पिंपरी | मावळ तालुक्यातील रस्त्यांची वाट बिकट

मावळ – मावळ तालुक्यातील अनेक रस्त्यांची वाट बिकट झालेली असून ठिकठिकाणी खोदकाम, अर्धवट रस्ते केलेले असल्याने या पावसाळ्यातही ग्रामस्थांना चिखल तुडवावा लागणार आहे. दमदार पावसाला सुरवात होण्यापूर्वी गावांतील रस्त्यांची दुरुस्ती, डागडुजी करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. मावळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये अद्यापही चांगले रस्ते नाहीत. अनेक ठिकणी माती, खडी, मुरूम टाकलेले रस्ते आहेत. त्यातूनच ग्रामस्थांना वाट … Read more

पिंपरी | मावळातील उमेदवारांचा पाचव्या टप्प्यातील निवडणूक प्रचारात सहभाग

पिंपरी, (प्रतिनिधी) – मावळ लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यात निवडणूक पार पडल्यतानंतर आता प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार पाचव्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारात सहभागी झाले आहे. पक्षाच्या वरिष्ठा पातळीवरून आलेल्या सूचनांनुसार हे उमेदवार आता आपल्या अथवा मित्र पक्षाच्या प्रचार सभाव रॅलीदरम्यान दिसत आहेत. मावळ लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत बसप हा राष्ट्रीय पक्षवगळता प्रादेशिक व अपक्षांचा मोठा भरणा होता. … Read more

पिंपरी | मावळमध्‍ये वन्‍य प्राण्‍यांसाठी टँकरद्वारे पाणी

सोमाटणे, (वार्ताहर) – मावळ तालुक्‍यातील चौराई डोंगर, तळेगाव खिंड ते बऊर खिंडीपर्यंतच्या जंगलातील वन्यजीवांसाठी वनविभागाने पाणवठ्यांवर पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे, ऐन उन्हाळ्यात वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. चौराई डोंगर, तळेगाव खिंड ते बऊर खिंडीपर्यंतचे घनदाट जंगल हे वन विभागाच्या अख्यत्यारित येते. या जंगलात भेकर, ससा, रानडुक्कर, मोर, साप आदींसह विविध जातींचे पक्षी … Read more

पिंपरी | मावळ तालुक्‍यात शांततेत मतदान

मावळ – मावळ लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि. १३) मावळ तालुक्‍यात शांततेत मतदान झाले. मावळ तालुक्‍यात सकाळी सात वाजता मतदानाला सुरूवात झाली. पहिल्‍या दोन तासांत अवघे ३.४१ टक्‍के मतदान झाले. त्‍यानंतर मतदानाने काहीचा वेगा घेतला. सकाळी अकरा वाजेपर्यंत १४.७५ टक्‍के मतदान झाले. त्‍यानंतरच्‍या दोन तासात म्‍हणजे सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत मतदानाची टक्‍केवारी दुप्‍पट म्‍हणजे … Read more

पिंपरी | कामशेत- जांभवली रस्त्यावर जागोजागी खड्डे

नाणे मावळ, (वार्ताहर) – मावळ तालुक्यातील नाणे मावळातील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. कामशेत- जांभवली मार्ग अंत्यत खराब झाला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून, नाणे गावातील शेजारील येथे रस्ता मधोमध अपूर्ण ठेवला आहे. अपूर्ण रस्ता व रस्त्यातील खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. नाणे मावळातील … Read more

पिंपरी | मावळसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

पिंपरी, (प्रतिनिधी) – मावळ लोकसभा मतदार संघासाठी येत्या सोमवारी (दि. १३ मे) मतदान घेण्यात येणार आहे. मावळातील सहा विधानसभा मतदार संघात सुरक्षितरित्या मतदान पार पाडण्यासाठी सुमारे १२ हजार मतदार अधिकारी व कर्मचारी संपूर्ण कामकाज पाहणार आहेत. त्यासाठी लागणा-या मतदान यंत्रांची वाहतूक करण्यासाठी एका बोटीसह पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमल) १७५ बसेस, एसटी महामंडळाच्या २१९ बसेस, … Read more

पिंपरी | मावळात कोंबड्या जगवायच्या कशा ?

कामशेत (वार्ताहर) – मावळ तालुक्यात जवळपास एक हजार उत्पादक कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतात. शेतात शेड उभारून अनेकजण शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतात. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे कोंबड्या जगवायच्या कशा ? असा प्रश्न कोंबडी उत्पादकांना पडला आहे. तर काही उत्पादकांनी कोंबड्यांच्या शेडमध्ये कुलर लावले आहेत. मावळ तालुक्यात पिल्ले तयार करणाऱ्या पोल्ट्रीची तालुक्यात … Read more

पिंपरी | मावळमधील आंबे विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट

तळेगाव स्‍टेशन (वार्ताहर) – कोकणचा राजा म्हणून ओळख असलेला हापूस आंबा बाजारात दाखल झाला, तसेच हापूसच्या नावाखाली इतर आंबे मिसळून ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकारही वाढताना दिसत आहेत. देवगड, रत्नागिरी भागातून तळेगाव, वडगाव, कामशेत आणि लोणावळा परिसरात आंब्‍याच्‍या पेट्यांची आवक झाली आहे. त्याशिवाय कर्नाटक, केरळ, काही प्रमाणात उत्तर भारतातूनही आंबा बाजारात आला आहे. आंब्याच्या मोसमात कोकणातील … Read more

पिंपरी | मावळ तालुक्‍यात उन्हाच्या झळा असह्य

नाणे मावळ, {अतुल चोपडे} – महाशिवरात्रीनंतर मावळ तालुक्‍यातील ग्रामीण भागात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. सरासरी तापमानात आत्‍तापर्यंत चार ते पाच अंशाने वाढ झाली आहे. दुपारी बारा ते चार वेळेत उन्हाच्या तीव्र झळा जास्त जाणवत असल्याने घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात कमाल व किमान तापमानात वाढ होत आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ३५ … Read more

पिंपरी | मावळ तालुक्‍याच्‍या पाऱ्याची ४० अंशांकडे वाटचाल

कान्‍हे, (वार्ताहर) – मावळ तालुक्‍यात उन्हाचा चटका वाढला आहे. येथील कमाल तापमान वाढ झाली असून उन्‍हाचा पारा ४० अंश सेल्सियसच्‍या समीप आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्‍या काही दिवसांत उन्‍हाचा तडका आणखीन वाढण्‍याची शक्‍यता आहे. मावळ तालुक्‍यात दुपारी एक ते चार वाजेपर्यंत पारा ३८ ते ३९ अंश सेल्सियसपर्यंत नोंदविला गेला. सायंकाळी सहा वाजता तापमानात फरक … Read more