पिंपरी | मावळातील शेतकऱयांना प्रतीक्षा पावसाची

सोमाटणे, (वार्ताहर) – मावळ तालुक्यातील अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यावसाय करतात. त्यांच्यासाठी लागणाऱया चाऱयाचे डोंगरदऱ्यातील क्षेत्र कमी होत असून जनावरांचे आजार, औषध आणि चाऱ्याच्या वाढत्या खर्चाने दुग्धउत्पादक शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे, त्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. पावसाळ्यात डोंगरदऱ्यात जनावरांसाठी मुबलक चारा मिळत असल्याने शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायातून … Read more

पिंपरी | लग्‍न, यात्रांमुळे एस.टी. बसेस फुल्ल

पवन मावळ {रवी ठाकर} – मावळ तालुक्‍यात प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या गेल्‍या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या तालुक्‍यातील अनेक ठिकाणी यात्रा, उरूस, लग्न समारंभ व इतर कार्यक्रम सुरू आहेत. तसेच निवडणुकीत मतदान करण्‍यासाठीही अनेकजण गावाकडे येत आहेत. त्यामुळे तालुक्‍यातील शहर भागातील बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे. अनेक प्रवासी तासान्‌तास ताटकळत आहेत. … Read more

पिंपरी | मावळमधील झाडांना फणसाचा बहर

पवनानगर (वार्ताहर) – मावळ तालुक्यातील धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर झाडे फणसांनी बहरलेली आहेत. झाडांवर लागलेले फणसांचे फड पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. व्यापार किंवा व्यवसायासाठी इतर शेतीमालाप्रमाणे फणसाची लागवड केली जात नाही. त्यामुळे, नैसर्गिकरित्या प्राप्त झालेल्या फणसाच्या विक्रीतून काही शेतकरी चांगली कमाई करत असतात. असेच नैसर्गिकरित्या तालुक्यातील डोंगर भागातील मोरवे, कोळेचाफेकर, आपटी, गेव्हंडे, आजिवली, चावसर, … Read more

पिंपरी | मावळ तालुक्यातील शेतकऱयांना शंभर कोटीचे कर्ज

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – मावळ तालुक्यातील शेतकरी बांधवांना शेती व शेतीपुरक व्यवसाय करण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्यामाध्यमातून सुमारे १०० कोटी रूपये कर्ज वाटप केले जाणार असून त्यासाठी शासनाच्या व्याज अनुदानाचा फायदा शेतकरी बांधवांना देणार आहे, अशी माहिती बॅंकेचे संचालक ज्ञानेश्वर तथा माऊली दाभाडे यांनी दिली. बॅंकेचे संचालक माऊली दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली तळेगाव दाभाडे शाखेत … Read more

पिंपरी | पवन मावळ युवा मोर्चा अध्यक्षपदी नितीन लायगुडे

पवनानगर, (वार्ताहर) – आजिवली – जोवन गावचे माजी सरपंच नितीन लायगुडे यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पवन मावळच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड मावळ तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष नितीन मराठे यांनी केली. नियुक्ती पत्र माजी मंत्री व प्रदेश उपाध्यक्ष बाळा भेगडे यांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी माजी मंत्री बाळा भेगडे, खासदार … Read more