Tokyo Olympics | मेरी कोमकडून पदकाची अपेक्षा

नवी दिल्ली -एक खेळाडू म्हणून ही माझी अखेरची ऑलिम्पिक स्पर्धा आहे. उद्‌घाटन सोहळ्यात संघाचे प्रतिनिधित्व करायला मिळणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. यासाठी मी क्रीडा मंत्रालय आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेची आभारी आहे. मी पदक मिळवण्यासाठी महत्त्वाचे योगदान देईन, असा निर्धार भारताची ऑलिम्पिक पदकविजेती महिला मुष्टियुद्धपटू मेरी कोम हिने व्यक्‍त केला आहे. मेरी कोम ही भारतासाठी ऑलिम्पिक स्पर्धेत … Read more

Tokyo Olympics | पदक जिंकण्याचे आव्हान – पुनिया

नवी दिल्ली – जपानमध्ये येत्या 23 जुलैपासून सुरू होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणे आव्हान असते. मात्र, त्यातही कुस्तीत 65 किलो वजन हा जास्त कठीण गट मानला जातो. याच गटात मला यशस्वी व्हायचे आहे, असे मत भारताचा अव्वल कुस्तीपटू बजरंग पुनियाने व्यक्‍त केले आहे.  जागतिक दर्जाचे कुस्तीपटूदेखील या गटात खेळण्यासाठी व जिंकण्यासाठी आतुर असतात. मलाही … Read more

Pune | पोलीस दलात उल्लेखनीय आणि प्रशंसनीय कामगिरीबद्दल पदक जाहीर; सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक

पुणे – महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला आज राज्यातील पोलीस दलात उल्लेखनीय आणि प्रशंसनीय कामगिरी केल्याबद्दल दिले जाणारे राष्ट्रपती पोलीस पदक, पोलीस पदक व पोलीस शौर्य पदक जाहीर झाले आहेत. राज्यातील 779 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यंदा पदक मिळाले आहे. पुणे शहर पोलीस दलातील सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक मिळाले आहे. … Read more

Mary Kom | टोकियो ऑलिम्पिक पदकाचे लक्ष्य – मेरी कोम

नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिक हे माझ्या कारकिर्दीमधील अखेरचे ऑलिम्पिक असेल. या स्पर्धेत पदक मिळवून कारकिर्दीची सांगता यशस्वी करण्याचे लक्ष्य आहे, असे मत भारताची अव्वल महिला बॉक्‍सर मेरी कोम हिने व्यक्त केले आहे. कारकिर्दीत सहा वेळा जगज्जेती ठरलेल्या मेरीने माझे 2012 ऑलिम्पिकमधील ब्रॉंझपदक देशातील तरुणींना या खेळाकडे वळविण्यासाठी प्रेरक ठरले याचा मला अभिमान वाटतो, असे … Read more

महाराष्ट्रातील तीन तुरुंग कर्मचाऱ्यांना सुधारात्मक सेवा पदक

नवी दिल्ली : देशातील 52 तुरुंग अधिकारी व कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय कार्यासाठी आज सुधारात्मक सेवा पदक जाहीर झाले. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सुधारात्मक सेवा पदकांस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज मंजुरी दिली आहे. तुरूंगसेवेत कैद्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या उपक्रमाबद्दल सुधारात्मक सेवा पदक प्रदान करण्यात येतात. देशातील … Read more

ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकायचे असेल तर योजनांची अंमलबजावणी आवश्‍यक

माजी हॉकीपटू भास्करन यांचा सल्ला नवी दिल्ली – भारतीय हॉकी संघाला टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकायचे असेल तर तयार केलेल्या सर्व योजनांची अंमलबजावणी अत्यंत योग्य पद्धतीने केली पाहिजे, असा सल्ला माजी आंतरराष्ट्रीय हॉकीपटू व भारतीय हॉकी संघाचे माजी प्रशिक्षक व्ही. भास्करन यांनी दिला आहे. हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे. त्यात आपण 8 ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकून … Read more

महिला हॉकी संघ पदक जिंकेल- सविता

नवी दिल्ली :- रिओ ऑलिम्पिकच्या वेळी खेळाडू नवखे होते त्यामुळे तेव्हा यश मिळाले नाही. मात्र, आता खेळाडू परिपक्‍व झाले आहेत. पुढील वर्षी होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचा महिला संघ पदक निश्‍चितच जिंकेल, असा विश्‍वास भारताच्या महिला हॉकी संघाची गोलकिपर सविता हिने व्यक्‍त केला आहे.  रिओ स्पर्धेत भारतीय संघातील अनेक खेळाडू नवख्या होत्या. त्यांना प्रत्यक्ष स्पर्धेचा … Read more

टोकियो ऑलिम्पिक पदकाचे साक्षी मलिकचे लक्ष्य

नवी दिल्ली – सुशीलकुमार व योगेश्‍वर दत्त यांच्याकडून प्रेरणा घेतली व अत्यंत कठोर मेहनत घेतल्यामुळेच 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकू शकले, अशा शब्दांत भारताची अव्वल कुस्तीपटू साक्षी मलिकने आपल्या यशाचे इंगित सांगितले. लहानपणापासूनच मला कुस्तीबद्दल आकर्षण होते. पुरुषांचाच समजला जात असलेला कुस्ती हा खेळ एक मुलगी खेळते याची उत्सुकता जनसामान्यांना होती. त्यामुळे मी जेव्हा सराव … Read more

टोकियोत पदकाला गवसणी घालणार….

मुष्टियुद्ध खेळाडू पूजाराणीचा विश्‍वास नवी दिल्ली – करोनामुळे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा जरी एक वर्ष पुढे गेली असली तरीही त्या स्पर्धेत सरस खेळ करून देशाला पदक जिंकून देणार, असा विश्‍वास भारताची अव्वल मुष्टियुद्ध खेळाडू पूजाराणी हिने व्यक्त केला आहे. मूळ वेळापत्रकानुसार यंदाच्या वर्षी ही स्पर्धा होणार होती. मात्र, करोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत गेल्याने आयोजकांनी ही स्पर्धा … Read more

मनिकाचे टोकियो पदकाचे लक्ष्य…

नवी दिल्ली – भारताची अव्वल मानांकित टेबल टेनिसपटू मनिका बात्रा टोकियो ऑलिम्पिकच्या दृष्टीने सध्या तयारी करत आहे. या स्पर्धेत देशाला पदक मिळवून द्यायचा निर्धारही तिने व्यक्‍त केला आहे. मनिकाची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. तिने यासाठी भारतीय टेबल टेनिस महासंघाचे आभारही मानले आहेत. राष्ट्रकुल स्पर्धा, आशियाई स्पर्धा, दक्षिण आशियाइ स्पर्धा व सातत्याने होत असलेल्या … Read more