satara | लाल परी’मध्ये जीव गुंतला….!

कोरेगाव, (प्रतिनिधी) – कोरेगाव तालुक्यातील एकंबे गावचे संजय चव्हाण. एस. टी. च्या कोरेगाव आगारामध्ये ३६ वर्षे वाहक म्हणून प्रामाणिक सेवा बजावल्यानंतर शुक्रवारी संजय चव्हाण यांचा सेवानिवृत्तीचा दिवस उजाडला. एवढी वर्षे एसटीच्या माध्यमातून लाखो प्रवाशांच्या मनावर अधिराज्य केलेले संजूदादा आपल्या लाडक्या लाल परीला निरोप देताना प्रचंड गहिवरून गेले. आपल्या मातृभूमी आणि कर्मभूमी असलेल्या एकंबे गावात जायगाव … Read more

‘मोदी अन् भागवत यांच्याइतकीच मुस्लिमांचीही भारत ‘मातृभूमी”

नवी दिल्ली  – जमियत उलेमा-ए-हिंदचे प्रमुख महमूद मदनी यांनी शनिवारी (11 फेब्रुवारी) सांगितले की, ‘ही भूमी मुस्लिमांचीही मातृभूमी आहे. इस्लाम हा बाहेरून आलेला धर्म आहे असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आणि निराधार आहे. इस्लाम हा सर्व धर्मांपैकी सर्वात जुना धर्म आहे. हिंदी मुस्लिमांसाठी भारत हा सर्वोत्तम देश आहे.’ महमूद मदनी म्हणाले, “भारत हा आपला देश आहे. … Read more

मातृभाषा आणि मातृभूमीबद्दल अभिमानाची जाणीव शिक्षणातून संवर्धित व्हावी – राज्यपाल कोश्यारी

यवतमाळ : माता, मातृभाषा आणि मातृभूमी या तिन्हीबद्दल प्रत्येक नागरिकाने अभिमान बाळगला पाहिजे. त्यासाठी आवश्यक जाणिवा संवर्धित करण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून प्रयत्न होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. यवतमाळ येथील हिंदी प्रसारक मंडळ बेरारतर्फे 24 व्या जवाहरलाल दर्डा स्मृती समारंभानिमित्त जवाहरलाल दर्डा इंग्रजी माध्यम शाळेच्या इमारतीचे लोकार्पण व अस्थिरोग आरोग्य शिबिराचा प्रारंभ … Read more

मातृभूमी व मातृभाषेविषयीचा अभिमान जागा करा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

नांदेड – आज शिक्षणामध्ये नवे तंत्रज्ञान वाढत आहे. पण तंत्रज्ञान कितीही वाढले तरी शिक्षण अधिक चांगले करणे ही सामूहिक जबाबदारी आहे. देशात मातृभाषेतून इंजीनियरिंग सुरू होणे ही आश्वासक बाब आहे. मातृभाषेतून शिक्षण दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मातृभाषेविषयीचा अभिमान जागा होईल. विद्यार्थ्यामध्ये समर्पणाची भावना निर्माण करण्यासाठी मातृभूमी व मातृभाषेविषयीचा अभिमान जागा करा, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा … Read more

#Video : सीआरपीएफ जवानांनी बॅन्डच्या तालावर सादर केले ‘वंदे मातरम्’

नवी दिल्ली – भारतीय स्वांतत्र्यदिनी नवी दिल्लीतील कुतुब मीनार येथे भारतीय सीआरपीएफ जवानांनी  बॅन्डच्या तालावर  वंदे मातरम् हे गीत सादर केले.  https://www.facebook.com/217046208635092/posts/1298833807122988/ हे सुंदर आणि प्रेरणादायक गीत भारतीय सीआरपीएफ जवानांनी मातृभूमीला समर्पित केले.