कांदा चोरणारे दोन सराईत गुन्हेगार ताब्यात

सोनई | कृषी उत्पन्न भर बाजार समिती घोडेगाव येथून चोरी गेलेल्या कांद्यासंह दोन सराईत आरोपींना सोनई पोलिसांनी ताब्यात घेतले. दि. २९ मे रोजी रात्री १२ वाजेनंतर चोरट्यांनी पत्र्याचे कंपाऊंड तोडून सुमारे ५० हजार रुपये किंमतीच्या कांद्याने भरलेल्या गोण्या चोरीस गेल्याचे लक्षात आल्यावर सोनई पोलीस ठाण्यात भाऊसाहेब दामोदर दातार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. … Read more

nagar | बाजार समितीच्या विकासकामात विरोधकांंची आडकाठी

टाकळीभान (वार्ताहर) – श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजारने गेल्या चार वर्षाच्या तुलनेत संचालक मंडळाने उत्पन्न वाढीसोबतच काटकसरीचा कारभार करून संस्थेला ११ लाखांचा नफा मिळून दिला आहे. विरोधी संचालक विकासकामाला सतत गेले वर्षभर आडकाठी घालत असल्याने मंजूर विकासकामे निधी असूनही रखडल्याचा हल्लाबोल बाजार समितीचे संचालक मयूर पटारे यांनी येथील पत्रकार परिषदेत केला. पटारे म्हणाले … Read more

पुणे | फळभाज्यांच्या मागणीत वाढ

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (दि. २८) राज्यासह परराज्यातून भाजीपाल्याची सुमारे ९० ते १०० ट्रक आवक झाली होती. बाजारात मागील आठवड्याच्या तुलनेत काहीशी आवक वाढली आहे. मात्र, फळभाज्यांना मागणी वाढल्याने लसूण, काकडी, फ्लॉवर, शेवगा आणि घेवड्याच्या भावात १० टक्क्यांनी वाढ झाली असून, अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर स्थिर … Read more

Pune: बाजार समितीचा अजब-गजब कारभार

पुणे – बाजार समिती प्रशासन मर्जीतील आणि संघटनांचे पदाधिकारी असलेल्या आडत्यांना विशेष सवलत देत मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे, तर दुसरीकडे शेतमाल १५ फुटांच्या बाहेर लावल्यास सर्वसामान्य आडत्यांवर मात्र समिती दंडात्मक कारवाई करते. त्यामुळे बाजारात सामान्य आडत्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप आडते असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष युवराज काची यांनी बाजार समिती प्रशासनावर केला आहे. … Read more

nagar | बाजार समितीला ८६ लाखांचा उच्चांकी नफा

श्रीगोंदा, (प्रतिनिधी) – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला मागील आर्थिक वर्षात ८६ लाख ५६ हजार ४ रुपयांचा उच्चांकी नफा झाल्याची माहिती समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी दिली. दरम्यान, समितीच्या उत्पन्नात जवळपास चाळीस टक्क्यांची वाढ होऊन २ कोटी ५ लाख ३५ हजार ७१७ रुपयांवर गेल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत बोलताना सभापती लोखंडे म्हणाले, मागील काळातील पदाधिकारी … Read more

पुणे | बाजार समितीला सवलत दरात पाणी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीस महापालिकेकडून आता सवलतीच्या दरात पाणीपुरवठा केला जाणार आहे. महापालिकेकडून बाजार समितीला व्यावसायिकदराने पाणीपट्टी आकारली जात होती. मात्र, याचे दर जास्त असल्याने ते कमी करण्याची मागणी बाजार समितीने शासनाकडे केली होती त्यानंतर राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी हे दर कमी करण्याच्या सूचना महापालिकेस केल्या, त्यानंतर पालिकेने … Read more

पुणे | मार्केट यार्डात डमी आडत्यांवर कारवाई

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मार्केट यार्डात डमी आडते आणि गाळ्याच्या समोर १५ फुटापेक्षा जास्त जागा वापरणाऱ्यांवर बाजार समिती प्रशासनाने कारवाईची जोरदार मोहीम हाती घेतली आहे. फळ, भाजीपाला विभागात चार दिवसांत १७ आडत्यांवर कारवाई करत 3६ हजार ५८० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांच्या सुचनेनुसार फळ, भाजीपाला … Read more

पुणे | बाजार समितीच्या दोन संचालकांच्या गाळ्यावर कारवाई

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शेतकर्‍याला डमी आडत्याने मारहाण केल्याच्या घटनेची पडसाद उमटल्यानंतर बाजार समिती प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवारपासून (दि.५) बेकायदा डमी आडते आणि गाळ्याच्या समोर १५ फुटापेक्षा जास्त जागा वापरणार्यांवर कारवाई सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी व्यापार प्रतिनिधी म्हणून निवडून आलेले बाजार समितीचे संचालक गणेश घुले, अनिरुद्ध उर्फ बापू भोसले यांच्या गाळ्यावर कारवाई … Read more

पिंपरी | येलवाडीत होणार दुय्यम कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती

देहूगाव, (वार्ताहर) – तीर्थक्षेत्रे येलवाडी येथील नियोजित रिंगरोडलगत गट क्रमांक ३०० मधील १९ हेक्टर ३३ आर इतकी शासकीय गायरानातील जागा चाकण कृषी उपन्न बाजार समितीला देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. याबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी यांना ४ जानेवारी रोजी निर्देशपत्र दिले आहे. तसेच, या पत्राची एक प्रत खेडचे आमदार दिलीप मोहिते यांना देखील उपसचिव … Read more

PUNE: मार्केट यार्डात दुय्यम दर्जाच्या शेतमालाचाच बाजार

पुणे – बाजार समिती आवाराबाहेर नियममुक्ती आहे. त्यामुळे बाहेर खरेदी-विक्री करण्यासाठी कोणताच कर लागत नाही. परिणामी, मार्केट यार्डाऐवजी थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याची पद्धत खरेदीदारांकडून रूढ होत आहे. शहरातील मोठे व्यापारी तसेच मॉलधारक शेतात जाऊन उत्कृष्ट शेतमालाची खरेदी करतात. त्यानंतर राहिलेला माल शेतकऱ्यांकडून बाजारात पाठवून दिला जात आहे. त्यामुळे मार्केटयार्डात दुय्यम दर्जाचा माल येण्यात लक्षणीय वाढ झाली … Read more