सर्वदुःखहरे देवि महालक्ष्मि नमोऽस्तुते।। श्री लक्ष्मीचे घरोघरी पूजन…

दिवाळी उत्सवात श्री लक्ष्मीच्या स्वागतासाठी रांगोळी रेखाटताना कर्वेनगर येथील रहिवासी संपदा हुद्देदार. पुणे – दिवाळीतील नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन रविवारी साजरा करण्यात आला. घरोघरी आणि व्यापाऱ्यांनी सायंकाळी श्री लक्ष्मी पूजा करून फटाक्‍यांची आतषबाजी केली. पहाटे अभ्यंगस्नान करून फराळ आणि देवदर्शन असा माहौल शहरात होता. दिवाळीतील लक्ष्मी पूजन हे घरोघरी आणि व्यापाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळेच … Read more

Pune: प्रतिज्ञापत्र न देणाऱ्या आडत्यांवर अखेर बाजार समितीचा कारवाईचा बडगा

पुणे : मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला विभागातील आडत्यांवर बाजार समिती प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. दोनदा मुदतवाढ देऊनही बाजार समितीच्या सुचनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या 116 डमींवर कारवाई करून जीएसटीसह 1 लाख 38 हजार 880 रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. मंगळवारी (दि.1) एका दिवसात ही कारवाई करण्यात आली. उद्याही (बुधवारी) कारवाई करण्यात येणार आहे. मार्केट यार्डातील … Read more

पुणे : मार्केटयार्ड फळ, भाजीपाला विभागातील बंद मागे

पुणे – शेतीमाल वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून शुल्क आकारण्यास सुरूवात केल्यानंतर मार्केट यार्डातील कामगार तसेच आडते असोसिएशनने येत्या रविवारपासून बेमुदत बंद पुकारला होता. बुधवारी मागे घेण्यात आला. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात बुधवारी पार पडलेल्या बैठकीत शेतीमाल वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून आकारण्यात येणाऱ्या पार्किंग शुल्क रद्द करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर बंद मागे घेण्यात आला. … Read more

पुणे | सीताफळांचा हंगाम सुरू, मार्केटयार्डात पहिली आवक

पुणे – गोड सीताफळांचा हंगाम सुरू झाला आहे. सोमवारी (दि. ३१) मार्केटयार्डातील फळ विभागात ६० किलो आवक झाली. घाऊक बाजारात किलोस दर्जानुसार ६० ते १२१ रुपये भाव मिळाल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि सीताफळांचे व्यापारी युवराज काची यांनी दिली. वडकी येथील शेतकरी शशिकांत पाटे यांच्या शेतातून काची यांच्या मे. तुळजाराम पंथाराम … Read more

काय…? पुण्याच्या बाजारात रत्नागिरी हापूस आला!; भाव वाचून व्हाल आवाक्‌

मार्केट यार्डात रत्नागिरी हापूसची पहिली आवक गेल्या वर्षीपेक्षा 15 दिवस आधीच दाखल   पुणे  – गोड, रसदार अशा रत्नागिरी हापूसची आवक मार्केट यार्डात सुरू झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा सुमारे पंधरा दिवस आधीच ही आवक झाली आहे. मे. नामदेव रामंचद्र भोसले अँड सन्स या पेढीवर आवक झालेल्या पाच डझनाच्या पेटीस तब्बल 25 हजार रुपये भाव मिळाला. … Read more

पुणे : मार्केट यार्डातील तरकारी विभागातून वर्षभरात सुमारे दीड लाख दंड वसुल

पुणे – मार्केट यार्डातील तरकारी विभागातही यावर्षी मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तरकारी विभागातील चार गटात मिळून 1 लाख 47 हजार 828 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. विभागप्रमुख दत्तात्रय कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली गटप्रमुख दादासाहेब वारघडे, दीपक थोपटे, दीपक टांगडे आणि आशिष राऊत यांनी ही कारवाई केली. गाळ्यापासून 15 फुटांच्या पुढे शेतीमालाची विक्री करणे, … Read more

ढगाळ हवामानाची धास्ती, पुण्यात फळभाज्यांची आवक वाढली पण…

पुणे  – उत्पादन वाढले पण, त्यातच ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांनी पीक बाजारात आणले आहे. त्यामुळे मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक वाढली आहे. त्या तुलनेत मागणी कमी असल्याने लसूण, सिमला मिरची, हिरवी मिरची, फ्लॉवर आणि कोबीच्या भावात घट झाली आहे. तर, मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास … Read more

पुणे : शिवनेरी रस्त्यावरील पूलाचे बांधकाम तुर्तास थांबविले

नेहरू रस्त्यावर करणार भविष्यात नियोजन : दैनिक प्रभातमध्ये प्रसिध्द झाले होते याबाबतचे वृत्त पुणे( प्रतिनिधी) – महापालिकेने मार्केटयार्ड येथील वखार महामंडळाकडून नेहरू रस्ता आणि शिवनेरी रस्त्याकडे जाण्यासाठी वाय आकाराच्या पुलाचे नियोजन केले होते. मात्र, भुसार बाजारातील व्यापाऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या विरोधानंतर शिवनेरी रस्त्यावरील पूलाचे बांधकाम महापालिकेकडून तुर्तास थांबविण्यात आले आहे. नेहरू रस्त्यावरील उड्डाणपूलाचे भविष्यात नियोजन करण्यात येणार … Read more

मार्केट यार्डासह बाजार समितीचे सर्व उपबाजार शनिवारी बंद !

पुणे : स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवार (दि.15 ऑगस्ट) पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य कार्यालय, मुख्य बाजार आवारातील फळे-भाजीपाला बाजार, पान बाजार, गुरांचा बाजार, केळी बाजार, गुळ-भुसार बाजार, फुलांचा बाजार, भुईकाटा केंद्र, पेट्रोलपंप विभाग याखेरीज मोशी, उत्तमनगर, मांजरी आणि खडकी उपबाजार बंद राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी बाजारात आणू नये, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाच्या … Read more

मार्केट यार्डात सिमला सफरचंदाची आवक सुरू

पुणे : चवीने गोड, लाल रंगाच्या सिमला सफरंदाची आवक मार्केट यार्डात हिमालच प्रदेश येथून सुरू झाली आहे. सध्या तुरळक प्रमाणात आवक होत असून, 15 ऑगस्टनंतर ही आवक वाढेल, अशी माहिती व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली. हिमाचल प्रदेश येथील बागेतून थेट 4 ते 5 दिवसात ग्राहकांच्या हातात हे सफरचंद येते. परिणामी, परदेशातून येणाऱ्या सफरचंदापेक्षा ताजे असतात. … Read more