Lok Sabha Election 2024 : आमदार मकरंद पाटलांच्या पदरी निराशा; लोकसभेची जागा भाजपला, भूमिकेबाबत उत्सुकता….

पाचगणी – सातारा लोसकभा मतदारसंघात महायुतीकडून खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. महायुतीतील या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार) रस्सीखेच करण्यात आली. मात्र, अजित पवारा यांना सातारची उमेदवारी मिळवण्यात यश आले नाही. त्यामुळे वाई मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांच्या पदरी पुन्हा निराशा पडली. राज्यातील घडामोडीत कही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. आमदार मकरंद पाटील … Read more

satara | अवकाळी-क्षेत्र महाबळेश्वर रस्त्याचे काम सुरू

पाचगणी, (प्रतिनिधी) – अवकाळी-क्षेत्र महाबळेश्वर या रस्त्यासाठी आमदार मकरंद पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून 35 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या कामाचा शुभारंभ अवकाळी येथे जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला. राजपुरे म्हणाले, अवकाळीपासून क्षेत्र महाबळेश्वरला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. या रस्त्याची अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली होती. या रस्त्यासाठी … Read more

satara | खंडाळ्याचा पाणीप्रश्न पूर्णपणे मिटणार

खंडाळा, (प्रतिनिधी) – महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातून खंडाळा शहरासाठी 38.33 कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजूर झाली आहे. त्यामुळे खंडाळकरांचा पाणीप्रश्न पूर्णपणे मिटणार आहे, अशी माहिती अ‍ॅड. शामराव गाढवे यांनी खंडाळा येथे शासकीय विश्रामगृहात मंगळवारी (दि. 27) झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. खंडाळ्याची सध्याची पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतीच्या काळातील आणि अपुर्‍या … Read more

सातारा – भुईंज व दरेच्या आरोग्य केंद्रासाठी दोन कोटी निधी

वाई – विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी वाई तालुक्यातील भुईज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीसाठी व महाबळेश्वर तालुक्यातील दरे उपकेंद्रासाठी नवीन इमारत बांधणे या कामांसाठी दोन कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे, अशी माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली. यामध्ये भुईज प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतीची दुरुस्ती, इमारतीमधील विद्युतीकरण, पेव्हर ब्लॅाक बसविणे, … Read more

सातारा – पालकमंत्री व आमदारांच्या भेटीनंतरही उपोषण सुरूच

लोणंद – धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी खंडाळा तालुका सकल धनगर समाजाच्यावतीने लोणंद नगरपंचायतीसमोर उपोषणास बसलेल्या गणेश केसकर यांची उपोषणाच्या चौथ्या दिवशी पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. धनगर आरक्षणाबाबत धनगड ऐवजी धनगर असे शिफारसपत्र राज्यपाल देत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही, अशी … Read more

वाई, खंडाळा, महाबळेश्‍वरच्या रस्त्यांसाठी 35 कोटींचा निधी

वाई  – मतदारसंघातील वाई, खंडाळा, महाबळेश्‍वर तालुक्‍यातील ग्रामीण भागातील रस्ते दळणवळणासाठी सोयीस्कर व्हावेत यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय बजेटमधून विविध रस्त्यांच्या कामासाठी व पूल बांधकामांसाठी 34 कोटी 91 लाखाचा निधी मंजूर केल्याची माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली. आमदार मकरंद पाटील यांनी राज्याच्या पुरवणी अर्थसंकल्प बजेटमधून पाठपुरावा करून सुमारे 34 कोटी 91 लाख कोटींचा निधी मंजूर करुन … Read more