राज्यमंत्री आणि स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री यांच्यात काय फरक? नेमके दोघांचे काय असते काम ? जाणून घ्या

PM Modi cabinet । नरेंद्र मोदी यांनी  सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पंतप्रधान मोदींसह 72 मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली. मोदींच्या मंत्रिमंडळात एकूण 72 मंत्र्यांचा समावेश आहे. त्यात पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात 30 कॅबिनेट मंत्री, 36 राज्यमंत्री आणि 5 स्वतंत्र प्रभार असलेल्या राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. राज्यमंत्री आणि स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री यांच्यात फरक काय आणि … Read more

विस्तार झाल्यास आमदार भरणे पुन्हा राज्यमंत्री?

विजय शिंदे वडापुरी – राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला असून, महायुती मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार नवरात्रोत्सवादरम्यान होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास माजी राज्यमंत्री व अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे हे पुन्हा एकदा राज्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची चर्चा आहे. आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय असून महाविकास … Read more

अंमली पदार्थ सेवन व विक्री प्रकरणी विशेष मोहीम – गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई

मुंबई : ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत उल्हासनगर येथे 29 नोव्हेंबर 2021 रोजी एका नायजेरीयन व्यक्तीकडून अंमली पदार्थासह 1 लाख 20 हजार रूपयांचा माल जप्त करण्यात आला असून त्या व्यक्तीला अटक करून त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.  मुंबई व उपनगरात अंमली पदार्थ सेवन व विक्री यास प्रतिबंध बसला पाहिजे यासाठी अधिवेशन संपण्यापूर्वी सर्व पोलीस उपायुक्तांना एक … Read more

“…तर राज्यातील मंदिरं पुन्हा बंद होऊ शकतात”; भाजपाच्या ‘या’ केंद्रीय मंत्र्यांकडून सूचक इशारा

नवी दिल्ली : ओमायक्रॉनसह मूळ करोना रुग्णांची संख्या देशात पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रासह दहा राज्यांमध्ये केंद्रीय पथके पाठवली आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेत झालेला निर्णय प्रक्रियेतील गोंधळ टाळण्यासाठी ओमायक्रॉनच्या नियंत्रणाची जबाबदारी केंद्राने राज्यांवर सोपवली आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्‍याण राज्‍यमंत्री डॉ. भारती पवार यांनी करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या … Read more

अन्नधान्य वितरण व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पारदर्शकता आणावी

मुंबई : अन्नधान्य वितरण व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पारदर्शकता आणावी असे निर्देश मंत्रालयात झालेल्या बैठकीत अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम यांनी दिले. जळगाव तसेच नांदेड जिल्ह्यातील 2018 मध्ये उघडकीस आलेल्या कृष्णूर धान्य घोटाळ्याच्या धर्तीवर वाहतूक ठेकेदार यांच्याशी संगनमत करून धान्यांचा काळाबाजार चालू असल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ. कदम यांनी गंभीर … Read more

पूरबाधितांनी नुकसान भरपाई बाबत संभ्रम बाळगू नये

कोल्हापूर (प्रतिनिधी) – केंद्र व राज्य सरकार यांच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या बाधीतांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची स्थापना केली आहे. महापुरामुळे बाधित होऊन नुकसान झालेल्या सर्व नुकसानग्रस्तांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत महाविकास आघाडीचे सरकार बांधील आहे. सर्वांना मदत मिळेल तरी मदतीबाबत कोणीही संभ्रम बाळगू नये असे आवाहन सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र … Read more

सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्या – शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू

अमरावती  : कोरोना साथीने विविध क्षेत्रांसह शिक्षण क्षेत्रापुढेही अडचणी उभ्या केल्या. या पार्श्वभूमीवर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्था निर्माण करून गुणवत्तापूर्ण, रोजगारक्षम, व्यवसायाभिमुख शिक्षण देण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची परिणामकारक अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी  दिले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी … Read more

विकासकामे व मूलभूत सुविधांसाठी निधी देणार – वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई

मुंबई : कोविड संसर्गामुळे राज्यावर आर्थिक बोजा असला तरी विकासकामांसाठी तसेच जनतेच्या मूलभूत सोयीसुविधांसाठी राज्य शासन निधी उपलब्ध करून देईल, असे वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत सांगितले. विधानपरिषदेत पुरवणी मागण्यांवर उत्तर देताना वित्त राज्यमंत्री  देसाई म्हणाले, पुरवणी मागण्यांवर सदस्यांनी मांडलेल्या सूचनांचा राज्य शासन विचार करेल. कोकणातील नगरपंचायतींना निधी उपलब्धतेसंदर्भात लवकरच बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला … Read more

नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध : राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

अहमदनगर : नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्या सोडविण्याला प्राधान्य देणे यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. फळबाग विमा आणि पीक विम्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या असलेल्या अडचणींसंदर्भात कृषी अधिकारी आणि विमा कंपन्याचे अधिकारी यांच्यासमवेत जिल्हास्तरीय बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यमंत्री तनपुरे यांनी शनिवारी पाथर्डी तालुक्यातील … Read more

खाद्यतेलांसह अन्नात भेसळ करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

मुंबई : खाद्यतेलांसह अन्नात भेसळ करून जर कुणी राज्यातील जनतेच्या आरोग्याशी खेळ करीत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. याविरोधात अन्न व औषध विभागाची मोहीम अधिक तीव्र करण्याबरोबरच खाद्यतेलांसह अन्नात भेसळ करणाऱ्यांचे परवाने तत्काळ रद्द करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी अधिकाऱ्यांना दिले. राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये खाद्य तेलांमध्ये … Read more