satara | मेडिकल कॉलेजचे बांधकाम बंद पाडणार्‍यांवर कारवाई करा

सातारा, (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम बंद पाडणार्‍यांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हा जिल्ह्यातील मोठा प्रकल्प असून, तो लवकरात लवकर पूर्ण झाला पाहिजे. कारण या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमुळे सातार्‍यातील शाळांच्या प्रगतीवर सकारात्मक परिणाम होणार असून, अर्थकारणाला गती मिळणार … Read more

पुणे | मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोहिमेत जिल्हा राज्यात अव्वल

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जिल्ह्यात आतापर्यंत 12 हजार 471 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, राज्य शासनाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करून जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यामध्ये औंध जिल्हा रुग्णालयासह पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या साह्याने हे उद्दिष्ट गाठता आले. प्रधानमंत्री नेत्रज्योती अभियानाअंतर्गत मोतिबिंदूमुक्त महाराष्ट्र हा उपक्रम हाती घेण्यात … Read more

पुणे | पुणेकर मतदार महायुतीलाच साथ देणार

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गेल्या दहा वर्षांत केंद्र शासनाच्या माध्यमातून भाजप तसेच राज्यातील महायुती सरकारने पुण्यात मेट्रो, स्मार्ट सिटी, नदी पुनरुज्जीवन प्रकल्प, पीएमपीसाठी ई-बस, वैद्यकीय महाविद्यालय, सर्वसामान्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे असे अनेक महत्त्वाचे प्रकल्प दिले. यातून शहराच्या दीर्घकालीन विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. पुणेकर नागरिक नेहमीच्या विकासाच्या बाजूने असतात, मतदान करतात आणि उमेदवाराला निवडून … Read more

पिंपरी | केंद्रीय राज्यमंत्री जॉन बार्ला यांची वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

पिंपरी, (प्रतिनिधी) – केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री जॉन बार्ला यांनी पिंपरी येथील डॉ. डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्राला भेट दिली. वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि रूग्ण सेवेतील उत्कृष्टतेसाठी प्रसिद्ध असलेल्या या संस्थेच्या वतीने आरोग्य सेवा क्षेत्रातील अत्याधुनिक सुविधा आणि प्रगतीची संधी असणाऱ्या संभाव्य क्षेत्रांबाबत बार्ला यांच्याशी विस्तृत चर्चा करण्यात आली. यावेळी बार्ला यांनी, … Read more

Pune : वैद्यकीय महाविद्यालय विकत देण्याच्या अमिषाने 2 कोटी 21 लाखाची फसवणूक

पुणे : वैद्यकीय महाविद्यालय असलेले कर्नाटक येथील शैक्षणिक संकुल विकत देण्याच्या अमिषाने बनावट सामंजस्य करार (एमओई) करून 2 कोटी 21 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी धारवाड येथील धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटरचे मुख्य प्रशासकीय अधिकारी संजोग महादेव देशमुख (रा. मायणी, ता. खटाव, जि. सातारा) याला अटक … Read more

वैद्यकीय महाविद्यालयाशी आमचा संबंध नाही; अधिष्ठाताच्या लाचखोरीनंतर महापालिका प्रशासनाची भूमिका

पुणे -“भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय महापालिकेचे असले, तरी त्याच्या संचलनासाठी महापालिकेने ट्रस्टची स्थापना केली आहे. या ट्रस्टकडून वैद्यकीय प्रवेशाचे सर्व अधिकार अधिष्ठाता डॉ. आशिष बंगिनवार यांना देण्यात होते. महापालिका केवळ महाविद्यालयासाठी पायाभूत सुविधा देण्यापर्यंत मर्यादित आहे. प्रवेश प्रक्रियेत महापालिकेचा कोणताही संबध नाही,’ असा खुलासा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. रवींद्र बिनवडे यांनी बुधवारी केला. बंगिनवार यास … Read more

पाणीपुरी खाल्ल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू, धक्कादायक घटनेने राज्यात खळबळ

नागपूर – पाणीपुरी म्हंटले कि सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते आणि आपण हमखास पाणीपुरी खातो. मात्र पाणीपुरी खाऊन नागपूर येथे एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाला आहे. मिळलेल्या माहितीनुसार, मेडिकल रुग्णालयाशी संलग्नित बी. एससी. नर्सिंग महाविद्यालयातील एका विद्यार्थीनीने काही दिवसांपूर्वी पाणीपुरी खाल्ली.यानंतर काही तासांनी तिची प्रकृती बिघडली. मेडिकलमध्येच उपचारादरम्यान तिचा गुरूवारी रात्री मृत्यू झाला. या मृत्यूचे कारण शवविच्छेदन … Read more

बारामतीचे मेडिकल कॉलेज आता ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ नावाने ओळखले जाणार

बारामती (प्रतिनिधी) – बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या संस्थेचे “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती” असे नामकरण करण्याचा निर्णय शासनाने आज घेतला. राज्याचे उपसचिव प्रकाश सुरवसे यांनी हा निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्यानुषंगाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयने आयुक्त यांनाआवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात … Read more

प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणार – वैद्यकीय शिक्षणमंत्री महाजन

मुंबई : सर्वांना परवडणाऱ्या व उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात हे राज्य शासनाचे उद्दिष्ट असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभेत सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पावरील अनुदानाच्या मागण्यावर ग्रामविकास विभाग, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व … Read more

वैद्यकीय महाविद्यालय, विश्‍वकोश इमारत, पर्यटनासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद

सातारा – साताऱ्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि वाईतील मराठी विश्‍वकोशाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी, पर्यटनाला चालना देण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. वाई येथे नव्याने अद्ययावत मराठी विश्‍वकोश कार्यालयाची इमारत उभारली जाणार आहे. त्यासाठीची तरतूद या वेळच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी युवकांना जल, कृषी केंद्र, साहसी … Read more