satara | म्हसवड शहरात पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर

म्हसवड, (प्रतिनिधी) – शहरात सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला असुन १५ दिवसांतून एकवेळ पालिकेकडुन शहराला पाणी पुरवठा केला जात असल्याने शहरवासियांची पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. यावर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी येथील नाभिक गल्लीतील महिलांनी एकत्र येत थेट पालिकेत धडक मारत त्याठिकाणी ठिय्या मांडल्याने प्रशासनाची भंबेरी उडाली. जोवर पाणी मिळणार नाही तोवर न उठण्याचा निर्धार … Read more

satara | म्हसवड-पुळकोटी रस्त्यावर लागलेली आग विझवली

दहिवडी, (प्रतिनिधी) – म्हसवड-पुळकोटी रस्त्यावर अचानक वीज तार तुटल्याने शॉर्टसर्किट झाले. यामध्ये आग लागली आणि वाळलेले झाडझुडपे असलेने आगीने रौद्र स्वरूप धारण केले. ही घटना घडली त्यावेळी करण पोरे हे लोकसभेचा प्रचार करण्यात व्यस्त होते. घटना त्यांना प्रचारादरम्यान समजली असता त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत लोकसभा निवडणूक प्रचार सोडून घटनास्थळी धाव घेतली व आग विझवली. यामुळे … Read more

satara | प्रहार’तर्फे माण-खटाव विधानसभेसाठी अरविंद पिसे

म्हसवड, (प्रतिनिधी) – प्रहार जनशक्ती पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीतच आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम करत लोकसभेच्या या रणधुमाळीत माण-खटाव विधानसभेचा उमेदवार निश्चित केला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आ. बच्चू कडू यांनी पुण्यात झालेल्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत माण-खटाव विधानसभेसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे यांच्या नावाची घोषणा केली. आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच प्रहार … Read more

satara | माणगंगा शैक्षणिक संकुलाचे व्यावसायिक घडविण्याचे काम

म्हसवड, (प्रतिनिधी)- माणगंगा शैक्षणिक संकुलात व्यवसाय प्रशिक्षण देऊन व्यावसायिक पिढी घडवण्याचे काम संस्था करीत आहे, असे मत आयकर आयुक्त नितीन वाघमोडे यांनी केले. मासाळवाडी (म्हसवड) येथील माणगंगा शैक्षणिक संकुलामध्ये जालेल्या स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात नितीन वाघमोडे बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष नितीन दोशी होते. राज्य व्यवसाय प्रशिक्षण संघटनेचे अध्यक्ष सुहास पाटील, सुनील पोरे, राज सोणवले, … Read more

satara | माणदेशी फाउंडेशनतर्फे मुलींना सायकलींचे वाटप

म्हसवड (प्रतिनिधी) – येथील माणदेशी फाउंडेशनतर्फे मुलींसाठी किकस्टार्ट गर्ल्स कार्यक्रमाअंतर्गत नियमित कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी 100 मुलींना भेटवस्तू म्हणून सायकलींचे वाटप करण्यात आले. मुलींसाठी किकस्टार्ट गर्ल्स कार्यक्रम सप्टेंबर 2023 मध्ये अनघा कामत यांच्या संकल्पनेतून माणदेशी फाउंडेशन आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टीम कंपनीतर्फे सुरू करण्यात आला. ह्या उपक्रमाचा कालावधी ६ महिन्याचा होता. या कार्यक्रमात दर रविवारी माणदेशातील … Read more