शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच

अकरा मंडळांत अतिवृष्टी राहुरी तालुक्‍यातील ब्राम्हणी मंडळामध्ये 62,पाथर्डी तालुक्‍यातील पाथर्डी मंडळात 80,टाकळीमानूर 62,शेवगावमधील बोधेगाव मंडळात 94,चापडगाव 88,संगमनेरमध्ये आश्‍वीात 65,साकूर 71,घारगाव 98,डोळासणे 65,पिंपरणे 77,अकोले मंडळात 77 मिलीमीटर पाऊस झाला.  नगर – शहरासह जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून पावसाने दमदार हजेरी लावली.शहरात झालेल्या पावसाने रस्ते जलमय झाले आहेत. कल्याण रोडवरील परिसरातील व कोर्ट गल्लीत अनेकांच्या घरात पावसाचे पाणी … Read more

रिपरिप पावसानंतर जामखेडमध्ये रस्त्यांची चाळण

जामखेड – शहरातील रस्त्यांची समस्या आता नवीन राहिली नाही. ऑक्‍टोबर महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात पाऊस ओसरल्यानंतर शहरातील रस्त्यांवर मुरुम तसेच काही रस्त्यांवर डांबरीकरणाने खड्डे बुजवण्यात आले होते. मात्र आता चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांची पुन्हा चाळण झाली आहे. यामुळे ऐन सणासुदीच्या काळातच वाहनधारक व पादचाऱ्यांना पुन्हा तारेवरची कसरत करावी लागत आहे. … Read more

माणमध्ये पावसाने सर्वत्र पाणीच पाणी

बिदाल – सातारा जिल्ह्यासह सर्वत्र गेले दोन दिवस झालेल्या पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले आहे. माण तालुक्‍याच्या जिरायती पट्ट्यातही चांगला पाऊस झाला असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात तसेच पिकांमध्ये पाणी असल्याचे पहावयास मिळाले. अनेक शेतकऱ्यांनी थोड्याफार पडलेल्या पावसाच्या पाण्यावर मागील आठवड्यात ज्वारी, कांदा, भाजीपाला व चारा पिके केली होती ती अनेक ठिकाणी … Read more

किती बळींनंतर लोकप्रतिनिधींना जाग येणार?

उमेश सुतार नाणेगावच्या संतप्त ग्रामस्थांचा सवाल कराड  – चाफळ विभागातील नाणेगाव खुर्द येथे ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यातून वाहून गेल्याने एका महिलेला आपला प्राण गमवावा लागला. याला केवळ लोकप्रतिनिधी व प्रशासनच जबाबदार असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त केल्या जात आहेत. नेमके किती बळी गेल्यानंतर लोकप्रतिनिधींना जाग येईल? असाही प्रश्‍न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. पाटण तालुक्‍यातील चाफळ … Read more

नांदणी नदीपात्र भरले तुडुंब

जामखेड – जामखेड तालुक्‍यातील जवळा येथे जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलक्रांती घडण्याचे काम झाले आहे. गेल्या चार दिवसांत झालेल्या पावसाने जवळा परिसरातील नांदणी नदीवरील सर्व बंधारे ओव्हर फ्लो झाल्याने गेल्या दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रथमच यावर्षी नदीपात्र दुथडी भरलेले दिसत आहे. राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेची ही किमया साधली गेली आहे. तीन वर्षांपूर्वी नांदणी नदीचे पात्र नेमके … Read more

नालेसफाईचा पैसा मुरतोय कुठे?

तासाभराचा पाऊस उडवतोय पालिकेची झोप पुणे – तब्बल 450 किलोमीटरच्या पावसाळी जलवाहिन्या, तेवढ्याच लांबीचे नाले आणि जवळपास 900 किलोमीटरहून अधिक लांबीच्या ड्रेनेज लाइन असून शहराला अवघ्या 50 मिमी पावसातही पुराचा सामना करावा लागत असल्याचे गेल्या दोन दिवसांपासून समोर आले आहे. त्यामुळे पाणी वाहून जाण्यासाठी दरवर्षी जवळपास 100 कोटी नाले सफाईवर आणि 30 ते 40 कोटी … Read more

48 तासांनंतर पाणीपुरवठा

पुणे – आंबील ओढ्याला आलेल्या पुरामुळे महापालिकेच्या पद्मावती जलशुद्धीकरण केंद्रात पावसाचे पाणी घुसले होते. त्यामुळे या जलकेंद्रातून तब्बल पाच पुणेकरांना केला जाणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. अखेर हा पुरवठा अवघ्या दोन दिवसांत सुरळीत करण्यात महापालिकेला यश आले आहे. या जलकेंद्रातील मोटारी बदलून तसेच इतर अत्यावश्‍यक कामे करण्यासाठी प्रशासनाने 5 दिवसांचा कालावधी निश्‍चित केला होता. मात्र, … Read more

कॅन्टोन्मेंट हद्दीत पावसाचे पाणी जिरण्याची योजनाच नाही

पुणे – स्मार्ट कॅन्टोन्मेंट मानल्या जाणाऱ्या पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील रस्त्यांभोवती पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी कोणतीच सुविधा नसल्याने अनेकदा पावसाचे पाणी साचून राहते. बरेचदा ही परिस्थिती इतकी वाईट असते, की नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागते. याचा फटका वारंवार बसत असून, यावर सक्षम उपाय करण्याची मागणी होत आहे. सिमेंटचे चककीत रस्ते, दुतर्फा असलेली हिरवळ आणि साफसफाई…पुणे … Read more

पाऊस रेंगाळणार

पुणे – यंदा भरभरून देणाऱ्या मोसमी पावसाचा मुक्‍काम आणखी वाढणार आहे. साधारणत: सप्टेंबरअखेर भारतातून परतणाऱ्या मान्सूनचा प्रवास यंदा 5 ऑक्‍टोबरनंतर सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर मान्सून पूर्णपणे देशाबाहेर 15 ऑक्‍टोबर नंतरच जाईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. देशात मान्सूनचा मुक्काम चार महिन्यांचा असतो. सप्टेंबरअखेर मान्सून केरळमार्गे परततो, पण, यंदा हा प्रवासच सुरू झालेला नाही. राजस्थानातून … Read more

खडकी परिसरात मुसळधार पाऊस 

झाड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी खडकी  – गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकी परिसरात अनेक ठिकाणी वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या. तसेच शाळा व व्यापारी संकुल परिसरात अनेक ठिकाणी गुडघाभर पाण्याचे तळे साठले असून रस्त्यावर मोठ्या प्रमात खड्डे पडले आहेत. सोमवारी रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर मंगळवारी रात्री ही धुवाधार पावसाने हजेरी लावत … Read more