सातारा – धनुर्विद्येच्या सरावासाठी जिल्ह्यात आधुनिक केंद्र हवे

सातारा  – सातारा जिल्ह्यातील शेकडो खेळाडू धनुर्विद्या (आर्चरी) या खेळाचा सराव करत असून, या खेळाचे महत्त्वाचे केंद्र जिल्हा होऊ पहात आहे. जिल्ह्यातील खेळाडूंना सरावासाठी अद्ययावत सुविधा आणि सराव केंद्राची आवश्यकता आहे. या खेळाडूंमध्ये भविष्यात ऑलिम्पिक पदके मिळवून देण्याची क्षमता असल्याने, जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे सराव केंद्र उभारण्याबाबत केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने कार्यवाही करावी, अशी मागणी खासदार उदयनराजे … Read more

साताऱ्यासाठी साडेचौदा कोटींचा निधी ; खासदार उदयनराजे भोसलेंची माहिती

सातारा – नगरपरिषदेसाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन, सातारा शहराचा समतोल सर्वंकष विकास साधत विविधांगी सेवा-सुविधा सातारकरांना पुरवण्यावर सातारा विकास आघाडीचा भर राहीला आहे. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीमधून 19 कामांसाठी सुमारे 14 कोटी 65 लाख रुपयांच्या विकासकामांना प्रशासकीय मंजूरी मिळाल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली. या कामांमध्ये आयटीआय कॉलेज ते दत्तमंदिर – रस्ता … Read more

नगरोत्थान महाअभियान योजनेवरुन खासदार उदयनराजे भोसले यांनी केली टीका

सातारा – नगरविकास विभागाने नगरोत्थान अंतर्गत 12 कोटी 64 लाख रुपयांचा निधी सातारा शहरासाठी मंजूर केला आहे या निधीवरून सातारा शहरात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले यांचा श्रेयवाद सुरू झाल्याचे पत्रकावरून स्पष्ट झाले असे निधी मंजूर होताच नेहमीच्या श्रेय घेण्याच्या सवयीची टिमकी वाजवण्याचा प्रयत्न काही जणांचा असल्याचा जोरदार टोला खासदार उदयनराजे यांनी कोणाचे … Read more

कास परिसरातील बांधकामे नियमित करावीत : शिवेंद्रसिंहराजे

सातारा – आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची भेट घेतली. कास व बामणोली येथील विनापरवाना करण्यात आलेली बांधकामे नियमित करावीत. त्याकरता सर्वसमावेशक नियमावली लागू करून त्या पद्धतीचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावेत, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. यासंदर्भात जिल्हाधिकारी व शिवेंद्रसिंहराजे यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित बांधकाम नियमावलीचा आराखडा तयार … Read more