माणगंगेच्या पुरात म्हसवड येथे एक जण वाहून गेला

म्हसवड – माणगंगेला आलेल्या पुराचे पाणी ओसरत असतानाच म्हसवडनजीकच्या दहिवडे मळ्यातील गणेश आप्पा दहिवडे (वय 47) हे गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास यात्रा पटांगणावरील बंधाऱ्याच्या पाण्यात वाहून गेले. ते पाण्यातून घरी जात आसताना तोल जाऊन पडले. मात्र, पोहता येत नसल्याने ते वाहून गेले. ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेतला, पण त्यात यश आले नाही. याबाबत घटनास्थळावरून … Read more

मल्हारपेठ-पंढरपूर महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

खटाव तालुक्‍यात पंधरा किलोमीटरमध्ये रस्त्यांवर हजारो खड्डे म्हासुर्णे – मल्हारपेठ-पंढरपूर महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. रायगाव फाटा-म्हासुर्णे-चितळी या पंधरा किलोमीटर अंतरात हजारो खड्डे पडले असून साईडपट्ट्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याबाबत काही दिवसांपूर्वी घोषणा होऊनही काम अजून सुरू झाले नसल्याने जनतेची प्रतीक्षा कायम आहे. मल्हारपेठ-पंढरपूर महामार्ग खटाव तालुक्‍यातून जातो. इतर तालुक्‍यांच्या तुलनेत खटाव तालुक्‍यात या मार्गाची … Read more

मलवडीत तब्बल 80 मिलिमीटर पाऊस

गोंदवले  – वॉटरकप जिंकलेल्या शिंदी खुर्द, भांडवली या गावासह मलवडी, सत्रेवाडी, शिरवली, गाडेवाडी, कळसकरवाडी, परकंदी, वारुगड या गावांत मुसळधार पावसाने रात्रभर झोडपून काढले. या गावातील सीसीटी, डीप सीसीटी, नालाबांध तलाव पूर्णपणे भरुन वाहिले. तर आंधळी धरणापासून वरच्या बाजूला माणगंगा दुथडी भरुन वाहिल्याने गेली 7 वर्ष कोरडाठाक असलेल्या आंधळी धरणात पाण्याची आवक सुरु झाली आहे. सोमवारी … Read more

रेठरे बुद्रुकचे सौंदर्य खुलविणाऱ्या बेटाची महापुराने झाली दुर्दशा

बेटावरील हिरवाई हरपली; नागरिकांसह निसर्गप्रेंमीचा हिरमूस वाठार – कराड तालुक्‍यातील रेठरे बुद्रुक येथील कृष्णा नदीपात्रातील रेठरेचे निसर्गसौंदर्य खुलविणाऱ्या बेटावरील झाडे पुराच्या पाण्यामुळे वाहून गेली असून, कित्येक झाडे कोलमडून पडली आहेत. त्यामुळे नदीपात्रातील या बेटाची दुर्दशा झाली असून हिरव्यागार बेटावरील हिरवाई हरपल्यामुळे निसर्गप्रेंमीचा हिरमूस झाला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे, कराडपासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या … Read more

यंदा पीक उत्पादनात होणार घट

पावसात खंड पडल्याने अकोल्यातील भातपिके लागली सुकू नगर – ढगाळ वातावरण ,काही ठिकाणी सुरू असलेला संततधार रिमझीम पावसाने जिल्ह्यात आज अखेर 433 .91मी.मी. म्हणजेच सरासरी 87.24 टक्की इतकी पावसाची नोंद झाली आहे. मात्र सुरवातीस झालेल्या पावसात नंतर मोठा खंड पडल्याने जिल्ह्यातील एकूण उत्पादनात घट येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. अकोले तालुक्‍यातील भात पिके ही पावसाचा … Read more

शहरातील रस्त्यांवर खड्डे पडल्याने अपघातांत वाढ

बाबासाहेब गर्जे पाथर्डी  – शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ-मोठाले खड्डे पडल्याने छोट्या-मोठ्या अपघातात वाढ झाली आहे. खड्ड्यात पावसाचे पाणी भरल्याने प्रवाशांना खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने अपघात होऊन शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. नवरात्र उत्सवानिमित्त श्रीक्षेत्र मोहटा देवी गडावर राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त येणार आहेत, त्यांच्या सुरक्षिततेसाठी तरी राष्ट्रीय महामार्ग विभागाने शहरातील खड्डे बुजवावीत अशी … Read more

श्रीगोंदा शहरात पावसाची दमदार हजेरी

ग्रामीण भाग कोरडाच : 24 तासांत 58 मिली पावसाची नोंद श्रीगोंदा – श्रीगोंदा शहरात गेल्या दोन दिवसांत पावसाने दमदारी हजेरी लावली आहे. 24 तासांत श्रीगोंदा शहरात 58 मिली पावसाचे नोंद झाली आहे. शहराच्या तुलनेत मात्र ग्रामीण भागात नाममात्र सरी बरसल्याने शेतकरी अद्याप पावसाच्या प्रतीक्षतेच आहे. गेल्या दोन दिवसांत पावसाने कमबॅक करत सुखद धक्का दिला. मात्र … Read more

पावसाचा जोर मंदावल्याने कोयना धरणाचे दरवाजे बंद

koyana dam water level

पाटण – कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला आहे. पाणलोट क्षेत्राच्या कोयना, नवजा, महाबळेश्‍वर याठिकाणी गेल्या चोवीस तासात पावसाने उघडीप दिल्याने कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. यामुळे बुधवारी रात्री उघडण्यात आलेले कोयना धरणाचे दरवाजे गुरूवारी सकाळी बंद करण्यात आले. कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. मात्र पाणलोट क्षेत्रातील … Read more

अतिवृष्टीचा साताऱ्यातील पर्यटन हंगामाला फटका 

ठोसेघर – सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना यंदा अतिवृष्टीचा फटका बसला. सातारा शहराच्या पश्‍चिमेकडील पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर अतिवृष्टीमुळे अडथळे निर्माण झाल्याचा थेट परिणाम तेथील पर्यटन हंगामावर झाला आहे. यंदा ठोसेघर धबधब्याचे रमणीय दृश्‍य पाहायला येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मागील वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. सातारा शहराच्या पश्‍चिमेकडील ठोसेघर धबधबा, जागतिक वारस स्थळ असलेले … Read more

पावसाने शहरातील रस्ते उखडले

नगर – शहरातील रस्त्यांची चाळण झाली असून खड्डे नसलेला रस्ता दाखवा आणि बक्षिस मिळवा अश्‍या आता पैजा लावण्याच्या तयारीत नगरकर आहेत. गणपती आणि मोहरम च्या विसर्जनापूर्वी ज्या रस्त्यांची डागडूजी होणे अपेक्षित होते त्याच रस्त्यांची आज दुरवस्था झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यापैकी काही रस्त्यांची डागडुजी झाली होती ती नंतर पावसाने वाहून गेली. तर काही रस्त्यांची … Read more