पुणे तुंबले! सर्वच मुख्य रस्त्यांवर पाण्याचे पाट; साचलेल्या पाण्यामुळे वाहने ठप्प

पुणे – शहर- उपनगरांत शनिवारी अवघ्या दीड-दोन तासांत सुमारे १०० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला. या रौद्ररुपी पावसाने संपूर्ण शहर अक्षरश: पाण्याखाली गेले. जवळपास सर्वच मुख्य अरुंद रस्त्यांवर तीन ते चार फूट पाणी साचले. हे पाणी लोकवस्तीत शिरले. त्यामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांची धांदल उडाली. या साचलेल्या पाण्यात अनेकांची वाहने बंद पडल्याने नागरिकांना मोठी आर्थिक झळ सहन … Read more

पुणे | पुणेकर मतदार महायुतीलाच साथ देणार

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गेल्या दहा वर्षांत केंद्र शासनाच्या माध्यमातून भाजप तसेच राज्यातील महायुती सरकारने पुण्यात मेट्रो, स्मार्ट सिटी, नदी पुनरुज्जीवन प्रकल्प, पीएमपीसाठी ई-बस, वैद्यकीय महाविद्यालय, सर्वसामान्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे असे अनेक महत्त्वाचे प्रकल्प दिले. यातून शहराच्या दीर्घकालीन विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. पुणेकर नागरिक नेहमीच्या विकासाच्या बाजूने असतात, मतदान करतात आणि उमेदवाराला निवडून … Read more

पुणे | रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो सुरू

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या विस्तारित मेट्रो मार्गाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी आॅनलाइन हिरवा झेंडा दाखवण्यात आला. तसेच आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी या विस्तारित मार्गाचे भूमिपूजनही करण्यात आले. यापूर्वी ६ मार्च २०२२ रोजी पीसीएमसी ते फुगेवाडी या सात किलोमीटर आणि वनाज ते गरवारे पाच किलोमीटर मेट्रो … Read more

Pune: मेट्राचे वाहनतळ १० मार्चपासून सुरू

पुणे – पुणे मेट्रोच्या आठ स्थानकांवर दुचाकी व चारचाकी वाहने उभी करण्यासाठी सशुल्क जागा उपलब्ध करून देण्यात आली असून या स्थानकांवरील वाहनतळ दि. १० मार्चपासून सुरू होणार आहेत. या सर्व वाहनतळांवर बूम बॅरियर बसविण्यात आले आहेत. सिमेंटीकरण करण्यात आले आहे. वाहनांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. त्या ठिकाणी पुरेशी वीज व्यवस्था असेल, प्रवाशांना वाहनतळांवर अपद्वारेही … Read more

पुणे | महापलिका, मेट्रोच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीची पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी दुपारी पाहणी केली. या वेळी रस्त्यावरील खड्डे, ठिकठिकाणी पडलेली वाळू आणि अस्ताव्यस्त बॅरिकेटसंदर्भात त्यांनी महापालिका, पीएमआरडीए आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. त्यांना किती वेळात ही डागडुजी करणार, असा सवाल केला. त्याचबरोबर आज काम झाल्याशिवाय घरी जायचे नाही, असा दमही … Read more

Pune News : ‘प्रवाशांच्या सोईसाठी मेट्रो विमानतळापर्यंत जोडावी’; सुनिल टिंगरेंची विधानसभेत मागणी

विश्रांतवाडी (प्रतिनिधी) – पुणे शहरात मेट्रोचे जाळे उभे राहत आहे. मात्र, पुणे विमानतळाला मेट्रोची लाईन जोडण्यात आलेली नाही, प्रवाशांच्या सोईसाठी ही मेट्रो विमानतळापर्यंत नेण्यात यावी अशी मागणी वडगावशेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी विधानसभेत केली. विधानसभेतील चर्चेत आमदार टिंगरे यांनी सहभाग घेतला. यावेळी ते म्हणाले, शहरात मेट्रोचे जाळे अतिशय मोठ्या प्रमाणात पसरत चालले आहे, त्याला प्रवाशांचा … Read more

पुणे | कसबा पेठ, की बुधवार पेठ?

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट मेट्रोच्या भुयारी मार्गाचे काम अर्धवट आहे. हा मार्ग आणखी सुरू व्हायचा आहे. मात्र, मार्गावरील बुधवारपेठ स्थानकाच्या नावावरून वादाला तोंड फुटले आहे. हे नाव रद्द करावे, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केली आहे. या मागणीसाठी पक्षाकडून कसबापेठ येथील स्थानकाच्या जागी आंदोलन केले. तसेच स्थानकाचे नाव कसबा … Read more

PUNE: ट्रेलर उलटला, रस्ते जाम; दिवसभर कोंडी

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकाजवळ राजभवन येथे सकाळी मेट्रोचे साहित्य घेऊन जाणारा एक ट्रेलर उलटला. याचा परिणाम म्हणून बाणेर, औंध रोडवर शनिवारी सकाळीच वाहतूक कोंडी झाली. ही स्थिती दुपारपर्यंत कायम होती. यानंतर सायंकाळनंतर पुन्हा दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. आनंदऋषिजी चौक परिसरात मेट्रोचे काम सुरू आहे. या कामांसाठी … Read more

PUNE: नवीन वर्षात नागरिक मेट्रोवर मेहेरबान

पुणे – मेट्रोसाठी नवीन वर्ष आनंदाची बातमी घेऊन आले असून, नागरिक मेट्रोतून प्रवास करण्यास पसंती देत असल्याचे दिसत आहे. मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या जानेवारी २०२४ मध्ये दरदिवशी सरासरी ५६ हजार ६३३ झाली आहे. ६ मार्च २०२२ मध्ये मेट्रोची सेवा वनाज ते गरवारे महाविद्यालय या मार्गावर होती. त्यानंतर दरदिवशी प्रवासी संख्या केवळ २ हजार ५८२ होती, … Read more

PUNE: मेट्रोची स्थानके उजळणार सौर उर्जेने

पुणे – पुणे मेट्रो प्रकल्पातील दहा स्थानकांसाठीच्या दैनंदिन वापरासाठी महामेट्रोकडून सौर उर्जेचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी या स्थानकांसह वनाज डेपो आणि रेंजहिल डेपो येथे ४.३ मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्याचे लोकार्पण महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डाॅ. श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. या सौर ऊर्जा प्रकल्पामधून निर्माण होणाऱ्या विजेचा वापर स्थानके आणि डेपोच्या … Read more