खाद्यतेलांची स्वस्ताई; मागील वर्षभराच्या तुलनेत ग्राहकांना दिलासा

पुणे – दोन वर्षांपूर्वी विविध प्रकारच्या खाद्यतेलाच्या भावानी उच्चांक गाठला होता. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात खाद्यतेलाचे भाव वाढलेले होते. सध्या तेलाच्या भावात सातत्याने घट होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. खाद्यतेलांच्या १५ लिटर/किलोच्या डब्यामागे वर्षभरात २०० ते ३०० रुपयांनी घट झाली आहे. तर किरकोळ बाजारात एक किलो/लिटर तेलाच्या पिशवीमागे २० ते २५ रुपयांनी घट झाली आहे. … Read more

पुणे | रमजानच्या उपवासाला खजुराचा गोडवा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पवित्र रमजान महिना मंगळवारपासून सुरू झाला आहे. या काळात खजुराला मागणी वाढली आहे. मार्केट यार्ड भुसार विभागात ४० ते ५० प्रकारचे खजूर उपलब्ध आहेत. याबरोबरच सुकामेव्यालाही मागणी आहे. सुकामेव्यामध्ये काजू, बदाम, ग्रीन पिस्ता, मनुका, आक्रोड, चारोळे, खारिक आणि केशरला मागणी वाढली आहे. खजुराचे भाव मागील वर्षीच्या तुलनेत स्थिर आहेत. तर, सुकामेवा … Read more

पुणे | कलिंगडांचा हंगाम बहरला- ८० ते १०० टनांची आवक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- उन्हाळ्याची चाहूल लागताच लालबुंद कलिंगडांची आवक मार्केट यार्डातील फळ विभागात वाढली आहे. तापमान वाढेल तसा कलिंगडांचा हंगाम बहरत चालला आहे. बाजारात कलिंगडांची दररोज ८० ते १०० टन आवक होत आहे. ही आवक मागील १५ दिवसाच्या तुलनेत दुप्पटहून अधिक आहे. भावातही १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. उन्हाळ्यामुळे मागणी आहे. तसेच, मुस्लीम … Read more

पुणे | मार्केट यार्डात डमी आडत्यांवर कारवाई

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मार्केट यार्डात डमी आडते आणि गाळ्याच्या समोर १५ फुटापेक्षा जास्त जागा वापरणाऱ्यांवर बाजार समिती प्रशासनाने कारवाईची जोरदार मोहीम हाती घेतली आहे. फळ, भाजीपाला विभागात चार दिवसांत १७ आडत्यांवर कारवाई करत 3६ हजार ५८० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांच्या सुचनेनुसार फळ, भाजीपाला … Read more

Pune: संत्री आणखी स्वस्त; ५० रुपयांत किलोभर !

पुणे –  संत्रीचे भाव सहसा मोसंबीच्या दुप्पट असतात. पण, यंदा चक्क संत्रीचे भाव कमी असल्याचे दिसून येते. राज्यासह परराज्यांतून संत्रीची मोठी आवक होत आहे. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.शहरातील किरकोळ बाजारात संत्री ४० ते ५० रुपये, तर, मोसंबी ८० ते १०० रुपये भावाने विक्री होत आहे, अशी माहिती मार्केट यार्डातील आडतदार सोनू ढमढेरे यांनी … Read more

Pune: गड-किल्ले स्वच्छतेतून शिवरायांंना मानवंदना

पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यातील शिवनेरी, सिंहगड, राजगड, तोरणा व इतर किल्ल्यावर व परिसरात १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सिंहगड किल्ला व परिसरातील स्वच्छता मोहिमेत २८५ किलो सुका कचरा (प्लॅस्टिक कचरा) संकलित करत मनपा कचरा प्रक्रिया प्रकल्पाकडे देण्यात आला. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्यावतीने … Read more

pune news : मार्केट यार्डातील डेरी प्रोडक्टच्या गोडावूनला आग; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात

pune news : मार्केट यार्डातील बिस्कीट, चॉकलेटच्या गोडावून आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. गोडावूनच्या खिडक्या पत्र्या लावून बंद आणि माल पूर्ण भरलेला असल्याने आग आटोक्यात आणायला अग्निशाकाल दलाला शर्तीचे प्रयत्न करावे लागले. अग्निशामक दलाचे तीन अधिकारी आणि २५ कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केल्यानंतर साधारण अडीच तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविता आहे. अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, मार्केट … Read more

PUNE: मार्केट यार्डात दुय्यम दर्जाच्या शेतमालाचाच बाजार

पुणे – बाजार समिती आवाराबाहेर नियममुक्ती आहे. त्यामुळे बाहेर खरेदी-विक्री करण्यासाठी कोणताच कर लागत नाही. परिणामी, मार्केट यार्डाऐवजी थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याची पद्धत खरेदीदारांकडून रूढ होत आहे. शहरातील मोठे व्यापारी तसेच मॉलधारक शेतात जाऊन उत्कृष्ट शेतमालाची खरेदी करतात. त्यानंतर राहिलेला माल शेतकऱ्यांकडून बाजारात पाठवून दिला जात आहे. त्यामुळे मार्केटयार्डात दुय्यम दर्जाचा माल येण्यात लक्षणीय वाढ झाली … Read more

PUNE: तासगावच्या द्राक्षांचीच बाजारात चलती

पुणे – आंबट गोड चवीच्या द्राक्षांची मार्केट यार्डात आवक वाढली आहे. पुण्यासह नगर, सातारा जिल्ह्यांतून ही आवक होत आहे. त्यात सांगली जिल्ह्यातील तासगाव भागातील द्राक्षांचीच चलती आहे, अशी माहिती द्राक्षांचे व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली. किरकोळ बाजारात दर्जानुसार ५० ते १०० रुपये किलो भावाने द्राक्षांची विक्री होत आहे. सध्या मार्केट यार्डातील फळ विभागात दररोज १२ ते … Read more

PUNE: मार्केट यार्डात हंगामातील जांभळाची पहिली आवक

पुणे : मार्केट यार्डात जांभळाची हंगामातील पहिली आवक झाली आहे. घाऊक बाजारात प्रतिकिलोस तब्बल ६०० रुपये भाव मिळाला. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील संपत कोथिंबिरे यांच्या शेतातून ५ किलो जांभळाची आवक झाली. येत्या काही दिवसांत जांभळाची आवक नियमित होणार असून, त्यामध्ये वाढ होईल, असे व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी सांगितले़. दरम्यान पहिल्या जांभळांची पूजा करण्यातन आली़. त्यावेळी … Read more