इंग्लंडची एलिझाबेथ घेतेय मराठीचे धडे

भारती विद्यापीठाच्या प्राथमिक शाळेत घेतला प्रवेश आंबेगाव बुद्रुक – इंग्लंडमध्ये गेली 70 वर्ष स्थायिक असलेल्या गुल्हा कुटुंबातील ब्रिटिश नागरिकत्व असलेल्या सहा वर्षाच्या एलिझाबेथ गुल्हा हिने भारती विद्यापीठ प्राथमिक शाळेत (मराठी माध्यम) प्रवेश घेतला आहे. देशातील पालकांना विचार करावयास लावणारी गोष्ट आहे. सद्यस्थितीत हजारो पालक लाखो रुपये फी भरून इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे उंबरे झिजवत असताना इंग्लंडमधील … Read more

हुश्‍श…मराठी शाळा मराठीच राहणार

इंग्रजी माध्यमात परावर्तित करण्याचा विकल्प रद्द पुणे – अनुदानित मराठी शाळा इंग्रजी माध्यमांच्या शाळांत परावर्तित करण्याचा विकल्प रद्द करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. याबाबतची मागणी भाजप शिक्षक आघाडीने शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याकडे केली होती. यावर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक यांना कार्यवाही बाबत निर्देशही देण्यात आले होते. दरम्यान, महाराष्ट्र राज्य शिक्षक … Read more

“मराठी’ माध्यम आहे का?

एक हजार वर्षे जुनी, पाच हजार बोलीभाषांपासून तयार झालेली, अमृतातेही पैज जिंकणारी या माय मराठी भाषेच्या जपणुकीसाठी आपण काय करतो याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. आज हिंदी व इंग्रजी भाषेने मराठी भाषेवर आक्रमण केले आहे. हिंदी आणि इंग्रजी भाषेत बोलणे प्रतिष्ठेचे मानले जाते. आपल्या पाल्यांना मराठी माध्यमाच्या शाळेत दाखल करण्याऐवजी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत दाखल करण्याकडे … Read more

माध्यमिक शाळांमध्ये मराठी अनिवार्यच!

शिक्षण विभागाचा निर्णय : …तरच व्यवसाय विषय निवडता येईल पुणे – राज्यातील माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या व्यवसाय शिक्षण योजनेत काही माध्यमांच्या शाळांनी मराठी विषय वगळून व्यवसाय शिक्षण विषय निवडले आहेत. त्यामुळे शासनाच्या मराठी विषय अनिवार्य असल्याच्या मूळ धोरणाला बाधा येत आहे. त्या पार्श्‍वभूूमीवर इंग्रजी व अन्य माध्यमांच्या शाळांना मराठी विषय अनिवार्य राहील. मात्र, … Read more

मराठी शाळांना पुन्हा ‘अच्छे दिन’

विद्यार्थ्यांना मराठीची गोडी : इंग्रजी माध्यमातील 90 हजार विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश पुणे – राज्यातील इंग्रजी माध्यमातील 90 हजार विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. विद्यार्थ्यांमध्ये मातृभाषेची आवड कायम राहिली आहे. यामुळेच विद्यार्थी पुन्हा शिक्षणासाठी मराठी माध्यमाकडे आकर्षित होऊ लागले असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणांसाठी … Read more