पुणे | आंब्यांच्या आवकेची लपवाछपवी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गोड आंब्याचा हंगाम आता जोरात सुरू झाला आहे. मार्केट यार्डात आंब्याची आवक वाढली आहे. मात्र, आंबा आवकेमध्ये सध्या सर्व गोलमाल सुरू झाला असून, व्यापारी आणि समितीची आवकमध्ये मोठी तफावत समोर येवू लागली आहे. त्यामुळे यंदा आंबा हंगाम चांगलाच गाजण्याची चिन्हे आहेत. पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात फळ बाजारात सध्या दररोज … Read more

पुणे – शिक्षक प्रशिक्षणासाठी 30 कोटींचा चुराडा!

पुणे – राज्यातील शिक्षकांना ऑनलाइन प्रशिक्षण व मूल्यमापनासाठी खास प्लॅटफॉर्म उभारण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून 30 कोटी रुपयांचा चुराडा करण्यात येणार आहे. करोनाच्या संकटात शासनाने काटकसरीचे जाहीर केलेले धोरण हवेतच विरले आहे.    विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी व त्यांना शिकवण्यात येणारा अभ्यासक्रम, संकल्पना शिक्षकांद्वारे मुलांपर्यंत सुलभरित्या पोहोचवण्यासाठी अध्ययन पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी विविध विषयांचे प्रशिक्षण देण्यात येते. राज्य … Read more

शिक्षकांना जूनपर्यंतचे वेतन “ऑफलाइन’

पुणे – कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता दिलेल्या आणि कायम शब्द वगळलेल्या 20 टक्‍के अनुदान मंजूर शाळांमधील शालार्थ आयडी न मिळलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जूनपर्यंतचे वेतन ऑफलाइन होणार आहे. त्यास राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. यापूर्वी फेब्रुवारीपर्यंतचे वेतन ऑफलाइन अदा करण्यास मान्यता दिली होती. सद्य:स्थितीत करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने व कार्यालयीन उपस्थितीचे प्रमाण … Read more

#PuneCrime : सिगारेटसाठी थेट घर जाळण्याचा प्रयत्न

पुणे -पानटपरी चालकाने सिगारेट मोफत न दिल्याने त्याचा गळा दाबून खुनाचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर त्याच्या घरावर पेटते गोळे टाकून घर पेटवण्याचाही प्रयत्न केला गेला. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी तिघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. नोमण सय्यद, आत्तु अन्सारी आणि मोठा पणती उर्फ रिझवान अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी आरिफ सय्यद (33, रा. चिंतामणीनगर, हांडेवाडी) … Read more

गणराया, करोनाचे संकट दूर कर

पुणे -श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या विशेष यागांचे आयोजन करण्यात येत आहे. मंगळवारी मंदिरात मृत्युंजय आणि धन्वंतरी महायाग पार पडला. यावेळी करोनाचे संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना गणरायाचरणी करण्यात आली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मंगळवारी वेदमूर्ती नटराज शास्त्री आणि ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम सुरू आहेत. महागणपती … Read more

पुणे – दहावीच्या निकालाबाबत हालचाली

पुणे -इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आता निकालाबाबत अंतर्गत मूल्यमापनाचे निकष ठरविण्याची शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची (विद्या प्राधिकरण) लगबग सुरू आहे. काही तज्ज्ञ मंडळी अभ्यासपूर्णरित्या सर्वसमावेशक असा अंतर्गत मूल्यमापन आराखडा तयार करत आहेत. दरम्यान विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वांचे आराखड्याकडे लक्ष लागले आहे. परीक्षा रद्द करण्याच्या शासन निर्णयानंतर दहावीचा निकाल कसा तयार करायचा, याबाबत … Read more

पुणे-ऑस्टिन “सिस्टर सिटी’चा करोनाविरुद्ध संयुक्‍त लढा

पुणे  -मागील काही दिवसांपासून शहरातील करोनाचा प्रादुर्भाव वाढत होता. या करोनाच्या विरुद्धच्या लढ्याच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेच्या टेक्‍सास प्रांतातील पुण्याची “सिस्टर सिटी’ असणाऱ्या ऑस्टिन शहरातील रहिवासी “ऑस्टिन-पुणे सिस्टर सिटी इंटरनॅशनल इनिशीएटिव्ह’द्वारे जोडले गेले आहेत. याद्वारे ना नफा तत्त्वावर कार्यरत असणाऱ्या “पुणे सिटी कनेक्‍ट’च्या माध्यमातून निधी उभारण्यात येत आहे. सप्टेंबर 2018 मध्ये पुण्याच्या तत्कालीन महापौर मुक्‍ता टिळक आणि … Read more

पुणे – महापालिका लस उपलब्ध करणार

पुणे -राज्य सरकारने दुजाभाव केला, तरी महापालिका पुणेकरांना करोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून देणार, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली. लसीकरणासाठी जागतिक निविदांची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी, मतदान केंद्रनिहाय लसीकरण सुरू करावे, लहान मुलांवर उपचार करण्यासाठी रुग्णालये उभारावीत, पोस्ट कोविड सेंटर सुरू करावीत आदी मागण्या मुळीक यांनी आयुक्‍त विक्रम कुमार यांच्या समवेत झालेल्या … Read more

पुणे – स्वारगेट-कात्रज मेट्रोसाठी रु. 734 कोटींचा भार

पुणे -स्वारगेट ते कात्रज मेट्रोच्या विस्तारित मार्गाच्या खर्चातील 15 टक्के खर्चाचा भार आता महापालिकेस उचलावा लागणार आहे. त्यासाठी प्रशासनाने ठेवलेल्या सुधारीत प्रस्तावास महापालिकेच्या स्थायी समितीने मंगळवारी झालेल्या बैठकीत मान्यता दिली. या मेट्रो मार्गासाठी आता महापालिकेस आपला हिस्सा आणि भूसंपादन असा 733.85 कोटींचा भूर्दंड सहन करावा लागणार आहे. स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत … Read more

पुणे -नुकसान करणाऱ्या निविदा रद्द करा

पुणे – महापालिकेकडून राबवण्यात येणाऱ्या निविदा प्रक्रिया ठराविक ठेकेदारांच्या हितासाठी राबवल्या जात आहेत. त्यासाठी भाजपकडून प्रशासनावर दबाब टाकला जात आहे. आर्थिक नुकसान करणाऱ्या तसेच चुकीच्या पद्धतीने राबलेल्या निविदा तातडीनं रद्द कराव्यात, अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने आयुक्‍तांकडे केली आहे. पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे, गटनेते आबा बागूल यांच्यासह नगरसेवक यावेळी उपस्थित होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत ही माहिती … Read more