पुणे जिल्हा : तब्बल 4 हजार विद्यार्थी शिष्यवृत्ती गमावणार?

महाविद्यालयांकडून अर्ज पडताळणीस टाळाटाऴ : पालक संतापले पुणे – पुणे विभागीय शिक्षण सहसंचालकांनी वांरवार सूचना देऊनही महाविद्यालयांकडून त्याची तात्काळ गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याची बाब उघड झालेली आहे. अर्जच प्रलंबित पडल्यामुळे संबंधित विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्‍यता निर्माण झालेली आहे. शिष्यवृत्तीच्या पहिल्या व दुसऱ्या हप्त्यासाठी एकूण 4 हजार 101 विद्यार्थ्यांचे अर्ज पडताळणीसाठी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित … Read more

अबब! एका वर्षात पाहिले तब्बल 777 चित्रपट ; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये विक्रमाची नोंद

वॉशिंग्टन : चित्रपट पाहणे हा अनेकांच्या मनोरंजनाचा प्रमुख हेतू असतो. नवीन चित्रपट प्रदर्शित झाला की तो पाहायचा आहे. असे त्यांनी मनोमन ठरवून टाकलेले असते आता अशाच प्रकारचा छंदाचे रूपांतर एका विक्रमात झाले आहे. अमेरिकेतील एका व्यक्तीने एका वर्षभराच्या कालावधीमध्ये तब्बल 777 चित्रपट पाहिले असून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्याच्या या विक्रमाची नोंद घेतली आहे. … Read more

ढोल-ताशा पथकांत यंदा तब्बल 25 हजार वादक !

पोलीस आयुक्‍त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते वाद्यपूजनाचा कार्यक्रम पुणे – ढोल-ताशा वादनादरम्यान वादक तल्लीन होऊन वादन करीत असतात. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि आनंद पाहण्यासारखा असतो. पुण्यामध्ये ढोल-ताशा पथकांतील वादकसंख्या 25 हजारांहून अधिक असून विविध वयोगटांचे वादक आहेत. त्यामुळे ढोल-ताशा हे पुण्याच्या गणेशोत्सवातील आकर्षक असल्याचे, मत पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केले. ढोल … Read more

क्रीडा स्पर्धांचा यंदा कुंभमेळा

नवी दिल्ली – करोनामुळे गेल्या वर्षी जागतिक क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्या होत्या. मात्र, यंदाच्या वर्षी याच स्पर्धा सुरळीत होणार असल्याचा विश्‍वास व्यक्त होत आहे. करोनामुळे एक वर्षाने लांबणीवर पडलेली टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा तसेच युरो चषक फुटबॉल, पुरुष आणि महिला टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा यांसह अनेक महत्त्वाच्या स्पर्धा यंदा चाहत्यांसाठी मेजवानी ठरणार आहे. यंदाच्या जागतिक स्पर्धांचे … Read more

सौरव गांगुलीने केल्या तब्बल 22 वेळा करोना चाचण्या…

मुंबई – बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनाही वारंवार करोना चाचणी करावी लागली आहे. गांगुलीनं गेल्या साडेचार महिन्यांत तब्बल 22 वेळा करोना चाचण्या केल्या आहेत.  गांगुली आयपीएलच्या 13 व्या हंगामासाठी दुबईला गेले होते. करोना विषाणूमुळे आयपीएल स्पर्धा बायो-बबलमध्ये खेळवण्यात आली होती. सप्टेंबरपासून नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत गांगुली युएईमध्येच होते. यावेळी त्यांना करोना चाचण्या कराव्या लागल्या. व्हर्चुअल पत्रकार … Read more