पुणे | नीट पीजी परीक्षा आता २३ जूनला

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – वैद्यकीय पदव्‍युत्तर अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्‍या नीट पीजी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार नीट पीजीची परीक्षा २३ जून रोजी होणार आहे. जुन्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा ७ जुलै रोजी होणार होती. या परीक्षेचा निकाल १५ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण मंडळ, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, वैद्यकीय … Read more

Pune: उद्योगपती रसिकलाल धारिवाल यांच्या जन्मदिनानिमित्त उपक्रम

पुणे – गरजू विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी प्रख्यात उद्योगपती रसिकलाल धारिवाल यांनी आरएमडी फाउंडेशनच्या मदतीने शिष्यवृत्ती योजना राबवून गेल्या 18 वर्षांपासून आजपर्यंत 12 हजारांपेक्षा अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ दिला आहे, अशी माहिती फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई आर. धारिवाल यांनी दिली. रसिकलाल धारिवाल यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश … Read more

MBBS साठी सर्वाधिक भारतीय विद्यार्थी जातात ‘या’ देशात ; मायदेशात परतल्यानंतर फक्त एवढेच बनतात डॉक्टर ; नेमकं कारण काय वाचा

Foreign Medical Graduates Examination।

 Foreign Medical Graduates Examination। भारतीयांमध्ये वैद्यकीय अभ्यासाची प्रचंड क्रेझ आहे. दरवर्षी 15 लाखांहून अधिक उमेदवार वैद्यकीय अभ्यासासाठी प्रवेश परीक्षेला बसतात, परंतु केवळ एक लाख उमेदवारांनाच महाविद्यालयात प्रवेश मिळतो. अशा परिस्थितीत उर्वरित विद्यार्थी परदेशात जाण्याचा मार्ग निवडतात. दरवर्षी हजारो भारतीय विद्यार्थी एमबीबीएस करण्यासाठी अमेरिका, यूके, रशिया, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्ये जातात. याच मोठं  कारण म्हणजे भारताच्या तुलनेत … Read more

पुणे | वैद्यकीय शिक्षण, आरोग्य, संशोधन संस्थांमध्ये समन्वय हवा – कानिटकर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य व संशोधन संस्था यात समन्वय असायला हवा. त्यामुळे आरोग्यविषयक संशोधनात मदत होईल, असे मत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्ट. जन. माधुरी कानिटकर यांनी व्‍यक्‍त केले. भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयातर्फे आयोजित १९ व्या वार्षिक संशोधन परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्‍या बोलत होत्‍या. या वेळी भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विवेक … Read more

मध्य प्रदेशात आता इंग्रजीसोबतच हिंदीतूनही घेता येणार वैद्यकीय शिक्षण

भोपाळ – हिंदी भाषेला राष्ट्रभाषा म्हणावे का, याबाबत बराच वाद आहे. विशेष म्हणजे दक्षिण भारतातील सर्वच राज्यांना या भाषेला कट्टर विरोध आहे. असे असले तरी देशात सगळ्यांत जास्त बोलली जाणारी भाषा म्हणून हिंदीचेच नाव घेतले जाते. आता मध्य प्रदेशात याच भाषेतून वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येणार आहे. बऱ्याच काळापासून त्यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर आता … Read more

वैद्यकीय शिक्षण विभागात लवकरच भरतीप्रक्रिया

मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण विभागासाठी आवश्‍यक असणाऱ्या वर्ग 1 आणि वर्ग 2 ची पदभरती करण्यात येत आहे. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. तसेच वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत वर्ग 3 पदभरतीबाबत जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे. वर्ग 4 बाबतची पदभरती अधिष्ठाता यांनी आपल्या स्तरावरुन करावी, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी … Read more

उत्तर प्रदेशात डॉक्‍टरांना शासकीय रुग्णालयात दहा वर्षे सेवेची सक्ती

लखनौ – दहावी-बारावीनंतर हमखास प्राधान्य दिले जाणारे व्यावसायिक करिअर म्हणून मेडिकल-इंजिनीअरींगकडे पाहिले जाते. अनेक राज्यांमध्ये वैद्यकीय पदवी मिळवल्यानंतर एक वर्ष शासकीय रुग्णालयांत सेवा करणे, हे अनिवार्य असते. मगच तुम्हाला तुमची खासगी प्रॅक्‍टीस करता येते. मात्र, उत्तर प्रदेश सरकारने एक नव्याने काढलेला आदेश वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना चिंताजनक ठरू पहात आहे. उत्तर प्रदेशात शासकीय रुग्णालयांमध्ये … Read more

कोरोना काळात वैद्यकीय शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित

नाशिक : कोरोना संकटाच्या या काळात संपूर्ण जगात वैद्यकीय शिक्षणाचे महत्त्व प्रकर्षाने अधोरेखित झाले असून सद्यस्थितीत डॉक्टरांचे काम सर्वात कठीण तर आहेच त्याचबरोबर चांगले डॉक्टर निर्माण करणे त्याहूनही कठीण असे आहे. परंतु आंतरिक ऊर्जा असेल तर सर्वच प्रकारच्या ऊर्जा कशा आपोआप संचारतात याचा अनुभव आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रूपाने संपूर्ण देशाने घेतला असल्याचे प्रतिपादन राज्यपाल तथा … Read more

स्वस्त वैद्यकीय शिक्षण, होमिओपॅथीच्या विधेयकाला मंजुरी

नवी दिल्ली – वैद्यकीय व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याच्या हेतूने संसदेने आज दोन विधेयकांना मंजुरी दिली. यापैकी एक विधेयक किफायतशीर वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित आहे. तर दुसरे विधेयक उच्च मूल्याच्या होमिओपॅथी आणि भारतीय वैद्यकीय उपचार पद्धतींच्या उपलब्धतेविषयी आहे. लोकसभेने आज राष्ट्रीय होमिओपॅथी आयोग विधेयक आणि भारतीय औषध व्यवस्था विषयी राष्ट्रीय आयोग ही दोन्ही विधेयके मंजूर केली.  राज्यसभेने ही … Read more

आता वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया “वन महाराष्ट्र, वन मेरिट” तत्वावर होणार

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची विधानसभेत घोषणा मुंबई : राज्यातील आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशामध्ये 70 टक्के प्रादेशिक कोटा आणि 30 टक्के राज्यस्तर कोटा या धर्तीवर यापूर्वी प्रवेश करण्यात येत होते. मात्र आता 70 : 30 प्रादेशिक कोटा कार्यपद्धत रद्द करण्यात आली असल्याने ‘वन महाराष्ट्र, वन मेरिट’ अशी वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया असेल, अशी घोषणा … Read more