राज्यमंत्री आणि स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री यांच्यात काय फरक? नेमके दोघांचे काय असते काम ? जाणून घ्या

PM Modi cabinet । नरेंद्र मोदी यांनी  सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पंतप्रधान मोदींसह 72 मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली. मोदींच्या मंत्रिमंडळात एकूण 72 मंत्र्यांचा समावेश आहे. त्यात पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात 30 कॅबिनेट मंत्री, 36 राज्यमंत्री आणि 5 स्वतंत्र प्रभार असलेल्या राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. राज्यमंत्री आणि स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री यांच्यात फरक काय आणि … Read more

“अजित पवारांना जे मिळेल ते खावे लागणार नाहीतर…” ; वडेट्टीवार यांचा अजित पवारांवर निशाणा

Vijay wadettiwar on Ajit Pawar ।

Vijay wadettiwar on Ajit Pawar । राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळात अनेक राज्यांच्या नेत्यांचा समावेश करण्यात आला. त्यातच राज्यात मोदींच्या मंत्रिमंडळात अजित पवारांच्या गटाला एकही मंत्रिपद न मिळाल्यामुळे जोरदार चर्चा होत आहे. यावरुन विरोधकांनी देखील अजित पवारांवर निशाणा साधला आहे. यावेळी “मानसन्मान संख्याबळावर मिळतो, असा खोचक टोला विरोधी … Read more

“चिराग पासवान,पियुष गोयल, सिंधिया,मांझी…” ; ‘या’ नेत्यांना आले मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी फोन

Narendra Modi Oath Ceremony ।

Narendra Modi Oath Ceremony । नरेंद्र मोदींच्या शपथविधीपूर्वी एनडीएच्या मित्रपक्षांच्या खासदारांना मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी फोन येऊ लागले आहेत. TDP, LJP (R) आणि JDU सारख्या पक्षांच्या खासदारांना फोन आले असल्याची माहिती समोर आलीय.  टीडीपी खासदार डॉ चंद्रशेखर पेम्मासानी आणि किंजरापू राम मोहन नायडू यांना मंत्री होण्यासाठी फोन आलाय. याशिवाय जेडीयूचे राज्यसभा खासदार रामनाथ ठाकूर यांनाही मंत्रीपदासाठी … Read more

Parliament Special Session : नवीन संसदेला अधिकृत दर्जा मिळाला, अधिसूचना जारी, आजपासून सुरू होणार कामकाज

नवी दिल्ली – देशभरात गणपती बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वत्र गणरायाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच याच शुभमुहूर्तावर आजपासून नव्या संसदेचा श्रीगणेशा होणार आहे. नव्या संसदेत आज दुपारी १ वाजल्यापासून कामकाजाला सुरूवात होईल. केंद्र सरकारने नवीन इमारतीचे काम सुरू करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला, ज्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या … Read more

महिला मतदारांची नाराजी कळताच मोदी सरकारने सिलिंडरचे दर केले कमी ?

मुंबई – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी जिथे एकीकडे विरोधी पक्ष इंडिया एकवटलेला दिसत आहे, तर दुसरीकडे केंद्र सरकारनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मोदी सरकारने एलपीजी सिलिंडरची किंमत 200 रुपयांनी कमी केल्याने ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. भाजपच्या अंतर्गत सूत्रांवर विश्वास ठेवला तर, ग्राउंड रिपोर्ट्स आणि सर्व्हेक्षणातून महिला मतदारांची नाराजी भाजपला लक्षात आली आहे, … Read more

भाजपची सोमवारपासून महाराष्ट्रभर जन आशीर्वाद यात्रा ; महाराष्ट्रासह 22 राज्यांमध्येही यात्रा

मुंबई – येत्या 16 ऑगस्टपासून महाराष्ट्रातील भाजपचे नेते सोमवारपासून महाराष्ट्रभर जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत. यामध्ये अनेक भागात नव्यानं झालेले केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या यात्रेचं नियोजन केले जात आहे.  लोकांशी संवाद साधण्यासोबतच केंद्रातील योजनांची माहिती देखील ते जनतेला देणार आहेत. भाजपच्या वतीने देशभर हा कार्यक्रम आखला गेला आहे. महाराष्ट्रासह 22 राज्यांमध्येही यात्रा निघणार आहे. … Read more

थावरचंद गेहलोत झाले कर्नाटकचे राज्यपाल; सात नवीन राज्यपालांच्या नियुक्‍त्या

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळात केल्या जाणाऱ्या विस्ताराच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने आज सात नवीन राज्यपालांच्या नियुक्‍त्या घोषित केल्या आहेत. यात केंद्रीय मंत्रिमंडळात सामाजिक न्याय विभागाचे मंत्री म्हणून काम करणारे थावरचंद गेहलोत यांना कर्नाटकचे राज्यपाल करण्यात आले आहे. अन्यही राज्यांच्या राज्यपाल पदांमध्येही फेरबदल करण्यात आले आहेत त्यानुसार मिझोरमचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लाई यांना गोव्याचे राज्यपाल करण्यात … Read more