Pune: ‘नीट’ चौकशी करा; परीक्षा गैरव्यवहाराबाबत आपची मागणी

पुणे – वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखी खाली विशेष तपास समिती स्थापन करून चौकशी करावी. विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, आवश्यकता भासल्यास ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे प्रदेश प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केली आहे. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्याच्या संधीसाठी आवश्यक असणाऱ्या नीट परीक्षेचे निकाल लागले आहेत. … Read more

वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश; व्यवस्थापन कोट्याचे शुल्क जाहीर

पुणे – वैद्यकीय अभ्यासक्रमांना व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी कमाल शुल्काची रक्‍कम जाहीर करण्यात आली. त्यापेक्षा अतिरिक्‍त शुल्क घेणाऱ्या शिक्षण संस्थांच्या विरोधात “डोनेशन’ घेतल्याचा ठपका ठेवले जाईल आणि त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती शुल्क नियामक प्राधिकरणकडून (एफआरए) देण्यात आली. एमबीबीएस, बीडीएस, एमडी, एमएस, बीएएमएस, बीएचएमएस अशा वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी वैद्यकीय महाविद्यालयांकडून मनमानी पद्धतीने … Read more

वैद्यकीय अभ्यासक्रमाची दुसरी निवड यादी जाहीर

पुणे – राज्यातील मेडिकल कॉलेजांमध्ये पदव्युत्तर पदवी; तसेच पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) दुसरी निवड यादी सोमवारी जाहीर केली आहे. या यादीतील विद्यार्थ्यांना दि.7 ते 14 जुलैपर्यंत निवड झालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागणार आहे. राज्य कोट्याअंतर्गत राज्यातील सरकारी आणि खासगी कॉलेजांमध्ये एमडी, एमएस अशा पदव्युत्तर पदवी; तसेच पदव्युत्तर … Read more

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती नाही

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे विद्यार्थ्यांना तात्पुरता दिलासा नवी दिल्ली : पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा आरक्षणानुसार प्रवेश प्रक्रियेचा मार्ग काही अटींसह तूर्तास मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी मराठा आरक्षणांतर्गत प्रवेश करण्यास तूर्तास स्थगिती दिलेली नाही. याबाबत महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावण्यात आली आहे. या आरक्षणांतर्गत झालेले प्रवेश हे आरक्षणाच्या मूळ याचिकेवरच्या निर्णयावर अधीन असतील … Read more