चर्चा तर होणार…! ‘ममता बॅनर्जी यांनी 9 किमी पायी चालत केला रोड शो’

Lok Sabha elections 2024 । पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी दम दम आणि कोलकाता येथे तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ दोन रोड शो केले. आपल्या दोन्ही रोड शोमध्ये ममता बॅनर्जी यांनी सुमारे 9 किलोमीटरचे अंतर पायी कापले. समोर आलेल्या माहितीनुसार, पहिल्या रोड शोमध्ये, टीएमसी सुप्रीमो पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह जेसोर रोडवरील विमानतळाच्या गेट क्रमांक … Read more

“माझ्यासह अभिषेकच्या जीवाला धोका, आम्हाला सुरक्षित वाटत नाही…’; ममतांचा भाजप नेत्यांवर गंभीर आरोप

Mamta Banerjee On BJP | Lok Sabha Election 2024 – भाजप मला आणि माझा पुतण्या अभिषेक याला लक्ष्य करत आहे. त्यामुळे मला आणि अभिषेकला सुरक्षित वाटत नाही. आमच्या जीवाला धोका आहे, असे वाटते, अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी राज्यातील भाजपा नेत्यांवर आरोप केले आहेत. त्यांनी भाजप नेते सुवेंदू अधिकारी … Read more

राहुल गांधींची यात्रा म्हणजे केवळ फोटो काढण्यासाठी करण्यात आलेला दिखावा – ममता बॅनर्जी

कोलकता  – पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी कॉंग्रेसवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. त्यांनी कॉंग्रेसला हिंदीभाषिक राज्यांत भाजपविरोधात लढण्याचे आव्हान दिले. तसेच, आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला अवघ्या ४० जागा जिंकता येण्याविषयीही साशंकता व्यक्त केली. बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेस स्वबळावर लढेल, अशी घोषणा ममतांनी काही दिवसांपूर्वी केली. ती घडामोड इंडिया या विरोधी पक्षांच्या देशव्यापी आघाडीसाठी जोर … Read more

आम्ही CAA कायदा लागू करणारच – अमित शहा

कोलकाता – ज्या राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात घुसखोरी होते आहे ते राज्य कधी विकास करू शकते का? त्यामुळे प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सीएए कायद्याला विरोध करत आहेत. मात्र हा देशाचा कायदा आहे तो कोणी रोखू शकत नाही. आम्ही हा कायदा लागू करणारच. तेथून भारतात येणाऱ्या हिंदू बांधवांचा आणि भगिनींचा भारतावर तेवढाच अधिकार आहे … Read more

ममता बॅनर्जी-अरविंद केजरीवाल काॅंग्रेसला वगळून नव्या युतीच्या तयारीत?

कोलकाता – केंद्र सरकारच्या अध्यादेशामुळे भडकलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरिंवंद केजरीवाल त्या अध्यादेशाचे विधेयक राज्यसभेत संमत होऊ नये यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्या अंतर्गत त्यांनी आज प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. ममतांनी केजरीवाल यांना पाठिंबा दर्शवला आहे. मात्र त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे आगामी … Read more

“भाजप सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेवर येईल; पंतप्रधानपदाची आकांक्षा बाळगणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही”

कोलकता – पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भेटीची भाजपने खिल्ली उडवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेवर येईल. त्यामुळे पंतप्रधानपदाची आकांक्षा बाळगणाऱ्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही, असे भाजपने म्हटले. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधी विरोधकांच्या गोटातील पंतप्रधानपदाची आकांक्षा बाळगून असणाऱ्यांचे राजकीय पर्यटन सुरू झाले आहे. … Read more

पुढचा नंबर ममता बॅनर्जींचा? ‘त्या’ हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाचा नकार

मुंबई – पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कोणताही दिलासा देण्यास नकार देत याचिका फेटाळून लावली आहे. तसेच यात हस्तक्षेप करण्यास नकार दर्शविला आहे. यामुळे ममता बॅनर्जी यांच्या अडचणी वाढण्याची शक्‍यता व्यक्‍त करण्यात येत आहे. न्या. अमित बोरकर यांनी सत्र न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर दुपारी … Read more

“भाजपच्या पराभवासाठी विरोधकांना एकत्र यावे लागेल”

भुवनेश्‍वर – बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर हे बिगर भाजप आणि बिगर कॉंग्रेस पर्यायांबाबत बोलतात. पण, भाजपच्या पराभवासाठी विरोधकांना एकत्र यावे लागेल हे त्यांनी ध्यानात घ्यावे. कॉंग्रेसशी हातमिळवणी केल्याशिवाय भाजपचा पराभव शक्‍य नाही, असा संदेश मंगळवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निकटच्या सहकाऱ्याने दिला. जेडीयूचे नेते आणि नितीश यांचे सहकारी के.सी.त्यागी यांनी ओडिशात … Read more

कॉंग्रेसला “यूपीए 3’चे नेतृत्व करण्याची संधी दिली जाणार? नितीश, ममतांची भूमिका काय?

नवी दिल्ली – केंद्रात आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आहे असे म्हणतात. ते फक्त नावाला. हे सरकार म्हणजे शत प्रतिशत भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे व त्यात सबकुछ नरेंद्र मोदी असा मामला आहे. मात्र या सरकारच्या अगोदर म्हणजे 2014 पूर्वी सलग दहा वर्षे कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएचे सरकार होते व अनेक प्रादेशिक … Read more

मोदी-शहांना ब्रेक लागण्याची शक्‍यता? यांना पर्याय म्हणून सध्या चार नावे वेगाने पुढे येताहेत

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची राजधानी दिल्लीच्या राजकारणात 2014 मध्ये एन्ट्री झाली. त्यांची एन्ट्रीच एवढी धमाकेदार होती की त्यांनी केंद्रातील आघाडी सरकारांचे युग संपवले आणि स्वबळावर सत्ता स्थापन केली. नंतर एका पाठोपाठ एक राज्येही काबिज केली व 2019 मध्ये पुन्हा केंद्रात आपली स्थिती घट्ट केली. कॉंग्रेस पक्ष दुबळा झाला … Read more