ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती नजरकैदत

काश्‍मीर : जम्मू काश्‍मीरमधील तणावाची परिस्थिती कायम आहे. त्यातच आता माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष ओमर अब्दुल्ला या दोघांनाही नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. एवढेच नाही तर नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीच्या सगळ्या माजी मंत्र्यांनाही नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. काश्‍मीरमधल्या राजकीय घडामोडींबाबत फारुक अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीनंतर ही … Read more

काश्‍मीरमध्ये जमावबंदीचे 144 कलम लागू

ओमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती नजरकैदेत शाळा, महाविद्यालय आणि इंटरनेट सेवा बंद श्रीनगर: अमरनाथ यात्रा रद्द केल्यानंतर आता जम्मू-काश्‍मीरमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्यासह नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवण्यात आले अयल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी रात्री 12 वाजल्यापासून जमावबंदीसाठीचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. … Read more

काँग्रेसनेही स्वतःसाठी अमित शहा शोधावा – मेहबुबा  मुफ्ती 

श्रीनगर – लोकसभा निवडणुकीची मतमोजणी अद्याप सुरुअसली तरीही देशात मोदी लाट आल्याचे स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. तर काँग्रेसला एका सल्लाही दिला आहे. मेहबुबा मुफ्ती यांनी म्हंटले कि, या ऐतिहासिक जनादेशासाठी नरेंद्र मोदींचे अभिनंदन. आजचा दिवस निश्चितच भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांचा आहे. आता … Read more

रमझान महिन्यात जम्मू काश्मीर मध्ये दहशतवाद्यांविरोधात संघर्षविरामाची मेहबुबा मुफ्ती यांची मागणी

श्रीनगर – मुस्लीम धर्मियांसाठी पवित्र असलेल्या रमझानच्या महिन्यामध्ये जम्मू काश्‍मीर राज्यात दहशतवाद्यांविरुद्धच्या एकतर्फी सशस्त्र कारवाईची किंवा संघर्ष विरामाची अंमलबजावणी करण्याची मागणी, पीडीपीच्या अध्यक्षा आणि जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी आज केली आहे. मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारला आवाहन करत, रमझानचा महिना संपल्यावर येणारी ईद हा सगळ्यांत मोठा सण असतो. त्यामुळे या काळात अत्यंत … Read more

पाकनेही अण्वस्त्रे ईदसाठी ठेवलेली नाहीत -मेहबूबा मुफ्ती

श्रीनगर- भारताने जर त्यांच्याकडील अण्वस्त्रे दिवाळीसाठी ठेवली नसतील तर पाकिस्ताननेही अण्वस्त्रे ईदसाठी ठेवलेली नाहीत, असे पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी ट्‌विटरवरून म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या बाडमेरमध्ये ‘पाकिस्तान वारंवार भारताला त्यांच्याकडे असलेल्या अण्वस्त्रांची धमकी देत आला आहे. मात्र, आता भारत त्यांच्या धमक्‍यांना घाबरत नाही. आमच्याकडेही अण्वस्त्रे असून, ती आम्ही दिवाळीसाठी राखून ठेवलेली नाहीत.’ … Read more

भाजपाशी युती जनतेच्या भल्यासाठी होती – मेहबूबा मुफ्ती

श्रीनगर – भाजपबरोबर युती करण्याचा निर्णय माझा नसून माझे वडील मुफ्ती मोहम्मद सईद यांचा होता. कश्‍मिरी जनतेच्या भल्यासाठीच त्यांनी भाजपबरोबर हातमिळवणी केली होती, असे जम्मू-काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले आहे. कश्‍मिरी जनतेचा विश्‍वास गमावल्याने हतबल झालेल्या जम्मू-काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांना एका कार्यक्रमादरम्यान अचानक रडू कोसळले … Read more

… तर २०२० पर्यंत जम्मू-काश्मीर वेगळा होईल – मेहबूबा मुफ्ती

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीमध्ये कलम ३७० आणि कलम ३५ अ या मुद्यावरून राजकीय वाकयुद्ध सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. विशेषाधिकारचे कलम रद्द झाल्यास २०२० पर्यंत जम्मू-काश्मीर भारतापासून वेगळे करू, असे त्यांनी म्हंटले आहे. जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जागेवरून मुफ्ती यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मेहबूबा मुफ्ती यांनी म्हंटले कि, भाजप अध्यक्ष … Read more