अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार ; खासदार अमोल कोल्हे यांची मोठी घोषणा

Amol Kolhe News – शिरुर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे (राष्ट्रवादी शरद पवार) उमेदवार अमोल कोल्हे यांनी मोठी घोषणा केली आहे. 5 वर्षांसाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार असल्याचे कोल्हे यांनी जाहीर केले आहे. राजकारण हा पार्टटाईम व्यवसाय नसून फुल टाईम सेवा करण्याचे क्षेत्र आहे. मतदारसंघातील प्रश्न सोडवायचे असतील तर मला पूर्णवेळ काम करावे लागणार आहे. … Read more

पुणे जिल्हा | आमचा आत्मा पक्ष, घरं फोडत नाही

ओतूर, – पंतप्रधान नरेंद्र मोदींना मी फार नम्रपणे सांगू इच्छितो की, होय शरद पवार हे आजच्या महाराष्ट्राचा आत्मा आहेत. सर्वसामान्य शेतकर्‍यांचा महिलांचा आणि कष्टकर्‍यांचा युवकांचा आत्मा आहे, असे उत्तर देत खासदार अमोल कोल्हे यांनी सत्ताधार्‍यांना अनेक दाखले दिले. शिरुर मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ … Read more

सद्य परिस्थितीत पत्रकारांनी अधिक सजग होण्याची गरज : खासदार अमोल कोल्हे

– पत्रकारांनी बरं नव्हे खरं लिहावे : प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे – हजारो पत्रकारांच्या साक्षीने वेधले लक्ष – पुण्यात पत्रकार संघाच्या अधिवेशनाचा शानदार समारोप पुणे :  लोकशाहीची मूल्ये टिकवून ठेवण्यासाठी चौथ्या खांबाची भूमिका मोलाची असून सद्य परिस्थितीत पत्रकारांनी अधिक सजग होण्याची खरी गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी चिंचवड- पुणे येथे … Read more

“अमोल कोल्हेंना उमेदवारी देऊन चूक केली” – अजित पवार

निमोणे (पुणे जिल्हा) – निवडणुकीच्या आखड्यात एखादा उमेदवार पडत नसेल तर सगळ्याच राजकीय पक्षातील लोक त्याला पाडण्यासाठी एखादा सेलिब्रिटी निवडणुकीच्या मैदानात उतरवतात आणि समोरच्या उमेदवाराचा पराभव करतात, ही वस्तुस्थिती आहे. त्यात आमच्याही चुका आहेत, असे म्हणत डॉ. अमोल कोल्हे यांना लोकसभेची उमेदवारी देऊन चुक केल्याचा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला. मांडवगण फराटा (ता. … Read more

पिंपरी | शिरूर लोकसभा मतदारसंघात बदलाचे वारे

पिंपरी,(प्रतिनिधी) – महाराष्ट्रात बारामतीनंतर शिरूर लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. कारण बारामतीमध्ये शरद पवार यांनी कन्या सुप्रिया सुळे आणि शिरूरमध्ये खासदार अमोल कोल्हे यांच्यासाठी कंबर कसल्याचे दिसत आहे. याठिकाणी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना धक्का देत मागील निवडणुकीत अपेक्षित अमोल कोल्हे यांनी विजय नोंदविला. आता आढळराव पाटील यांना म्हाडाचे अध्यक्ष पद दिल्यानं शिरुर … Read more

पुणे जिल्हा : बळीराजाला तातडीची आर्थिक मदत करा ; खासदार अमोल कोल्हे यांची मागणी

नारायणगाव – अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकर्‍यांचा हातातून अशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना राज्य सरकारने प्रारंभिक तातडीची आर्थिक मदत करावी व कृषी व महसूल विभागाला पंचनामे करून मदतीचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश द्यावेत, खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. एकामागून एक येणार्‍या सततच्या संकटांमुळे शेतकरी अगोदरच उद्ध्वस्त … Read more

खासदार अमोल कोल्हेंनी गट बदलला ? आता अजित पवारांसोबत ?

मुंबई – शरद पवार यांच्या मनाविरूद्ध जात अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत 2 जुलैला सरकारमध्ये सामील झाले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी पक्षातील अनेक आमदार गेले. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये काही नेते शरद पवार यांच्या तर काही अजित पवार यांच्या गटात विभागले गेले. यावेळी 2 जुलैला पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खासदार अमोल … Read more

खासदार अमोल कोल्हे मंगळवारी आनेवाडीत

सातारा  -आनेवाडी (ता. जावळी) येथे खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते मंगळवार, दि. 5 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर गुणवंतांचा गुणगौरव, शिष्यवृत्ती वाटप व व्याख्यान होणार आहे. आनेवाडी येथील सर्व मंडळे, विविध सामाजिक संस्थांतर्फे दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी, उच्च शिक्षण घेतलेले विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रांत निवड झालेल्या व्यक्तींचा सत्कार, शिष्यवृत्ती … Read more

“मोफत तिकिट दिलं नाही, तर नाटक कसं होतं तेच बघतो..” पोलिसांच्या धमकीनंतर अमोल कोल्हेंकडून संताप व्यक्त ट्विट करत म्हणाले…

पिंपरी चिंचवड – खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे सध्या राज्यभर शिवपुत्र संभाजी या नाटकाचे प्रयोग करताहेत. नुकताच पिंपरी चिंचवड येथे त्यांचा या नाटकाचा प्रयोग पार पडला. मात्र यानंतर जमलेल्या प्रेक्षकांशी संवाद साधत अमोल कोल्हे यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांनी ‘मोफत तिकीट दिल नाही तर नाटकाचा प्रयोग कसा होतो’ तेच पाहतो अशी धमकी दिल्याचा गंभीर … Read more

शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या प्रयोगादरम्यान डॉ. अमोल कोल्हे यांना दुखापत ! 1 मे रोजीचा प्रयोग सादर करण्याचा निर्धार व्यक्त

पुणे (विवेकानंद काटमोरे ) – छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका जिवंत करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठीला घोड्यावरुन एन्ट्री घेताना दुखापत झाली असली तरी केवळ महाराष्ट्राचा स्थापना दिन असल्याने १ मे रोजीचा ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचा कराडमधील प्रयोग होणार असून उर्वरित दोन्ही प्रयोग रद्द करण्यात आले आहेत. कराडमधील कल्याणी मैदानावर २८ एप्रिलपासून ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे प्रयोग … Read more