पुणे जिल्हा : भिगवणमध्ये नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळेंचे स्वागत

भिगवण – बारामती लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यांचे भिगवण शहरात कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. बारामती लोकसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांनी दीड लाखांचे मताधिक्य मिळवत मोठ्या फरकाने विजय मिळवल्यानंतर सुळे या इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. इंदापूरला जात असताना त्यांचे ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. दरम्यान, भिगवण येथे आल्यानंतर … Read more

पुणे जिल्हा | बारामतीच्या लेकीला दौंडचे पाठबळ

यवत, {मनोज खंडाळे} – संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंड तालुक्यातून २४ हजार २६७ चे मताधिक्य मिळाले आहे. तालुक्यातील आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात यांना हा धक्का मानला जात होता. सर्वसामान्य जनता, मोजके स्थानिक नेत्यांच्या बळावर बाजी मारली आहे. बारामतीच्या लेकीला दौंडने पाठबळ … Read more

बारामतीत घुमला तुतारीचा आवाज! पराभवानंतर सुनेत्रा पवार यांची प्रतिकिया, म्हणाल्या ‘”जनसेवेचा माझा प्रवास…”

Baramati Lok Sabha Election Result 2024 |

Baramati Lok Sabha Election Result 2024 |  बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार यांच्यातील अटीतटीच्या लढतीत बारामतीच्या गडावर शरद पवार यांच्या तुतारीचा आवाज घुमली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठतेची असलेल्या लढतीत शरद पवार यांनी महायुतीला धोबीपछाड दिली. यंदाच्या या निवडणुकीत बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगला … Read more

पुणे जिल्हा | बारामतीच्या गडावर तुतारीचा आवाज

पुणे, (जिल्हा प्रतिनिधी)– संपूर्ण जगातील प्रसारमाध्यमाने दखल घेतलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार यांच्यातील अटीतटीच्या लढतीत बारामतीच्या गडावर शरद पवार यांच्या तुतारीचा आवाज घुमली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठतेची असलेल्या लढतीत शरद पवार यांनी महायुतीला धोबीपछाड दिली. यात भाजपने टाकलेले डावपेच राजकीय पटलावर निकामी झाले आहेत. … Read more

पुणे | “ससून’च्या पाच वर्षांच्या कामकाजाची श्वेतपत्रिका काढा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – “ललित पाटील प्रकरणापासून ससून रुग्णालयातील गैरकारभार सातत्याने समोर येत आहे. आता पुणे अपघात प्रकरणातही अल्पवयीन चालकाच्या रक्ताची चाचणी करताना ससून रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी फेरफार केल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी सातत्याने ससूनच्या व्यवस्थापनावर आरोप केले जात आहेत. त्यामुळे ससून रुग्णालय प्रशासनाच्या गेल्या पाच वर्षांच्या कामकाजाची श्वेतपत्रिका काढा,’ अशी मागणी … Read more

पुणे जिल्हा | राजगड तालुक्यात लोकसभा निकालावर लागतायत पैजा..

राजगड, (प्रतिनिधी) – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी नेहमीपेक्षा वाढेल, असे अपेक्षित असताना प्रत्यक्ष मात्र मतदारांमध्ये निरुत्साहच पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी मतदारांची नावे मतदार यादीत सापडली नाहीत. तर अनेकांनी घरीच राहणे पसंत केले. यास राजगड तालुकाही अपवाद नसून तालुक्यात सायंकाळी ६ पर्यंत एकूण ५२ हजार मतदानापैकी ३२ हजार ८५५ मतदान झाले. … Read more

पुणे जिल्हा | सुळेंची दुसरी पिढी रणभूमीत दाखल

बारामती (प्रतिनिधी)- बारामती लोकसभा मतदारसंघाचा राजकीय आखाड्यात प्रचाराला वेग आला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पवार कुटुंबीय सक्रिय झाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराचा ज्वर शिगेला पोहोचला आहे. पवार कुटुंबीयातीच चौथी पिढी राजकारणात स्थिरावली आहे. आता यंदाच्या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे या बारामती लोकसभा निवडणुकीच्या रणभूमीत प्रचारात सक्रिय झाल्या आहेत. रेवती … Read more

पुणे जिल्हा | सुनेत्रा पवारांनी घेतली शिवतारेंची भेट

सासवड, (प्रतिनिधी) – बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांनी सोमवारी (दि. 8) अचानक माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने बारामती लोकसभा मतदारसंघ कोणत्या ना कोणत्या करणाने कायम चर्चेत आहे. येथून खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी नणंद-भावजयीमध्ये लढत होत आहे. मात्र, महाविकास … Read more

पुणे | आईसमान वहिनीला निवडणुकीत उतरवले

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – भाजपला बारामतीत येऊन विकास करायचा नाही, तर शरदचंद्र पवार यांना हरवायचे आहे. मात्र, भाजपला ते शक्य होत नसल्याने, त्यांनी आमचेच घर फोडून आमची आईसमान असलेल्या वहिनीला निवडणुकीत उतरवले, विचार करा ना? असे बोलत खासदार सुप्रिया सुळे निःशब्द झाल्या. या वेळी माझी लढाई ही कोणा व्यक्तीशी नसून, वैचारिक आहे. भाजप घेत असलेल्या … Read more

पुणे जिल्हा | विचाराने आणि कृतीने ठाम असणारे अनंतराव थोपटेे केंद्र स्थानी

वीसगाव खोरे (वार्ताहर) – बारामती लोकसभा मतदारसंघात काही दिवसांपासून राजकारणात घडामोडींनी वेग घेतला आहे.विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि बारामती हायटेकच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्यात सामना रंगणार आहे. मात्र, भोर विधानसभा मतदारसंघातील राज्याचे माजी मंत्री, काॅंग्रेस पक्षाचे निष्ठावंत जेष्ठ नेते अनंतराव थोपटे केंद्रबिंदू होतांना दिसत आहेत. त्यांच्या विचाराने, कृतीने ठाम आणि एकनिष्ठतेमुळे गेल्या महिनाभरापासून खासदार सुप्रिया … Read more