nagar | बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी तरुणाची घेतली भेट

संगमनेर, (प्रतिनिधी)- जांबुत खुर्द येथील शिवाजी बबन पारधी हा तरुण बिबट्याच्या हल्ल्यात रविवारी गंभीर जखमी झाला. यावेळी त्याला तातडीने संगमनेरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांनी तातडीने दवाखान्यात जाऊन या तरुणाची भेट घेऊन मदतीच्या सर्व सूचना दिल्या. जांबुत खुर्द गावातील वाडा वस्ती येथील शिवाजी पारधी हा तरुण शेतकरी आपल्या शेतातील पिकाला … Read more

nagar | सेवानिवृत्तीनंतरही एका कुटुंबाप्रमाणे सुखदुःखात सहभाग – थोरात

संगमनेर (प्रतिनिधी) – संपूर्ण देशातील सहकारासाठी मार्गदर्शक ठरलेल्या अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांमधील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरही एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन हे नाते असेच कायम राहण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आले आहे. तालुका व अमृत उद्योग समूह हा एक परिवार असून, सेवानिवृत्तीनंतरही एकमेकांच्या सुखदुःखात सर्वजण सहभागी असणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब … Read more

nagar | राज्यात महायुती विरोधात मोठी लाट

  संगमनेर, (प्रतिनिधी)- देशात वाढलेली महागाई व बेरोजगारी, याचबरोबर महिलांचे, शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत. यावर सरकार बोलत नसून धार्मिकतेचे मुद्दे पुढे केले जात आहेत. भाजपाच्या फसव्या जाहिरातबाजीला लोक कंटाळले असून राज्यात महायुतीच्या विरोधात मोठी लाट आहे तर महाविकास आघाडीचीच सर्वत्र हवा आहे. जनकल्याणाचा महाविकास आघाडीचा विचार सर्वांनी घराघरात पोहोचवावा, असे आवाहन आमदार बाळासाहेब थोरात यांनी … Read more

nagar | लंके यांनी घेतली आ.बाळासाहेब थोरात यांची भेट

संगमनेर (प्रतिनिधी) – नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी आमदार नीलेश लंके यांनी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची संगमनेर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. संगमनेर येथील सुदर्शन निवासस्थानी नीलेश लंके यांनी शनिवारी रात्री आमदार थोरात यांची भेट घेतली. यावेळी कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्री थोरात व … Read more

नगर | काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी मनोहर पोटे

श्रीगोंदा,  (प्रतिनिधी) – श्रीगोंदा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी ही निवड केली आहे. काँग्रेस व महिला काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष अनुक्रमे राजेंद्र व अनुराधा नागवडे यांनी पदांचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने येथील काँग्रेस खिळखिळी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, … Read more

नगर – रस्त्यांसह विकासकामांना असलेली स्थगिती दुर्दैवी

संगमनेर – राष्ट्रीय महामार्ग ते मालदाड या रस्त्याच्या कामासाठी सरपंच गोरक्षनाथ नवले व ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण आज तिसऱ्या दिवशी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आले. तालुक्‍यातील 77 कोटींच्या रस्त्यांसह विविध विकास कामांना सरकारने दिलेली स्थगिती ही अत्यंत दुर्दैवी असल्याची टीका आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. मालदाड, सोनुशी, नान्नज चिंचोली गुरव हा रस्ता … Read more

नगर – नीलेश लंकेंमुळे हजारो करोना रुग्णांना जीवदान

पारनेर -कोरोना महामारीमध्ये आमदार नीलेश लंके यांनी शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात 1 हजार 100 बेडची व्यवस्था करीत रुग्णांना आधार देऊन त्यांच्या मनातील भिती दूर करण्याचे महत्वाचे काम केल्याने हजारो कोरोना रुग्णांना जीवदान मिळाले. मनात भिती नसेल तर कोव्हीड होऊ शकत नाही. कोणतेही औषध घेण्याची गरज नाही, हे लंके यांच्या मनस्थितीवरून आमच्या लक्षात आले, असे गौरवोद्‌गार … Read more

‘थोरातांच्या उमेदवारीमुळे नागरिकांना आनंद’; खा. डॉ. विखेंकडून धाडसी भाष्य

नगर – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सारख्या अनुभवी व्यक्‍तीला नगर दक्षिण लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसने संधी दिली तर निश्‍चितच नागरिकांनाही आनंद होईल, असे धाडसी भाष्य भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलतांना केले. ते पुढे म्हणाले की, त्यांना उमेदवारी दिली तर लोकसभेची निवडणूक स्पर्धात्मक व रंजक होईल. केंद्रातील भाजप सरकारला … Read more

Maharashtra politics : मंत्री विखेंचा आमदार थोरातांना टोला, म्हणाले “ज्यांच्याकडे जनाधारच नाही त्यांच्या…”

संगमनेर (प्रतिनिधी) – आ. बाळासाहेब थोरात यांनी काय आरोप करावे हा त्यांचा प्रश्न आहे. राज्यातील कॉंग्रेसचे भवितव्य संपलेलं आहे, पुढाऱ्यांचे भविष्य काय आहे ते माहिती नाही. ज्यांच्याकडे जनाधारच नाही त्यांच्या आरोपावर बोलण्याची गरज नाही, असा टोला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांना लगावला.  संगमनेरमध्ये वयोश्री योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना साहित्य वाटप कार्यक्रमावेळी ते बोलत … Read more