New Parliament Inauguration : देशातल्या ‘या’19 प्रमुख राजकीय पक्षांचा नवीन संसद भवन उद्‌घाटन कार्यक्रमावर बहिष्कार

नवी दिल्ली – देशातील 19 प्रमुख राजकीय पक्षांनी एकमुखाने पंतप्रधान मोदींच्या हस्ते येत्या 28 तारखेला होणाऱ्या संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने लोकशाहीचा आत्माच हिरावून घेतला असल्याने आम्हाला संसदेच्या नवीन इमारतीत कोणतेही मूल्य दिसत नाही असे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पुर्ण बाजूला ठेवून स्वतः मोदींनीच या … Read more

#UPelections2022 : बसपा नेत्या मायावती भाजपच्या भाषेत बोलत आहेत

नवी दिल्ली -बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती या भाजपच्या भाषेत बोलत आहेत, अशी टीका मार्क्‍सवादी क्‍युनिस्ट पार्टीच्या नेत्या वृंदा कारत यांनी केली आहे. उत्तर प्रदेशातील मुस्लिम समाजवादी पार्टीबरोबर खूष नाहीत आणि सपाला मत देणे म्हणजे गुंडा राज आणि माफिया राजला मत देण्यासारखे आहे, असे मायावती म्हणाल्या होत्या. मात्र एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करण्यासाठीचे मायावतींचे वक्तव्य … Read more

मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मध्यवर्ती समितीची बैठक सुरू; कॉंग्रेसबरोबर समझौताच्या विषयावर चर्चा

नवी दिल्ली – मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मध्यवर्ती समितीची तीन दिवसांची बैठक आजपासून दिल्लीत सुरू झाली. देशातील विविध ठिकाणच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसबरोबर समझौता करण्याबाबतच्या विषयावर यावेळी प्रामुख्याने चर्चा होणार आहे. कॉंग्रेसबरोबर निवडणूक आघाडी करण्याविषयी पक्षाच्या पॉलिट ब्युरोमध्ये दोन गट पडले आहेत. एक गट कॉंग्रेसबरोबर आघाडी करण्यासाठी आग्रही आहे, तर दुसरा गट अशी आघाडी करण्यास फारसा उत्सुक नाही. … Read more

नवीन कामगार कायदा कामगारांच्या मुळावर

मार्क्‍सवादी कम्युनिष्ट पक्षाकडून निषेध चिखली – कामगार कायद्यात बदल करून कामगारांची मुस्कटदाबी नवीन कामगार कायद्याने केली आहे. कंपनी कामगारांना आपल्या हक्‍काबाबत कंपनी अस्थापनाविरोधात आवाज उठविता येणार नाही. त्यामुळे नवीन कामगार कायदा हा कामगारांच्या मुळावर आला आहे अशी भावना माकपने व्यक्‍त केली आहे. या कायद्याने कंपन्या कामगारांचे शोषण करण्यास मोकळ्या झाल्या आहेत. त्यामुळे ह्या कायद्याचा माकपकडून … Read more

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यावेळी माकप करणार निदर्शने

भारताच्या हिताला बाधा पोहचवून अमेरिकी अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचा उद्देश असल्याचा आरोप भुवनेश्‍वर : डाव्या पक्षांचे नेतृत्व करणाऱ्या मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यावेळी निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या हिताला बाधा पोहचवून अमेरिकी अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी ट्रम्प येत असल्याचा आरोप माकपने केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून ट्रम्प प्रथमच भारतात येत … Read more