Bengal : हावडा स्टेशनवर प्रचंड नाट्य; मोदींच्या कार्यक्रमात व्यासपीठावर बसण्यास ममतांचा नकार

कोलकाता – शुक्रवारी हावडा स्टेशनवर प्रचंड नाट्य घडले. आज या स्टेशनवरील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते वंदे भारत एक्‍स्प्रेसला व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्यावेळी या कार्यक्रमात व्यासपीठावर बसण्यास मुख्यमंत्री ममतांनी नकार दिला. त्या प्रेक्षकात बसल्या होत्या. रेल्वे स्थानकावर निमंत्रित जमावाच्या एका भागातून जोरदार घोषणाबाजी झाल्यानेही त्या अस्वस्थ दिसल्या. सोयाबीन, कापूस उत्पादकांना योग्य हमीभाव द्या! … Read more

ममतांच्या दिल्ली दौऱ्याने विरोधकांना मिळणार बळ

कोलकता – पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आठवडाभरानंतर दिल्लीचा दौरा करणार आहेत. त्यावेळी ममता काही विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटणार आहेत. त्यामुळे भाजपविरोधात एकवटण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या विरोधकांना मोठेच बळ मिळण्याची चिन्हे आहेत. पुढील लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच भाजपविरोधी आघाडी स्थापण्याच्या हालचाली विरोधकांच्या गोटात सुरू झाल्याचे चित्र आहे. अशात ममतांच्या संभाव्य दिल्ली दौऱ्याचे महत्त्व वाढले आहे. त्या कॉंग्रेस … Read more

पश्चिम बंगालमध्ये बकरी ईद निमित्ताने १ ऑगस्टला लॉक डाऊन नाही – मुख्यमंत्री बॅनर्जी

कोलकाता – देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असल्याने काही राज्यांनी पुन्हा एकदा लॉक डाऊन लागू करण्याचा निर्णय घेतलाय. अशातच आज पश्चिम बंगाल सरकारने राज्यातील आठवड्यातील दोन दिवस कडक लॉक डाऊन पाळण्याच्या निर्णयाला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. Lockdown (2 days in the week) in the state … Read more

कोरोनाला रोखण्यासाठी ममतांकडून पोलिसांवर मोठी जबाबदारी

कोलकाता – देशामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत असून  कोरोनाला रोखण्यासाठी आता केंद्र व राज्य सरकारतर्फे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. अशातच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. ममता यांच्या निर्णयानुसार आता राज्यातील जनतेला अन्नधान्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपवण्यात आली आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, “राज्य सरकारतर्फे … Read more

दिल्लीतील हिंसाचार सरकार पुरस्कृत : ममता

कोलकाता : दिल्लीत उफाळलेला हिंसाचार हा सरकार पुरस्कत होता,अशी कडवट टीका प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. दिल्ली हिंसाचारानंतर एक आठवड्याने ममता बॅनर्जी या विषयावर बोलल्या. त्या म्हणाल्या, हा सरकार पुरस्कृत नरसंहार होता. भारतीय जनता पक्षाला देशभर गुजरात दंगलीचे मॉडेल राबवायचे आहे. तृणमूल कॉंगेसच्या सभेत त्यांनी अमित शहा यांच्या गोली मारो… च्या घोषणा देणाऱ्याचा … Read more

प्रशांत किशोर करणार तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश?

कोलकता :जेडीयूमधून हकालपट्टी झाल्यानंतर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्‍यता असल्याच्या चर्चांना पश्‍चिम बंगालमध्ये उधाण आले आहे. तृणमूलनेही किशोर यांनी तसा निर्णय घेतल्यास त्यांचे स्वागतच केले जाईल, असे स्पष्ट केले आहे. पश्‍चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीसाठी रणनीती ठरवण्याच्या उद्देशातून तृणमूलने याआधीच किशोर यांच्याशी हातमिळवणी केली आहे. … Read more

आधी का मागे घ्या मग चर्चा

पंतप्रधानांना ममतांचा विरोध कायम कोलकाता : आपण पंतप्रधानांशी चर्चा करायला तयार आहोत, पण त्यापुर्वी त्यांनी सुधारीत नागरीकत्व कायदा (का) मागे घ्यावा असे सांगत प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेला असणारा विरोध कायम ठेवला. काश्‍मिर आणि काचा निर्णय घेण्यापुवी पंतप्रधानांनी आणि केंद्र सरकारने सर्व पक्षीय बैठकही बोलावली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

का रद्द होईपर्यंत निदर्शने चालूच -ममता

भाजपला आगीशी न खेळण्याचा इशारा कोलकता : नागरिकत्व दुरूस्ती कायदा (का) रद्द होईपर्यंत शांततामय मार्गाने निदर्शने चालूच राहतील, अशी परखड भूमिका पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरूवारी मांडली. त्यांनी भाजपला आगीशी न खेळण्याचा इशाराही देतानाच विद्यार्थ्यांनी कोणालाही न घाबरता निदर्शने सुरू ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. काविरोधात ममता स्वत: रस्त्यावर उतरत आहेत. मागील 11 दिवसांत … Read more

हिंसाचार घडवण्यासाठी भाजपकडून काही लोकांना पैसा-ममता बॅनर्जी

laxmi ratan shukla resigns

नागरिकत्व दुरूस्ती कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी मोर्चाचे केले नेतृत्व मोदी सरकारला दिले आव्हान माझे सरकार बरखास्त करा किंवा मला तुरूंगात टाका अंमलबजावणीसाठी माझ्या मृतदेहावरून पुढे जावे लागेल कोलकता :  नागरिकत्व दुरूस्ती कायद्याला तीव्र विरोध दर्शवत पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी मोदी सरकार आणि भाजपवर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. बंगालमध्ये हिंसाचार घडवण्यासाठी भाजपकडून काही लोकांना … Read more

देशभर एनआरसी राबवणार : शहा : प. बंगालमध्ये होणार नाही : ममता

घाबरण्याची गरज नाही; धर्माच्या आधारावर नोंदणीची तरतूद नाही नवी दिल्ली : आसाममध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी)जशी राबवली तशी देशभर राबवण्यात येईल. मात्र त्यात धर्माच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही. हिंदु, बुध्द, जैन, ख्रिश्‍चन, शिख आणि पारशी धर्मीयांनी धार्मिक अल्पसंख्यांक असल्यामुळे पाकिस्तान, अफगाणीस्तान अणि बांगलादेशात अत्याचार झाल्याने येथे आले असतील तर अशांनाही भारताचे नागरिकत्व देण्यात येईल, … Read more