सावधान..! मंकीपॉक्स ब्लँकेट आणि कॉफी मशीन सारख्या ठिकाणी जास्त काळ टिकू शकतो..

मुंबई – संपूर्ण जग सध्या कोरोना, मंकीपॉक्स आणि टोमॅटो फ्लू सारख्या घातक आरोग्य समस्यांना तोंड देत आहे. या आजारांनी लोकांचे सुख आणि शांती हिरावून घेतली आहे. कोरोना व्हायरसने अनेकांचा जीव घेतले आहे आणि कोटय़वधी लोक अजूनही त्याच्या विळख्यात आहेत. कोरोनाची दहशत अजून संपलेली नव्हती तोच मंकीपॉक्स विषाणूने लोकांमध्ये थैमान घातले. या विषाणूमध्ये शरीरावर पुरळ दिसू … Read more

भारतात मंकीपॉक्‍सच्या साथीचा फारसा धोका नाही

    प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 31 – भारतात मंकीपॉक्‍सच्या साथीचा फारसा धोका नाही. मात्र आपल्याला आवश्‍यक काळजी घेतली पाहिजे. खासकरून गर्दीच्या ठिकाणी जसे की कार्यालये आणि आरोग्य सुविधा केंद्रे याठिकाणी वावरताना सुरक्षेच्या नियमांचे पालन केले पाहिजे, असे मत महाराष्ट्र राज्य “कोविड टास्कफोर्स’चे सदस्य आणि “एंडोक्राइनोलॉजिस्ट’ डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले. पुणे ऑबस्ट्रेटिक अँड … Read more

दिलासादायक! देशातील पहिल्या “मंकीपॉक्स’ रुग्णाचा अहवाल आला निगेटिव्ह, रुग्णालयातून “डिस्चार्ज’

नवी दिल्ली – मंकीपॉक्सबाबत दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. देशातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण संसर्गमुक्त झाला असून त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. याबाबत माहिती देताना केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, केरळमध्ये उपचार घेत असलेली भारतातील पहिली मंकीपॉक्स रुग्ण या आजारातून बरी झाली आहे. देशातील मंकीपॉक्सची ही पहिलीच केस असल्याने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ … Read more

मंकी पॉक्‍सबाबत महापालिका अलर्ट

पिंपरी –  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेपुढे मंकी पॉक्‍स या नव्या संसर्गजन्य आजाराचे आव्हान समोर उभे राहिले आहे. अद्याप राज्यात कुठेही मंकीपॉक्‍सचा रुग्ण सापडला नसला तरी संभाव्य धोका लक्षात घेत परदेश आणि केरळमधून येणाऱ्या नागरिकांवर महापालिकेने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. केरळ राज्यात मंकीपॉक्‍सचे दोन रुग्ण आणि दिल्लीत एक रुग्ण आढळून आला. करोनाचे अनुभव लक्षात … Read more

Monkeypox Global Emergency: WHO ने मंकीपॉक्सला जागतिक आणीबाणी म्हणून केले घोषित, व्हायरस पसरला 70 देशांमध्ये

वॉशिंग्टन – वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने मंकीपॉक्सला आता जागतिक आणीबाणी म्हणून घोषित केले आहे. एपी या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. WHO च्या म्हणण्यानुसार, हा विषाणू जगातील 70 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरला आहे. मंकीपॉक्स हा प्राण्यांपासून मानवांमध्ये प्रसारित होणारा विषाणू आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अॅधानोम घेब्रेसस यांनी शनिवारी सांगितले की, वेगाने पसरणारा मांकीपॉक्सचा उद्रेक … Read more

Monkeypox | देशात मंकीपॉक्सचा तिसरा रुग्ण

नवी दिल्ली :- केरळमध्ये मंकीपॉक्सची तिसरी घटना समोर आली आहे. पूर्वी आढळलेल्या संसर्गाप्रमाणे ही व्यक्ती देखील यूएईमधून परतली आहे. देशात आतापर्यंत आढळलेली तिन्ही प्रकरणे केवळ केरळमध्ये आढळून आली आहेत. 35 वर्षीय व्यक्ती या महिन्याच्या सुरुवातीला संयुक्त अरब अमिरातीतून केरळमध्ये आली होती. त्याच्या नमुना चाचणीत मंकीपॉक्सची पुष्टी झाली आहे. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले … Read more

मंकीपॉक्‍सचा धोका वाढला; केरळमध्ये आणखी एकाला लागण

केरळ – देशात करोना संसर्ग पुन्हा वाढत आहे. त्याचसोबत आता मंकीपॉक्‍सचाही धोका वाढताना दिसून येत आहे. दुबईवरून आलेल्या केरळ येथील एका 35 वर्षीय तरुणाला या आजाराची लागण झाल्याचे समोर आले होते. आता दुसरा रुग्ण आढळून आल्याने केरळचे आरोग्य मंत्रालय सतर्क झाले आहे. केरळमधील कन्नूमर येथील 31 वर्षीय तरुणाला या आजाराची लागण झाली आहे. या तरुणाला … Read more

करोनासोबतच आता मंकीपॉक्‍सचासुध्दा धोका; आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली – देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे मंकीपॉक्‍सचा धोकासुध्दा देशात वाढत आहे. मंकीपॉक्‍सचा पहिला रूग्ण केरळमध्ये आढळून आला आहे. त्यामुळे मंकीपॉक्‍सचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मंकीपॉक्‍सचा सामना करण्यासाठी 15 लॅबमध्ये टेस्ट केली जाणार आहे. देशात मंकीपॉक्‍स संसर्गाचा पहिला रूग्ण केरळमधील कोल्लममध्ये आढळून आला आहे. हा रुग्ण … Read more

देशात मंकीपॉक्सच्या पहिल्या रुग्णाची नोंद; तीन दिवसांपूर्वीच युएईतून भारतात दाखल

नवी दिल्ली : देशात केरळमध्ये मंकीपॉक्सचा पहिल्या  रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी याविषयी माहिती दिली आहे.  मंकीपॉक्सचा हा देशातील पहिला रुग्ण आहे. संक्रमित व्यक्ती ही तीन दिवसांपूर्वीच युएईतून भारतात दाखल झाल्याची माहिती आहे. तसेच त्याच्या संपर्कात ११ जण आल्याचेदेखील पुढे आले आहे. सर्वांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. पीडित व्यक्ती … Read more

मंकीपॉक्‍सचा तब्बल 58 देशांत संसर्ग

लंडन – करोना महामारी पाठोपाठ जगातील 58 देशांमध्ये मंकीपॉक्‍सचा संसर्ग वाढत आहे. या देशांमध्ये मंकीपॉक्‍सचे विषाणूचं संक्रमण झाले असून वाढता धोका लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेकडून (डब्ल्यूएचओ) मंकीपॉक्‍स संसर्गाला जागतिक महामारी घोषीत करण्यातची शक्‍यता आहे. यासंदर्भात डब्ल्यूएचओने एक आपत्कालीन समितीची तातडीने बैठक बोलावली आहे. जगभरात आतापर्यंत मंकीपॉक्‍स व्हायरसच्या 3 हजार 417 लोकांना संसर्ग झाला आहे. … Read more