा | क्रिटेक्नोवा २०२४ उपक्रमांत ११२० विद्यार्थ्यांचा सहभाग

माळेगाव, (वार्ताहर) – माळेगाव येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आयोजित “क्रिटेक्नोवा २०२४ ” टेक्निकल सिंपोजियममध्ये महाविद्यालयातील एकूण ११२० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. मुकणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी बोलत असताना प्राचार्य डॉ. एस. एम. मुकणे यांनी … Read more

पुणे | मालेगावात राज्यातील सर्वाधिक तापमान

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मध्य महाराष्ट्र चांगला तापला असून, सोमवारी (दि. 29) यंदाच्या हंगामातील सर्वाधिक मालेगाव येथे 44 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. यंदाचा उन्हाळा विदर्भापेक्षा मध्य महाराष्ट्रातच अधिक जाणवत असून, मार्च महिन्यापासून मध्य महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव, सोलापूर आणि पुणे जिल्हा तापलेला आहे. पुढील आठडाभर कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील. परिणामी, उष्ण व … Read more

पुणे जिल्हा | ३७५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग

माळेगाव (वार्ताहर)- माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी ॲप्टीट्यूड ट्रेनिंगचे आयोजन करण्यात आले. ट्रेनिंगमध्ये कॉम्प्युटर, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व सिव्हिल आदी शाखांमधील एकूण ३७५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या कौशल्य गुणांना वाढवण्यासाठी सतत कार्यशील असणाऱ्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगले चांगले ठिकाणी नोकरीच्या संधी मिळाव्या यासाठी … Read more

पुणे जिल्हा | माळेगावात ४०० माजी विद्यार्थी सहभागी

माळेगाव, (वार्ताहर)- माळेगाव येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये १९९४ ते २०२३ या कालावधीमध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या सर्व माजी अभियंता विद्यार्थ्यांचा मेळावा प्रत्यक्ष उपस्थिती व ऑनलाईन युट्युब लाईव्ह माध्यमांद्वारे अभूतपूर्व उत्साहात पार पडला. मेळाव्यासाठी ४०० माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयाचे १५००० विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. मोठा कालखंड … Read more

पुणे जिल्हा | आंबेडकर यांच्या विचारांची शिदोरी जोपासली पाहिजे

माळेगाव (वार्ताहर) – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची शिदोरी जोपासली पाहिजे, असे प्रतिपादन सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी केले. दरम्यान, योगेश भोसले यांच्या पुढाकाराने उपस्थित ग्रामस्थांनी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करण्याची शपथ घेतली. माळेगाव येथे बौद्ध विहारमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा बँक संचालक दत्तात्रय येळे, रणजित तावरे, दीपक तावरे, जयदीप तावरे, … Read more

पुणे जिल्हा | माळेगाव खुर्दच्या सरपंचपदी काटे देशमुख

माळेगाव, (वार्ताहर)- राजकारणात दिलेल्या शब्दाला जागणारी म्हणून संपूर्ण तालुक्यात ओळख असलेल्या ग्रामपंचायत माळेगाव खुर्द (ता. बारामती) येथील सरपंच पल्लवी काटे यांनी ठरल्याप्रमाणे सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. रिक्त जागेवर सदस्य आदित्य काटे देशमुख यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड केल्याचे निवडणूक अधिकारी तथा मंडळाधिकारी विनोद धापटे यांनी जाहीर केले. याकामी तलाठी अमोल मारग व … Read more

“मालेगावची शिवसेना, शिवसेनेचे मालेगांव’; उद्धव ठाकरेंच्या सभेत झळकणार उर्दू भाषेतील होर्डिंग

मालेगाव – शिवसेनेत मोठी फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आता राज्यभर दौरा असून, यामध्ये ‘शिवगर्जना शिवसंकल्प सभा’ घेताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच (दि. 5 मार्च) उद्धव ठाकरे यांची कोकणातील खेड भागात पहिली जाहीर सभा झाली होती. यावेळी त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंची दुसरी सभा आज (26 मार्च) मालेगावात होत आहे. … Read more

सेवा अधिग्रहित केल्यानंतर गैरहजर कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार

मालेगाव : कोरोना विषाणूमुळे शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहेत. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असल्याने त्याला प्रतिबंध घालण्यासाठी विविध अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा अधिग्रहित करून उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यात येत आहेत. परंतु सेवा अधिग्रहित करूनही गैरहजर कर्मचाऱ्यांवर आता गुन्हे दाखल करण्याचे निर्देश इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचे प्रमुख डॉ.पंकज आशिया यांनी दिले आहेत. … Read more