Ministry of Finance | नोटा छापणार्‍या कंपनीने आत्मपरीक्षण करावे – अर्थमंत्री सीतारामन

Nirmala Sitharaman | आतापर्यंत सरकारची सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मायनिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया ही कंपनी नोटा आणि नाणी तयार करण्याचे काम करत होती. मात्र आता भारत डिजिटल व्यवहारात आगेकूच करीत आहे. अशा परिस्थितीत नोटा छापण्याचे आणि नाणी तयार करण्याचे काम कमी होणार आहे. त्यामुळे या कंपनीने आगामी काळात स्वतःची भूमिका ठरविण्यासाठी आत्मपरीक्षण करावे असा सल्ला केंद्रीय अर्थमंत्री … Read more

Breaking News : देशातील सर्व बँकांसाठी अर्थमंत्रालयाची महत्वाची सूचना, वाचा सविस्तर बातमी…..

Breaking News – युको बॅंकेतील (bank) सायबर घोटाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर अर्थ मंत्रालयाने (Ministry of Finance) देशातील सर्व सरकारी बॅंकांना (bank) त्यांच्या डिजिटल ऑपरेशनशी संबंधित प्रणाली आणि सायबर सिक्‍युरिटी मजबूत करण्यासाठी उपाययोजना करावी आणि सध्याच्या व्यवस्थेचा आढावा घ्यावा अशी सुचना केली आहे. बॅंकांनी सायबर फ्रॉडच्या संबंधात कडेकोट सावधगिरी बाळगली पाहिजे आणि भविष्यातील सायबर धोक्‍यांसाठी सज्ज असले पाहिजे, … Read more

Ministry of Finance : महाराष्ट्राला आपत्ती निवारणासाठी सर्वाधिक 1420 कोटी रुपयांचा निधी वितरित

नवी दिल्ली :- राज्यातील अतिवृष्टी, ओला दुष्काळ तसेच पावसाळ्यातील नुकसान भरपाईसाठी केंद्र सरकारने आज देशातील 22 राज्यांना आपत्ती निवारणासाठी 7 हजार 532 कोटी रुपयांचा निधी वितरित केला. यामध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक 1420.80 कोटी रुपयांचा निधी अर्थ मंत्रालयाकडून वितरित करण्यात आला आहे. या यादीत उत्तर प्रदेश राज्य दुसऱ्या क्रमांकावर असून 812 कोटी रुपये, तर ओडिशा तिसऱ्या क्रमांकावर … Read more

भारतीय रुपयाच्या मुल्य घसरणीबद्दल काळजी करण्याची गरज नाही – अर्थ मंत्रालय

नवी दिल्ली – अगोदरच रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत कमी होत असताना गेल्या आठवड्यात फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.75 टक्‍क्‍यांची वाढ केल्यानंतर भारतीय रुपयाचे मूल्य वेगाने कमी होत आहे. मात्र यामुळे चिंता करण्याची कसलीही गरज नाही. सध्याच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारताकडे मुबलक परकीय चलन साठा आहे असे आर्थिक व्यवहार सचिवांनी म्हटले आहे. या विषयावर विरोधी पक्षांनी बरीच … Read more

खर्चाचे नियम शिथिल; विविध विभागांना शिल्लक रक्कम खर्च करता येणार – अर्थमंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली – सध्याच्या मंदीच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकार खर्च वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये सुरूवातीच्या तिमाहीमध्ये ज्या विभागाची रक्कम शिल्लक आहे, त्यांना ती रक्कम पुढील तिमाहीमध्ये खर्च करण्याची मुभा अर्थ मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत परिस्थितीजन्य कारणामुळे काही मंत्रालय किंवा विभागांना अर्थसंकल्पात ठरवून दिलेली रक्कम खर्च करता आली … Read more

व्ही अनंत नागेश्‍वरन यांची अर्थ मंत्रालयाचे नवीन मुख्य सल्लागार पदी नियुक्ती

नवी दिल्ली- ज्येष्ठ अर्थतज्ञ व्ही अनंत नागेश्‍वरन यांची अर्थ मंत्रालयाचे नवीन मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले. नागेश्‍वरन यांनी शिक्षण क्षेत्रात बरेच काम केले आहे. त्याच बरोबर क्रेडिट सुईस आणि जुलियस बियर या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्येही अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे. के व्ही सुब्रमण्यन या अगोदर अर्थ मंत्रालयाचे मुख्य सल्लागार … Read more

अर्थ मंत्रालयाने उद्योगाकडून सूचना मागविल्या; अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेला वेग

नवी दिल्ली – आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया अर्थ मंत्रालयात वेगाने चालू आहे. उद्योग आणि व्यापाऱ्यांच्या संघटनांकडून अर्थमंत्रालयाने यासंदर्भात सूचना मागिविल्या आहेत. कर प्रणाली कशी असावी, करांचे दर कसे असावेत, करदात्यांची संख्या कशी वाढवता येईल या संदर्भात उद्योगांनी आणि व्यापाऱ्यांच्या संघटनांनी आपल्या प्रतिक्रिया अर्थ मंत्रालयाकडे पाठवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या सूचनांच्या … Read more

सरकारी उद्योग विभाग अर्थ मंत्रालयाशी संलग्न

नवी दिल्ली – सरकारी उद्योग विभाग म्हणजे डिपार्टमेंट ऑफ पब्लिक एंटरप्राइजेस आता अर्थ मंत्रालयाशी संलग्न करण्यात आला आहे. केंद्र सरकारने सरकारी कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमाला गती मिळावी याकरिता या दोन मंत्रालयाचे एकत्रीकरण केले गेले असल्याचे सांगण्यात आले. लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला असेल त्या अनुषंगाने हे बदल करण्यात आले असल्याचे … Read more

प्राप्तिकर पोर्टलमध्ये तांत्रिक अडथळे; अर्थ मंत्रालय – इन्फोसिसदरम्यान चर्चा

नवी दिल्ली – प्राप्तिकर विभागाचे विवरण भरण्याचे नवीन पोर्टल इन्फोसिस कंपनीने गेल्या पंधरवड्यात उपलब्ध केले आहे. मात्र पहिल्या दिवसापासून या पोर्टलवर काम करताना करदात्यांना अनेक अडचणी येत आहेत. या अडचणी सोडविण्यासंदर्भात अर्थ मंत्रालयातील अधिकारी आणि इन्फोसिस कंपनीचे अधिकारी आज मंगळवारी चर्चा करणार आहेत. गेल्या पंधरा दिवसात देशभरातील बऱ्याच करदात्यांनी या संदर्भात आपल्या अडचणी अर्थ मंत्रालयाकडे … Read more

जीएसटी संकलनात विक्रमी वाढ

नवी दिल्लीः देशात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये सरकारला दिलासा मिळाल्याची बातमी समोर आलीय. एप्रिल महिन्यात देशातील GST collection विक्रमी पातळीवर पोहोचलाय. एप्रिल महिन्यात एकूण जीएसटी संकलन 1,41,384 कोटी रुपये होते, जो एक नवीन विक्रम आहे. त्यापैकी केंद्रीय जीएसटी 27,837 कोटी, राज्य जीएसटी 35,621 कोटी आणि आंतर जीएसटी 68,481 कोटी आणि सेस 9,445 कोटी आहे. आयजीएसटीमध्ये केवळ … Read more