पिंपरी | पवना धरणात अवघा ४५ टक्के पाणीसाठा

पवनानगर, (वार्ताहर) – पिंपरी चिंचवड व मावळ तालुक्यासह अनेक भागांची तहान भागवणाऱ्या पवना धरणात ४६ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे व पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पवना धरण शाखा अभियंता रजनीश भारिया यांनी केले आहे. संपूर्ण राज्‍यात सरासरी इतका पाऊस झाला नाही. त्‍यामुळे शेतीसह पिण्‍याच्‍या पाण्‍याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. … Read more

पिंपरी | मावळ तालुक्यात शिकारी थांबणार कधी?

पवनानगर, (वार्ताहर) – मावळ तालुका निसर्ग सौंदर्य नटलेला तालुका आहे. मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात डोंगर भाग असून तेथे मोठ्या प्रमाणावर प्राणी, पक्षी यांचा वावर आहे. गेल्या १५ दिवसांपासून मावळ तालुक्यात शिकारीचे प्रमाण वाढले आहे. पंरतु, वनविभागचे याकडे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. मावळ तालुक्यातील महागांव येथे गेल्या आठवड्यात एक कुत्रा, वाऊंड येथे तरस जातीच्या प्राण्याची … Read more

पिंपरी | शिमगोत्सवातील साखरगाठीचे महत्त्व झाले कमी

कान्हे, (वार्ताहर) – मावळ तालुक्यात विशेष करून ग्रामीण भागात शिमगोत्सोवात पूर्वी साखर गाठीला मोठे महत्त्व होते. होळीच्या दिवशी पूजेसाठी लहान मुलांच्या गळ्यात साखरगाठी असायची. तिचा प्रसाद म्हणून वाटप केला जात असे. जीवनात गोडवा यावा हा त्यामागे चा मोठा उद्देश असे. मात्र, आधुनिक काळात साखरगाठीची ही परंपरा दुर्मिळ होत आहे. सोशल मीडियाच्या युगात होळी सणाला ही … Read more

पिंपरी | मावळ तालुक्‍यातील गावागावांमध्ये यात्रांचा धडाका

कामशेत, {चेतन वाघमारे} – वर्षातून एकदा ग्रामदैवताच्या यात्रेनिमित्त पाहुणे व मित्रमंडळींना बोलावून मांसाहारी शाकाहारी जेवणाचा बेत आखणे म्हणजे यात्रा. साधारणतः चैत्र महिन्‍याच्‍या सुरूवातीपासून ग्रामीण भागात यात्रांचा धूमधडाका सुरू झाला आहे. यात्रेचे निमंत्रण देण्यासाठी पाहुणे व मित्रमंडळींची लगबग सुरू झाली आहे. यानिमित्ताने लाखो रुपयांची उलाढाल होत असून, छोट्या व्यावसायिकांना चांगले दिवस आले आहेत. यात्रेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम … Read more

पिंपरी | पवार साहेबांना आयोजकांनी चुकीची माहिती दिली- सुनील शेळके

वडगाव मावळ, (प्रतिनिधी) – मी कधीही दमदाटी केलेली नाही. शरद पवार साहेबांना चुकीची माहिती दिल्‍याने त्‍यांनी आपल्‍याबाबत वक्‍तव्‍य केले, असा दावा मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. लोणावळा येथील मेळाव्‍यात बोलताना शरद पवार यांनी कार्यकर्त्‍यांना दमदाटी करू नका, अन्‍यथा गाठ माझयाशी आहे, असा इशारा आमदार सुनील शेळके यांना दिला. याबाबत शेळके यांना विचारले असता … Read more

पिंपरी | श्री एकविरा विद्या मंदिरचा मावळ तालुक्यात डंका

कार्ला, (वार्ताहर) – महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियनाअंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या श्री एकविरा विद्या मंदिर व श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनियर कॅलेजचा मावळात द्वितीय क्रमांक मिळाला आहे. मावळ तालुक्यातील प्राथमिक व खासगी अशा एकूण ४२९ शाळामंधून खासगी शाळेमध्ये तालुक्यात … Read more

पिंपरी | धडे गिरवण्याची वयात मुलांच्या हातात कासरा

नाणे मावळ,  (वार्ताहर) – मावळ तालुक्यात घरटी बैल जोडी पाळली जाते. काही शेतकरी बांधब बैलाचा वापर हा शेती व शर्यतीसाठी करतात. मावळ तालुक्यात व महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत हा पारंपरिक आहे. मात्र, धडे गिरवण्याची वयात मुलांच्या हातात कासरा आला आहे. शिक्षणापेक्षा बैलगाडा शर्यतीकडे मुले जास्त लक्ष देताना दिसत आहेत. त्यामुळे या मुलांच्या भवितव्याची चिंता व्यक्त होत … Read more

पिंपरी | बैलगाडा शर्यतही होतेय हायटेक

कान्हे, {सोपान येवले} – मावळ तालुक्‍यातील ग्रामीण भागातील यात्रेनिमित्त होणारी बैलगाडी शर्यत हायटेक होत चालली आहे. या बैलगाडा शर्यतीसाठी ट्रॅक्टर, जेसीबी, कार, बुलेट अशा लाखो रुपयांच्‍या बक्षिसांची लयलूट होताना दिसत आहे. मावळ तालुक्यात ग्रामीण भागात यात्रेनिमित्त अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यत आयोजन करण्याची परंपरा आहे. मध्यंतरी काही काळात बैलगाडा शर्यतीवर बंदी होती. परंतु, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने … Read more

पिंपरी | मावळकरिता सर्वच राजकीय पक्षांचे गुडघ्याला बाशिंग

पिंपरी, (प्रतिनिधी) – मावळ लोकसभा मतदार संघात हॅटट्रीक करण्यासाठी इच्छूक असलेले खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला महायुतीधील घटक पक्षांमधूनच विरोध वाढू लागला आहे. तर बहुतांशी सर्वच राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर मावळ लोकसभा मतदार संघ आहे. परिणामी सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारीकरिता उतावळेपणा दिसत आहे. मावळ लोकसभेतून यावेळचा खासदार कमळाच्या चिन्हावर निवडून आणण्याचा संकल्प मावळ विधानसभेतील भाजपच्या पदाधिकार्‍यांनी … Read more

पिंपरी | दूध अनुदान योजनेला महिन्याची मुदतवाढ

वडगाव, (वार्ताहर) – मावळ तुलाक्यात शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय केला जातो. राज्यातील सहकारी संघ व खासगी दूध प्रकल्पांना पुरवठा करणार्‍या उत्पादकांना दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याच्या योजनेची मुदत एक महिन्याने वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. दूध प्रकल्पांना पुरवठा करणार्‍या उत्पादकांना दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याच्या योजनेची मुदत देण्याचे … Read more