राज ठाकरे म्हणाले,’अघोरी राजकारणाला वठणीवर आणाच…’ युजर्स म्हणाला, ’48 उमेदवार उभे करण्याची तुमच्यात ताकद…’

Lok Sabha Election 2024 | निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. लोकसभा निवडणूक 7 टप्प्यात घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली. लोकसभेच्या 543 जागांवर मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पहिला टप्पा 19 एप्रिल, दुसरा टप्पा 26 एप्रिल, तिसरा टप्पा 7 मे, चौथा टप्पा 13 मे, पाचवा टप्पा 20 मे, सहावा टप्पा 25 … Read more

‘यंदा पंतप्रधान कोण व्हावा?’ मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं

MNS Chief Raj Thackeray – 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पार्टी तिसऱ्यांदा सत्तेवर येण्यासाठी प्रयत्नशील असून त्यांनी गेल्याच पंधरवड्यात तशी आखणी करून कामही सुरू केले आहे. अशात २०२४ मध्ये पंतप्रधान कोण होणार असा प्रश्न चर्चेत आलाआहे  आहे. याबाबत नाशिकमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पत्रकारांनी … Read more

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पुन्हा राज ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली असल्याची माहिती समोर येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ बंगल्यावर सोमवारी रात्री भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली असून ही भेट नेमकी कशासाठी होती याचे कारण अजूनही गुलदस्त्यातच आहे. महाराष्ट्रातील … Read more

“…तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही,” म्हणत कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर राज ठाकरेंचे मोठे विधान

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक निवेदन प्रसिद्ध  केले आहे. या निवेदनातून त्यांनी एक मोठे विधान केले आहे. “कर्नाटकमधील सरकार मराठी माणसांना त्रास देणार असेल, मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार असेल, तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही,” असा इशारा राज ठाकरेंनी दिला. राज ठाकरे यांनी … Read more

# video : “हेच फक्त माझं स्वप्न आहे..”; महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा देत राज ठाकरे यांची खास पोस्ट

मुंबई : मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होऊन आज ६३ वर्षे पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वाना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासाठी त्यांनी खास पोस्ट ट्विटरवर केली आहे.  यानिमित्ताने त्यांना कसा महाराष्ट्र अपेक्षित आहे हे या व्हिडीओच्या माध्यमातून जनतेला सांगितले आहे. राज ठाकरे यांनी आज सकाळीच महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्याकरता ट्विटरवर … Read more

“हे चित्र आनंददायी आहे…” म्हणत राज ठाकरेंनी फेसबुक पोस्टद्वारे दिल्या महिला दिनाच्या ‘खास’ शुभेच्छा

मुंबई : आज जगभरात विविध प्रकारे महिला दिन साजरा केला जात आहे. त्यातच सर्व स्तरातून महिलांना आजच्या दिवसाच्या खास शुभेच्छा देण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून समस्त महिला वर्गाला खास शुभेच्छा दिल्या असून त्यांना एक आवाहन देखील दिले आहे. राज ठाकरेंनी आजच्या त्यांच्या पोस्टमध्ये … Read more

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंना मोठा धक्का; पक्षाच्या ‘मसल मॅन’चा राजीनामा

मुंबई : राज्यात एकीकडे सत्तासंघर्ष, पक्षाचे नाव, चिन्ह यावरून गोंधळ सुरु असताना तिकडे मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ‘मसल मॅन’ म्हणून सर्वांना परिचित असणारे मनीष धुरी यांनी पक्षातील सर्व पदाचा अचानकपणे राजीनामा दिला आहे. मनसेचे ‘मसल मॅन’ मनीष धुरी यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे सांगण्यात येत आहे. आगामी मुंबई महापालिका … Read more

‘शिवतीर्थ’वर राज ठाकरे-गौतम अदाणी यांची भेट; दोघांमधील चर्चा गुलदस्त्यात तर तर्क-वितर्कांना उधाण

मुंबई : ‘वेदान्त फॉक्सकॉन’सह बरेच प्रकल्प परराज्यात गेल्याने महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. नवीन प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. राज्यात हे सर्व सुरु असताना अदाणी समुहाचे प्रमुख गौतम अदाणी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांचे निवासस्थान असणाऱ्या ‘शिवतीर्थ’ … Read more

अंधेरी पोटनिवडणूक : …म्हणून राज ठाकरेंची देवेंद्र फडणवीस यांना माघार घेण्याची विनंती

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. या निवणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके आणि भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यात थेट लढत होणार आहे. या पोटनिवडणुकीमध्ये मनसेची भूमिका काय असेल  याकडे सर्वांचे लक्ष असतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निवडणुकीसंदर्भात भाजपाला आवाहन केले आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री … Read more

अमित ठाकरेंना मंत्रिपद ? राज ठाकरेंनी केला ‘हा’ खुलासा

  मुंबई – शिंदे-फडणवीस सरकारचा अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. नव्या मंत्रिमंडळात कोण असणार ? कोणाला संधी दिली जाणार? यात अनेक नावे पुढे येत आहेत. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांना देखील मंत्रीपदाची ऑफर आल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यामुळे नव्या शिंदे फडणवीस सरकारमध्ये अमित ठाकरे देखील असणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळात … Read more